Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-040 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०४०

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-040 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०४०

BBIU-040 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०४०

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? BBIU-040 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चाळीसावा वेळ - 50.54 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर आम्ही आज्ञेयवादी पान क्र 39 ते 40 आम्ही आज्ञेयवादी नाव पहिली पायरी फायनल प्रश्न 100% शरणागती दुसऱ्या पायरीचा प्रवास सुरु उच्चशक्तीची गरज उच्चशक्ती कोठे सापडेल आज्ञेयवादी आणि नास्तिक लोकांसाठी आशा बिगबुक फेलोशिप बद्दल बोलते फेलोशिप मधील कार्यक्रम हळूहळू मागे पडला ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव, मुंबई. म स बी बु भाग -040 ची प्रतिक्रिया प्रकरण -4 आम्ही आदनेयवादी, दुसरी पायरी. ?आपण मद्यासक्त झालेलो आहोत हे आधीच्या 3 प्रकरणातून आपल्याला समजल्यावर, त्यातून आध्यात्मिक अनुभवच आपल्याला वाचवू शकेल हेही समजले.?माझ्या परमेश्वराबद्धलच्या कल्पना मी त्याच्यावरील श्रद्धा निघून गेल्याने, किंवा नसल्याने आध्यात्मिक अनुभव घेणे मला शक्य नाही असे वाटत होते.?पण आता मला दोघांनमध्ये निवड करणे भागच होते 1. असेच मद्यपान सुरू ठेवून वेडेपणा अथवा मृत्युंला कवटाळणे 2.पूर्वीची परमेश्वरावर असलेली श्रद्धा मद्यापासून दूर राहू न शकल्याने बदलली होती. परमेश्वर हा दयाळू नसून तो शिक्षा देणारा आहे.परमेश्वराची मनातील ही संकल्पना बाजूला ठेवून आध्यात्मिक अनुभव घेणे, माझ्यासारख्या मद्यासक्ताला ते सोपे नसते.? ए. ए. त येणारे बहुसंख्य सभासद हे आदनेयवादी अथवा नास्तिक असतात, त्यामुळे हा प्रश्न टाळण्यासाठी ते 1 ली पायरी 100% घेतच नाहीत.?पुस्तकं सांगते की तुम्ही जर 1 ली पायरी 100% घेतलेली असेल तर हे अजिबातच अवघड नाही. आपण सरळ दुसऱ्या पायरीवर येतो.?कालांतराने आम्हाला हे दिसून येते की आध्यात्मिक जीवनाचा आधार घेतला नाही तर या आजारातून मुक्तता मिळणे कठीण आहे.त्यामुळे धीर सोडून चालणार नाही, हळूहळू त्याची आम्हांला प्रचिती येणार आहे.?माझी नैतिकता, बुद्धीमत्ता, पैसा, प्रसिद्धी, आणि इच्छाशक्ती मला मद्यशक्तीवर मात करण्यास कामी आले नाही, ?मी प्रयत्नाची शिकस्त केली, पण त्यावर मात काही करू शकलो नाही.त्यामुळेच मला ए ए त येणे भाग पडले. ?स्वखुशी (मनाची तयारी करून), प्रामाणिकपणा, आणि खुलेमन या तीन गोष्टी मला पुढील संपूर्ण कार्यक्रम समजून घ्यायला अत्यावश्यकच आहेत आणि जर मी त्याला नकार दिला तर आम्ही अयशस्वी होऊ शकतो.?शक्तीचा अभाव हाच आमचा मुख्य प्रश्न होता.जिच्या आधारावर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य व्यतीत करू शकणार होतो.?आम्हाला अशा शक्तीची गरज होती की जी मद्यशक्तीपेक्षा प्रबळ असेल आणि मानवी शक्तिपेक्षा श्रेष्ठ असेल.?आमचा जीव वाचवायचा असेल तर तिची मदत घेणे आम्हाला अपरिहार्य होते. ती कुठे मिळेल हाच आमच्यापुढे यक्षप्रश्न होता, कारण मी आदनेयवादी, अथवा नास्तिक होतो. ? ही उच्चशक्ती कुठे सापडेल याचाच उहापोह हे पुस्तक करणार आहे, जे की त्याचे मुख्य उद्धीष्ट आहे.?पूर्वीच्या पहिल्या 100 सभासदांनी त्यांच्या अनुभवातून हे पुस्तक लिहिलेले आहे, जे आध्यात्मिक तसेंच नैतिक आहे.?या पुस्तकात ते उच्चशक्तीबद्धल बोलणार आहेत कारण त्याशिवाय आम्हाला आता दुसरा पर्यायच नाही, आणि येथेच आमची झटापट सुरू होते. ?ज्यांनी आयुष्यभर परमेश्वराला दुर्लक्ष केले होते, त्याच्याबद्धल मनात खुन्नस बाळगला आहे, त्याचा त्याला तिटकारा आहे तोच मुद्दा पुस्तक खोडून काढत आहे असे त्याला वाटते,आणि तो पुढील कार्यक्रम घ्यायला तयार होत नाही. ?बिगबुक कार्यक्रमा बाबत बोलते (12 पायऱ्याचा कार्यक्रम), फेलोशिप बद्धल नाही.?आध्यात्मिक जीवन (12 पायऱ्यांचा कार्यक्रम) हा मद्यपाश या आजारावरील उपाय आहे, फेलोशिप हा उपाय नाही.?कार्यक्रमातून फेलोशिप निर्माण झालेली आहे, फेलोशिप मधून कार्यक्रम निर्माण झालेला नाही.?त्यामुळे कार्यक्रमावर आधारित आपले अनुभव कथन केल्यास ए ए ची वाढ होणार आहे, पण दुर्दैवाने तसें होताना दिसत नाही. त्यामुळेच पूर्वीची 70/75% असलेली ए ए ची वाढ आजच्या घडीला खूपच कमी आहे. केदार भाऊंचे मनापासून आभार.तुम्ही दिलेले साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देऊन पुढील भाग पाठवावा ही विनंती करतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ✍️?✍️?✍️? आभार आभार आभार ???

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह , जोगेश्वरी. मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 40 दुसरी पायरी , आम्ही अद्नेयवादी प्रकरण सुरू. .. .. . आम्ही जरी आता प्रौढ नागरिक जरी झालेलो असलो तरी आमच्या परमेश्वरा बद्दलच्या संकल्पना अगदिच लहान मुलासारख्या आहेत. श्रध्दा देवाविषयी घरच्यांनी आणि समाजाने शिकवलेल्या होत्या. पण देवाला मी कधीही नीट ओळखू शकलो नाहि. या पूर्वीच्या प्रकरणातून मद्यासक्त म्हणजे काय हे आम्हाला कळलेले आहे. मद्यपाश् आजार ,मद्यासक्त असलेला व मद्यासक्त नसलेला या मधील फरक आधीच्या प्रकरणातून समजलेला आहे. पहिल्या प्यारा मध्ये जे दोन प्रश्न विचारलेले आहेत ते जर आम्ही नवगतासमोर ठेवले तर आधीचे वीस प्रश्न आणि आताचे बारा प्रश्न याची गरज उरणार नाही. 1)प्रामाणिक इच्छा असतांना देखील मी मद्य सोडू शकतो का ?. .. . 2)मद्यपान करायला लागल्यानंतर त्याच्या प्रमाणावर ताबा ठेवता येतो का ? बिल सांगतात मनोमनी कबुली , अंतःकरणापासून जर आम्ही किंवा नवागतानि या दोन प्रश्नांची उत्तरे दिली तर आम्हाला कळणार आहे आम्ही मद्यपी आहोत अथवा नाही. ????मी अद्नेयवादी किंवा नास्तिक असेल तर काय ? आम्ही जर अशीच परिस्थिती चालू ठेवली आणि वेडेपणाच्या अंतापर्यंत दारूचा मी पाठलाग करू लागलो तर एकतर माझा अकाली म्रुत्यु होणार किंवा मी वेडा होणार. पण आता मला चॉईस आहे या कार्यक्रमाचा पाठलाग करणे. ए. ए. मध्ये येणारे 90% लोकं नास्तिक किंवा अद्नेयवादी असतात. परमेश्वराला काय अभिप्रेत आहे माझ्याबाबत त्याची इच्छा काय आहे हे मी कधीच समजून घेतले नाही. ए. ए. मध्ये येण्याअगोदर देवाविषयी माझा दृष्टीकोन चुकीचा होता. त्यामुळे प्रार्थना ,पूजा याचा काहीही उपयोग होतं नव्हता. माझी श्रध्दा हॅन्गिग कंडीशन मधली होती. परमेश्वर आहे पण त्याने माझे कधीच भले केले नाही. तो माझ्या कुठल्याही समस्ये मध्ये उभा राहिला नाही. ही श्रध्दा जोपासत मी ए. ए. मध्ये आलो. ए. ए. मध्ये काही काळ लोटल्यानंतर लक्षात आले मी जर आध्यात्मिक जीवनाचा आधार घेतला नाही तर पुढे माझ्या जीवनात अंधार आहे. पुस्तक सांगते तुम्ही आस्तिक असा नास्तिक असा किंवा अद्नेयवादी असा तरी तुम्ही 12पायऱ्यामधले आध्यात्मिक जीवन घेऊ शकता. माझ्या अक्कलेच्या जीवावर ,माझ्या नैतिकतेच्या जीवावर ,मी खूप धार्मिक पुस्तके वाचलीत ,प्रवचने ऐकली आहेत हे सगळं जर आमच्या मद्यासक्तिवर मात करण्यास पुरेसे असते. तर आमच्या मद्यासक्त दारुड्यानपैकी बहुतेक जणांची सुटका झाली असती. ते सगळं आम्हाला उपयोगी पडले नाही म्हणून आम्हाला ए. ए. मध्ये यावे लागले. ????मनाची तयारी ,खुले मन ,व प्रामाणिकपणा हे प्रत्येक पायरी करिता आवश्यक आहे. शक्तीचा अभाव हा आमच्या पुढील यक्ष प्रश्न होता त्यामुळे आम्हाला अशा शक्तीची गरज होती जी मानवी व माद्यशक्ती पेक्षा प्रबळ असेल. आता आम्ही 100% शरणागती पत्करली आहे. हतबलता आम्ही मान्य केली आहे. आता आमच्या समोर पर्याय राहिला नाही. आम्हाला जिवंत राहण्या साठी उच्चशक्तीची मदत घेण्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. बिगबुक कार्यक्रमा बद्दल बोलतं ,फेलोशिपहा उपाय नाही. आध्यात्मिक जीवन हा उपाय आहे. दारू पिताना मी काय काय गाढवपणा केला हेच फेलोशिप मध्ये म्हणजे सभे मध्ये सांगितलं जातं. आलेल्या नवागताना बिगबुक मधील कार्यक्रम सांगितला पाहिजे. 12 पायऱ्या बद्दल वारंवार बोलले पाहिजे. त्यामुळं नवागत आकर्षित होतील आणि उच्चशक्तीच्या मदतीने टिकतील. पण भारतातल्या फेलोशिप मधील दुर्दैव आहे आपण नको तेव्हढे फेलोशिपला महत्व दिले त्यामुळं कार्यक्रम मागे पडत गेला. फेलोशिप पुढे आणि ए. ए. ची पुस्तके मागे हेच चित्र बघायला मिळते. पण मी आशावादी आहे हे चित्र नक्की बदली होईल पण त्याच्या करिता केदार भाऊंन सारखे अनेक केदार निर्माण व्ह्यायला पाहिजेत. ????केदार भाऊ तुमच्या मेहनतीला सलाम ,तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची हमी देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. .. .??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video
162055119180221644515609
video