IBM-013 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१३

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM-013 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१३

IBM-013 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०१३

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 13 ( IBM-013 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-013 - तेरा ( तेरावा ) वेळ - 60.16 मिनिटे प्र क्र 51 ते प्र क्र 54, स्वार्थ, इच्छा व जीवन, तिसरी पायरी समाप्ती ???????

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?

कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Maroti Bobate

    Maroti Bobate . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ मित्रानो। माझे नाव मारोती बि। खनन समुह भिवापर चंद्रपूर मी एक दारूडा ए ए सभासद आहे। सूधारीत बिगीनर्स मिटीग भाग क्रंमाक 013भाग ची प्रतीक्रिया मला समजलेल्या नुसार। तीसरी पायरी इच्छा व जिवन सोपविने मी मद्यपान करीत असताना वाईट होईल त्या दृष्टीने कधीही विचार कलेला नाही मि कितीहि चागले वागण्या प्रयत्न करायचा परंतू माझा जिवनात कोणासी तरी वाद निर्माण होत होते मि स्वंःताचा ईच्छाशक्ती वर जिवन जगण्याचा प्रयत्न करायचा हे सारे नाटका सारखे वाटत होते मि माझा मर्जीनूसार ईच्छा शक्तीचा वापर केला परंतु मी माझा भावना कायम ठेवता आले नाही लोकानी माझा सारखे मनाप्रमाने का करीत नाही माझासारखे लोक खूष होतील असा माझा भावना ठेवून मी नटश्रेष्ट वागायचो मी लोकांना सारखा वाईट वृतीचा नाही समजायचो मी हिन वृतीचा अंहकारी स्वार्थी अप्रामाणिकपना हे सारे गुण माझात संपन्न होते माझासी लोक चागले वागत का नाही असे वाटायचे मी कधीही कोणाचे एकुन घेतले नाही व माझे चरीत्र दोष मान्यही केले नाही मी इतराकडेच बोठ दाखवायचे माझा मनोमन भावना असायचा यात लोकाचेच दोष आहे माझा मुलभूत समस्येचा विसरहि पडत गेला तरी मी दयाळु पना दाखवत होतो मी स्वतालाच शहाना समजत होतो माझा मनस्थिलाबळी पडत होतो मी सारे सूख शांती पायाशी लोटागण घालत होतो असा गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत रहीलो परंतू मी त्याचा गोधळाचा जनकच बनत गेलो माझामध्ये शेकडो प्रकारची भिती घेवून जगत गेलो आत्मवंचना स्वार्थ आत्मकरूना स्वयकेंद्रीता माझा जिवनात संकटाचे मुळ कारण बनत गेले मी कधीही न चुकता निर्णय घेण्याचा प्रयत्न केला नाही मी स्वताच दूख ओढवुन घेत होतो मला मद्यपासून स्वतःला सूटका करू शकलो नाही मला मरणाचा दारा पर्यत जावे लागले तरी मी उच्चशक्ती। परमेश्वराची जाणीव करून घेतली नाही आणी मद्यपान लांबही राहता आले नाही माझाकडे दुसरा कोणताच मार्ग उरलेला नाही परमेश्वराची उच्चशक्ती ची जाणीव नव्हती माझी ईच्छा असतानाही मला मद्यपान बंद करता आले नाही ईच्छाशक्तीवर जिवनसूध्दा जगता येत नव्हते ईच्छा शक्तीचा बळावर माझे चरीत्र दोष ओळखता आले नाही व दुर करता येत नव्हते त्यासाठी मला परमेश्वराची मदत घेतल्याशिवाय पर्याय नव्हते मी परमेश्वरावर अवलबुन राहीलो माझे जिवन सूखमय होऊ शकतो माझा जिवनात अनेक प्रकारचे घटना घडत गेल्या आहेत मला परमेश्वराचा सहवासात राहून माझा गरजा पुर्ण करून घ्यावयाचे होते परमेश्वरावर माझे जिवन सोपवून द्यावे तेव्हाच माझा अल्पसा योजना बददल परमेश्वर विचारधिन असतो जिवन व ईच्छा परमेश्वरावर सोपविणे देणे म्हणजे परमेश्वराची योजना चागली अशू शकते माझा भविष्यात भिती नाहीशी होईल मला आध्यात्मीकता पाऊल उचलण्यासाठी परम मित्र गुरू पत्नी याच्या सारखा लोकांबरोबर मला समजुन घेणे कधीहि चागले असतो मला उंटा प्रमाणे परमेश्वराकडे घुटके टेकून मला प्रार्थना करावे लागते तरच मला परमेश्वर सर्व बधनातुन मुक्त करु शकतो देवा तुझा ऊच्छ शक्तीची मला जाणीव होईल मी ईतरानाही तुझा उच्छतीची जाणीव होईल व त्याची मला जाणीव होईल मला समजले त्या प्रमाणे प्रतिक्रिया देत आहे

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      मारोती भाऊ ? आभार आभार आभार ???

  • Prashant

    Prashant . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मी प्रशांत एक बेवडा. स्नेह वर्धन समुह ठाणे. IBM भाग 13 प्रतिक्रीया. मला कधीच कोणाचे वाईट करायचे नव्हते. पण अनाहूतपणे अथवा मुद्दामहुन मी ते करतच राहिलो. मद्यपाशात असताना मी कोणाचेच ऐकले नाही.माझे जर चांगले झाले तर मीच जबाबदार आणि वाईट झाले तरीही मीच जबाबदार, असे समजायचे. मग काही वाईट होत असेल तर मलाच स्वतःहून काहितरी करावे लागेल. दुसरे कोणी मदत करू शकत नाही, असा समझ होता. मग परमेश्वर किंवा उचचशक्ती तर फारच लांब. सर्वांनी माझ्या मनासारखे वागावे, हा आत्यंतिक अट्टाहास. आणि सर्वांपेक्षा मी जग जास्त बघितलं आहे, असा भयानक अहंकार. माझे माझ्या मुलावर जीवापाड प्रेम आहे. मी त्याच्याकडे बघून सुद्धा दारुपसून लांब राहू शकत नव्हतो. तर इतर मानवी शक्ती माझ्यासाठी फारच शुल्लक होत्या. मग या दारूच्या चक्रातून बाहेर काढण्यास फक्त उच्च शक्तीच मदत करू शकते, यावर खात्री झाली. किंबहुना दुसरा पर्यायच नव्हता. मद्यपाशात बऱ्याचवेळा भयानक परिस्थितीत अडकलो. पण प्रत्येक वेळेला सुखरूप सुटलो. होय! मद्यशक्ती खुप प्रबळ आहे, पण माझी उच्चाशक्ती त्याहूनही प्रबळ आहे. आणि ती कितीतरी पटीने सामर्थ्यवान देखील आहे. कारण तिने प्रत्येक वेळेला मला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढले. मला जर याची जाणीव झाली आहे तर त्याच उच्च शक्तीवर अवलंबून राहून, मी जर माझे स्वातंत्र्य उपभोगू शकतो, तर त्यात गैर काय? ज्यावेळेस मला माझ्या उच्च शक्तीची जाणीव झाली, त्यानंतर हळूहळू आतापर्यंतच्या आयुष्यात तिचा सहभाग प्रकर्षाने जाणवू लागला.माझ्या आयुष्यातील बरेचसे निर्णय मी स्वतःहून घेतले नसूनही, त्यांचेच परिणाम माझ्या आयुष्यातील छोट्या मोठ्या विजयाचे संकेत देत होते. ते निर्णय माझ्या उच्च शक्तीने माझ्यासाठी घेतले होते. आतापर्यंत मी उच्च शक्तीवर अजाणतेपणे अवलंबून होतो. जाणतेपणाने अवलंबित्व पत्करणे हे माझ्यासाठी खूप कठीण आहे याची मला जाणीव आहे. माझा नैसर्गिक स्वभाव त्याआड येईलच. पण माझे आयुष्य माझी उच्च शक्ती जास्त व्यवस्थित चालवू शकते याची हमी देखील आहे. आणि इथेच माझ्या तिसऱ्या पायरीचा प्रवास सुरू होतो. धन्यवाद केदार भाई.

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      प्रशांत भाऊ ? खूप खूप खूप सुंदर ????? आपण खूप छान काम करत आहात ???? आपल्या ह्या सुंदर प्रतिक्रिया वाचून त्यातली आपली आत्मीयता दिसते ? असेच ऐकत रहा आणि अशाच सुंदर सुंदर प्रतिक्रिया इथे आणि त्या त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करत रहा ही विनंती आहे. ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video
1620a99c0143671644861888
video