Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-044 मसबाबा-०४४

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-044 मसबाबा-०४४

BBIU-044 मसबाबा-०४४

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

BBIU-044 मसबाबा-०४४ मला समजलेले बिगबुक हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? BBIU-044 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - चव्वेचाळीस वेळ - 49.57 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर आम्ही आज्ञेयवादी (दुसरी पायरी) वाचन क्रमशः पान क्र 45 ते 47 आम्ही आज्ञेयवादी दुसऱ्या पायरीचा प्रवास क्रमशः आम्ही पण त्या लोकांसारखे मूर्खच नव्हतो काय ? आमची अस्ताव्यस्तता विश्वास ठेवणे भागच पडले श्रद्धा मिळविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी "कृपा प्रसादाची यादी" ??? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 3 दिवसांनी मागवावा. ?????

माझा दुसरा चॅनेल - Kedar Seeker सनातन संस्कार

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव (पूर्व). मुंबई. म स बी बु भाग -044, प्रकरण -4 आम्ही अज्ञ्येवादि (दुसरी पायरी) ?प्राचीन काळातील लोक जसे अधिभौतिक विश्वाबद्धल पूर्वग्रह दूषित आणि तर्कदृष्ट राहिले (पृथ्वी चपटी आहे, खगोलशास्त्र वगैरे काही नाही) त्यांचप्रमाणे परमेश्वरा बाबत आमचे खुले मन न्हवते.?राईट बंधुच्या उड्डाणासंबंधी, किंवा प्रोफेसर रॅगले यांचे उडणारे यंत्र जसे बुडाले होते, तसेंच गणितीतज्ञानी हे सिद्ध केले होते की मनुष्याला कधीच उड्डाणं करणे शक्य नाही तो हक्क फक्त पक्षानाच आहे अशी उदाहरणे, पुढील 30 वर्षात खोट्या ठरल्या. तशाच परमेश्वराबद्धल आमच्या मूर्ख कल्पना न्हवत्या का? ?आत्ताच्या लोकांच्या विचारसरणीत फरक पडलेला आहे, आज विज्ञानाच्या बाबत आपले मन खुले झालेले आहे त्यामुळे त्या कल्पना खोट्या वाटत नाही आणि त्यामुळे त्याच्यावर आपण आज विश्वास ठेवू शकतो, त्याचा सहजपणे स्वीकार करतो.?औषधांच्या बाबतीत जर एखादे औषधं चालले नाही तर दुसरे औषधं बदलून पाहतो अथवा डॉक्टर बदलून पाहतो तसेंच दारूच्या बाबत आपले सर्व मानवी उपाय चालले नाहीत तर त्यावर आम्ही जे उच्चशक्तिबद्धल बोलतो त्याचा विचार करायला काय हरकत आहे??बिगबुक प्रमाणे आपली अस्तव्यतता काय होती ते आपल्याला समजल्यावर, आणि जर आम्ही मद्यशक्ती पुढे हतबल आहोत, आणि त्यामुळे आमचे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे तर त्यावर उपाययोजना शोधून काढणे हे आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे.?आम्ही ए ए त आल्यावर मिटिंग मधील बहुतांश सदस्यांचा उच्चशक्ती वरील विश्वास आणि त्यामुळे त्यांचे सुरळीत झालेले जीवन आम्ही पहिले, आणि त्याच उच्चशक्तीला आम्ही समजत न्हवतो किंवा समजून घेत न्हवतो.?तेथे आमची बुद्धी, अक्कलहुशारी कामी येत न्हवती.?त्यांनी आम्हाला ए ए लाच उच्चशक्ती मान असे सांगितल्यावर आम्हांला परमेश्वरावरील अविश्वास सोडणे भागच पडले.?स्वयंपूर्णतेतुनच आमचे प्रश्न सुटतील, आम्हांला दुसऱ्या उच्चशक्तीची गरजच नाही हे जे विचार आम्ही धरून ठेवले होते तेंव्हा राईट बंधू उड्डाणं करूच शकणार नाहीत अशी चेष्टा करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्हांला वाटू लागले. ?ए ए त येण्याआधी दारु थांबाविण्यासाठी ज्या कल्पना होत्या त्या यशस्वी झाल्या न्हवत्या पण उच्चशक्तीची ही कल्पना यशस्वी ठरली. येथेच आम्ही दुसरी पायरी घ्यायला सुरुवात केली.?तर्कशास्त्र लॉजिक वर आमचा विश्वास असल्याने परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे आम्हांला फायद्याचे आहे हा विश्वास ठेवणे आम्हांला अवघड जात होते.?आम्ही पहिली पायरी मनोमन स्वीकारल्यावर आम्हांला निर्भयपणे निवड करावी लागली की परमेश्वर हे सर्वस्व आहे किंवा तो नाहीच आहे.?जेंव्हा आम्ही उच्चशक्तीवर विश्वास ठेवण्याची मनाची तयारी आहे असे म्हटल्यावर आम्ही दुसरी पायरी घ्यायला सुरुवात केली आहे असे बिगबुक आश्वासन देते.?आमच्या बाबतीत हे सिद्ध झाले आहे की या साध्या पायावर आम्ही आध्यात्मिक अधिष्ठान उभे करू शकतो ?उच्चशक्तीची गरज पटल्यावर श्रद्धेचा प्रश्न टाळता येणे आम्हांला शक्य न्हवते.?जेंव्हा आम्ही मनाची तयारी, विश्वास ठेवून श्रद्धेच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केल्यावर आमच्या डोळ्यात तेज चमकू लागले आणि आमच्यासाठी मदतीचे हात पुढे येऊ लागले. (आश्वासन)?हे तेव्हडे सोपे न्हवते. श्रद्धा मिळवण्यासाठी आम्हांला इशकृपेची यादी करणे महत्वाचे कसे आहे याबद्धल सविस्तर माहिती मिळाली. केदार भाऊंनी खूप छान पद्धतीने मेहनत घेऊन हे सर्व समजावून सांगितले आहे, त्यामुळे हे साहित्य कोणालाच देणार नाही याची ग्वाही देतो आणि पुढील भागाची अपेक्षा करतो. आभार, आभार, आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      आभार आभार आभार !! ???

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणांस सादर प्रणाम ,मी राजेश पी. ( नई रोशनी समूह ) मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 44 ची प्रतिक्रिया. .. .परमेश्वराच्या संकल्पनेला आम्ही कसे लांब ठेवले. कुठले वेडे विचार होते. देवा बाबत आमचे मन खुले नव्हते. देवा विषयी कोती मनोव्रुत्ति. पक्ष्यांना उडण्याचा अधिकार आहे , माणसांना नाही हे राईट बंधूनि खोटे ठरविले , विमानाचा शोध लाऊन. त्यानंतर वीस वर्षांनी आकाशात मानवाचे प्रभुत्व दिसायला लागले. प्रोफेसर रॅगंले यांनी बनविलेले इंजिन सुध्दा समुद्रात पडले होते. राईट बंधूंची आणि प्रोफेसर रॅगंले यांची लोकांनी टर उडवली होती. आज आपण जर सायन्सच्या बाबतीत जर खुले मन ठेवले आहे तर परमेश्वराच्या बाबतीत देखील मला खुले मन ठेवायला पाहिजे. जुनी कल्पना ,जुने दृष्टीकोन आता मला बदली करायला पाहिजे. व्यक्तिगत संबंधांच्या बाबतीत आमच्या समोर अनेक समस्या उभ्या होत्या. भावनात्मक उद्रेक मला आटोक्यात ठेवता येतं नाही. भावना नीट व्यक्त करता येतं नाही. मला राग आला तर एवढा प्रचंड येतो जणू जमदग्नीचा अवतार ,मला दुःख झालं तर मी समुद्राच्या तळाशी जाऊन बसतो. मी जर निराश झालो तर स्वतावर दया करायला लागतो. ???1)दुःख वैफल्य यांचे आपण बळी झालो आहोत ही आमची भावना झाली आहे. .. . 2) आम्ही जीवन जगू शकत नव्हतो , आमच्या हातून आता काहीच होणार नाही. असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आम्ही स्वतःला निरुपयोगी समजत होतो. .. . 3)आम्ही भीतीग्रस्त झालो होतो. नंतरच्या काळात भीतीचं आमच्यावर राज्य करतं होती. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची आमची कुवत राहिली नव्हती. आमच्या अगोदर आलेल्या सभासदांनी विश्वचैत्यन्यावर विश्वास ठेवून ए ए वर श्रध्दा ठेवून आपले प्रश्न सोडविले होते. 1)दुसऱ्या पायरीचे फायनल दोन मुद्दे होते. एक तर परमेश्वर आहे तरी किंवा नाही तरी. (यात मला निवड करायची होती ). .. . 2)आमचा विश्वास ठेवण्याची मनाची तयारी आहे काय ?याचे उत्तर होय असेल तर आमची दुसरी पायरी घेण्याची तयारी झाली आहे. . तुमचे अभिनंदन. .. . 3)ए ए ला उच्चशक्ती मानून तयारी करता येते का ? अगदी 100% सुरवात करता येते. ???पॉल एफ. यांच्या वर्कशॉप मध्ये पॉल एफ सांगतात मी एका ए ए च्या मीटिंग मधून बाहेर पडलो. बाहेर ओल्डटायमर होता. ते म्हणाले पॉल माझी उच्चशक्ती मी तुला काही दिवसाकरिता उधार देतो. पॉल यांनी ती ऑफर स्वीकारली. पॉल एफ त्या वर्कशॉप मध्ये सांगतात उच्चशक्ती उधार घेण्याची जी ऑफर मी स्वीकारली तीच उच्चशक्ती आजही माझ्याबरोबर कायम आहे. आता मला श्रध्देची गरज पटली आहे. विश्वास ठेवण्याची मनाची तयारी देखील आता झाली आहे. आमच्या थकलेल्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक आलेली आहे. विश्वासाकडून श्रध्देकडे जाणे एवढे सोपे नव्हते. श्रध्दा मिळविण्यासाठी आणि ती वाढविण्यासाठी एक आक्टिविटी जी रोजचे प्रतिबिंब मधील 21मे या दिनाची आहे. ती केदार भाऊंनी सुध्दा केलेली आहे. आणि आपल्यां बिल साहेबांनी देखील केलेली आहे. मला देखील ती करावी लागणार जन्मापासून ते या क्षणापर्यंत अशा कुठल्या देवाच्या क्रुपा माझ्यावर झाल्या ज्यात माझे कर्तुत्व काहीच नव्हते. .. .. ???केदार भाऊ तुमचे खूप खूप आभार तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ??????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video
16212a55f9e46d1645389151
video