BBIU-029 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२९ BBIU029

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-029 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२९ BBIU029

BBIU-029 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२९ BBIU029

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

इथे क्लिक करून फॉलो करा

BBIU-029 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२९ BBIU029

?

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे.

?

मित्रांनो

कृपया चॅनलला फॉलो करा 

व्हिडिओला लाईक करा 

प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा 

?

माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा.

*Kedar Seeker सनातन संस्कार* 

आत्मनिर्भर भारत की जय !!!

???????????

???

BBIU-029

"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"

भाग - एकोणतीसावा

वेळ -  48.25 मिनिटे

???

 

सेट असाईड प्रेयर 

पान क्र 20 ते 22

याला उपाय आहे वाचन क्रमशः  

 पुस्तक अनुवादातील सुधारणा

Musts

मद्यपयांचे वर्णन क्रमशः 

पहिला घोट 

आमचा मुख्य प्रश्न 

मद्यपी असे का वागतो 

आम्हीच आजारी का झालो ?

इच्छाशक्ती चालत नाही 

???

 

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा.

?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव (पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -29 ची प्रतिक्रिया ?दारुड्या असलेल्या लोकांच्यात काहीतरी खास कौशल्य हे असते आणि ते दाखवतातही, आणि स्वतःसाठी, कुटुंबासाठी रचलेले मनोरे स्वतःच कोसळूनही टाकतो. ?निद्रादिन अवस्थेतील मद्यपी दारूचा अंमल कमी झाल्यावर लपविलेल्या बाटल्यांचा शोध घेतो ?दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यासाठी तो मद्य, आणि गुंगीच्या गोळ्या यांचा वापर करतो पण एक दिवस असा येतो त्याचा विवेक नष्ट होतो आणि तो मद्याच्या पूर्ण अधीन होतो.त्यानंतर त्याला मॉर्फीन अथवा गुंगीच्या गोळ्याने बरे वाटले नाही तर शेवटी त्याला हॉस्पिटल, अथवा रिह्यब मघ्ये ठेवावेच लागते.?प्रत्येक मद्यपिच्या वागणुकीच्या पद्धती एकसारख्या नसतात, परंतु वरील वर्णनावरून आपल्याला ओळख पटते.?दारूच्या पहिल्याच घोटाने आपल्यावर नामुष्की येणार, आणि त्यातून येणारे दुःख आणि अपमान याला तोंड द्यावे लागणार हे माहित असतानाही तो असा का पितो? तो मद्यपान थांबवू का शकत नाही? इतर बाबतीत तो आपली इच्छाशक्ती प्रभाविपणे वापरू शकतो ती मद्यासमोर का कुचकामी ठरते?असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात, आणि त्यांची उत्तरे सांगण्याचा प्रयास हे पुस्तक करते ?मद्यपी असा का वागतो ह्यांचे 100% उत्तर आमच्याकडे नाही असे पुस्तक सांगते तरीसुद्धा त्यातून तो बाहेर कसा येऊ शकतो यावर आमच्याकडे उपाय आहे. ?जोपर्यंत तो मद्य पित नाही तोपर्यंत त्याच्या प्रतिक्रिया या साधारण व्यक्तीसारख्या असतात. पण मद्य घेतल्यावर त्याच्या शारीरिक आणि मानसिक बाबतीत असे काहीतरी घडते की ज्यामुळे मद्यपान थांबवणे त्याला जवळजवळ अशक्यच होते, आणि आमचे अनुभव त्याला पुष्टीच देतात.?म्हणूनच मद्यासक्ताचा मुख्य प्रश्न हा त्याच्या शरीरापेक्षा मनातच केंद्रित झालेला असतो.?आपला गुन्हा लपविण्यासाठी तो अनेक सबबी सांगतो, आणि स्वतःचा सर्वनाश घडवून आणतो. म्हणून जिथे विचार उत्पन्न होतात तेथेच मला उपचार करायला हवेत.?आपण त्यांच्या अर्थशून्य सबबीवर लक्ष वेधले तर तो ती गोष्ट हसण्यावारी नेतो, नाहीतर तुमच्यावर चिडतो, बोलणे बंद करतो. ?आता दारूचे समर्थन करणारे त्याचे मित्र होतात आणि दारूला वाईट म्हणणंरे मित्र, नातेवाईक शत्रू होतात.?एकदा का मद्यपाश आजाराने त्याच्यावर प्रभाव टाकला की त्याची मती कुंठीत होते. ?त्याला एकच आशा असते की कधीतरी मी या मोहातून मुक्त होईन, पण त्याला संशय वाटत असतो की आपल्या घटका भरल्या आहेत आणि आपण आता पित पितच मरणार. ?मद्य पॉवरफुल का आहे? ?मद्याविरुद्ध विचार करण्याची शक्तीच काढून घेण्याची शक्ती मद्यामध्ये असते.?पहिल्या घोटाला नाही म्हणण्याची शक्तिच हा आजार काढून घेतो.?आम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, त्यामुळे मद्य सोडण्याचा विचार सुद्धा आम्ही करू शकत नाही. ?आमच्या जवळच्या लोकांना ही आशा असते की आम्ही कधीतरी आमच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यावर विजय मिळवू, कारण त्यांना हा आजार माहित नसल्याने इच्छाशक्ती हा त्यावरील उपाय नाही, उपाय हा अध्यात्मिक आहे.?प्रत्येक मद्यप्याच्या जीवनात एकवेळ अशी येते की त्याची इच्छाशक्ती इतर बाबतीत काम करते पण मद्याच्या बाबतीत ती काम करत नाही, आणि तसें त्याला संकेतही मिळतात पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो.?जेंव्हा मला इच्छा होते (विलक्षण मानसिक ओढ), तेंव्हा आठवड्यापूर्वी झालेल्या विटंबनेची, भोगलेल्या दुःखाची त्याला आठवणही होत नाही ?भीतीमुळे आपण फारकाळ दारूपासून दूर राहू शकत नाही, आणि दररोज मीटिंग करून तो कदाचित दारूपासून लांबही राहील पण त्याच्या डोक्यावर सतत दारूची टांगती तलवार असते. म्हणूनच मद्यपाश आजार हा पॉवरफुल आहे. आपण दिलेले साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देतो आणि पुढील भाग 30 ची अपेक्षा करतो. केदार भाऊंचे मनापासून आभार. ??????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

    विजय भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Vijay kadam

    Vijay kadam . 1 year ago

    ??????? ?नमस्कार केदार भाऊ मी विजय के.नवप्रकाश समुह ठाणे. बिगबुक वाचन सभा भाग ८३ या भागात बिगबुकच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष सभेत बिगबुकच्या फायद्याबद्दल शेअरिंग्ज झाले. ?बिगबुक मुळे ए.ए.मध्ये आज आनंद आणि मज्जा येते. आमच्या द्रुष्टीकोनात बराच बदल झाला. संकट आले की परमेश्वरावर सोपवून देण्याची सहज व्रुत्ती निर्माण झाली आहे. ?ए.ए.चा खरा उद्देश खरा हेतू परमेश्वर आणि आपल्या भोवतालचे लोक यांची जास्तीत जास्त सेवा करण्याच्या दृष्टीने पात्र होणे हाच आहे. बिगबुकने बाराव्या पायरीचे काम केले आहे. ?बिगबुक मध्ये बिल डब्ल्यू मला स्वातंत्र्य देतात तर दुसरीकडे सतर्कतेचा इशारा देतात, माझ्यासारख्या दारुड्याला बांधून ठेवतात, मला गाफील राहून चालणार नाही अशी सुचना करतात असे सुंदर लिखाण बिगबुक मध्ये बिल डब्ल्यू यांनी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे आजचा दिवस दारू न पिण्यासाठी सुध्दा झगडा करावा लागत नाही. कारण आता आम्ही नियमित बिगबुक वाचतो. ?आम्ही बिल डब्ल्यू , डाँक्टर बाँब, जो आणि चार्ली, पाँल एफ या सर्वांचे आभारी आहोत. कारण या सर्वांनी आम्हाला बिगबुक समजावून सांगितले आहे. बिगबुक मध्येच बारा पायर्या घेण्याची सोपी पध्दत आहे. ?मी जे स्वतःसाठी करू शकत नाही ते परमेश्वर माझ्यासाठी करणार आहे आणि जे मी स्वतःसाठी करू शकतो ते परमेश्वर माझ्यासाठी अजिबात करणार नाही हा फरक समजला. मी आजारी माणूस आहे याची अप्रतिम ओळख बिगबुक मधून मिळाली.बिगबुक मुळे माझ्या विचारात बदल झाला आता चांगले विचार मनात येतात जीवन बदलण्याचा कार्यक्रम बिगबुक मध्येच आहे. ?केदारभाऊ मी माझे हायलाईट केलेले बिगबुक, बारा आणि बारा बुक, नोटबुक, आँडियो कोणालाही देणार नाही. मला पुढील बिगबुक वाचन सभा भाग ८४ पाठवा ही विनंती आहे धन्यवाद. ???????

  • Vijay kadam

    Vijay kadam . 1 year ago

    ??????? ?नमस्कार केदार भाऊ मी विजय के.नवप्रकाश समुह ठाणे. बिगबुक वाचन सभा भाग ८४ वा.या भागात बिल डब्ल्यू म्हणतात आम्ही जेंव्हा दुसऱ्या एका व्यक्ती बरोबर प्रामाणिक राहिलो तर स्वतःशी व परमेश्वराशी प्रामाणिक रहातो. मी आयुष्यभर स्वतःला,दुसऱ्याला व परमेश्वराला फसवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मला अन्य एका व्यक्ती बरोबर प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे. इतरांची फसवणूक करणे हा माझा चारित्र्य दोष होता. आता मला कळून चुकले की परमेश्वर माझी सर्वात मोठी समस्या सोडवू शकतो म्हणून मला प्रामाणिक राहिले पाहिजे. स्वतःची फसवणूक केली तर मला अपयश व निराशा येईल आणि त्यामुळे दारू केव्हाही माझ्या हातात येईल. ?बिल डब्ल्यू म्हणतात माझे शीर जरी आभाळाच्या वर असले तरी पाय मात्र जमिनीला लागलेले असावे. नवव्या पायरीत नुकसान भरपाई करताना मी आता खूप सुधारलो आहे धार्मिक झालो आहे मी आता दारू पित नाही हे सांगण्याचे मुळीच कारण नाही. चुकीची दुरुस्ती करण्याची कळकळीची इच्छा पाहून समोरचा माणूस प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. मला नववी पायरी घेतलीच पाहिजे नाहीतर मी अस्वस्थ, वैतागलेला,चिडचिडा राहणार आहे. ही पायरी न घेतल्याने स्लीप देखील होवू शकते. ?ज्यांच्याबद्दल मला तिटकारा आहे, राग आहे अश्या लोकांनकडे जाऊन मला त्यांची माफी मागितली पाहिजे ते आमच्या द्रुष्टीने अधिक फायद्याचे ठरेल. माफी मागताना मी त्यांच्याशी वाद घालणार नाही. त्याला प्रामाणिक पणे मला सांगावे लागेल माझ्यात सुधारणा केल्याशिवाय माफी मागितल्या शिवाय माझे मद्यपान थांबविता येणार नाही म्हणून मी तुमची क्षमा मागत आहे. ?बिल डब्ल्यू म्हणतात माफी मागितल्या शिवाय मला शांतता मिळणार नाही. मला हितकारक अशी कोणतीही गोष्ट पार पाडता येणार नाही. त्याने काय करावे हे मी मुळीच सांगता कामा नये,त्याच्या दोषांची चर्चा मी करणार नाही. मी माझ्या दोषांवरच लक्ष केंद्रित करीन त्यावेळी माझे वागणे शांत, खुल्या दिलाचे आणि मनमोकळे असेल तर परिणाम खात्रीने आनंददायकच ठरतील. ?केदारभाऊ मी माझे हायलाईट केलेले बिगबुक, नोटबुक, आँडियो कोणालाही देणार नाही. मला पुढील बिगबुक वाचन सभा भाग ८५ पाठवा धन्यवाद. ???????

You may also like

16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video
16283f9ff9f10b1652816383
video