Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-032 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३२ BBIU032

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-032 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३२ BBIU032

BBIU-032 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३२ BBIU032

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ? मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-032 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बत्तीसावा वेळ - 48.38 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 23 ते 25 रोलँड हजार्ड आणि डॉ युंग यांची भेट आणि संवाद दृष्टिकोनात बदल विचार करण्याच्या पद्धतीत बदल आश्वासने नुसता आजार माहीत असून उपयोग नाही ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास राजेशचा सादर प्रणाम ,मला समजलेले बिगबुक भाग 32 ची प्रतिक्रिया खालील प्रमाणे. .. .. . ए. ए. चा कार्यक्रम माझ्या स्वतःकडे बघण्याचा ,इतर लोकांकडे बघण्याचा ,व देवाकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदली करण्याचा आहे. या सगळ्या आध्यात्मिक अनुभवामूळे आमच्या मध्ये क्रांतिकारक बदल झाले आहेत. पूर्वी जी शंका होती देव आहे की नाही ,असेल तर त्याने माझे कधीही भले केले नाही ,तो माझ्या बरोबर कधीही उभा राहिला नाही. पण आता या शंकांना वाव नाही. जगाचा हा निर्माता ज्या पध्दतीने आमच्यात वास करीत आहे तो ऐक चमत्कार होय. ???देवाशीवाय ,आध्यात्मिक मार्गाशिवाय आणखीन कुठला पर्याय आहे कां ? तो एकच मार्ग म्हणजे 12पायऱ्यांचा मार्ग. बिगबुक मध्ये आम्ही म्हणजे ते 100जण असा त्याचा अर्थ घ्यायचा. असा तळ गाठला होता की कुठलीही मानवी शक्ती आम्हास या रोगातून बाहेर काढू शकला नसता. ???रोलँड हॅजरथ हा अमेरिकन व्यावसायिक होता. कर्तबगार होता ,हुशार होता आणि त्याचे चरित्र देखील चांगले होतें. तो दारू थांबविण्यासाठी एका सॅनोटोरियम मधून दुसऱ्या सॅनोटोरियम मध्ये असा त्याचा प्रवास चालू होता. अमेरिकेत प्रत्येक मानसोउपचार डॉक्टरांकडून त्याने उपचार करून घेतले होतें. त्यानंतर तो युरोपला गेला. तिथे प्रख्यात मनसोउपचार डॉक्टर कार्ल युगं यांची ट्रीटमेंट सुरू केली. ???ऐक वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर रोलँड यांना वाटले आता काय आपली स्लीप होणार नाही. पण तो थोड्याच काळात दारू पिऊन बेहोश झाला. तो पुन्हां दारू कां प्यायला याचे समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. डॉक्टर कार्ल युगंला मद्यपाश् आजार माहिती नव्हता व पुढचा क्रुतिचा कार्यक्रम देखील माहिती नव्हता. पण त्यांना हे माहीत होतं आध्यात्मिक असे काहीतरी मद्यपीच्या बाबतीत चांगले घडेल व यातून त्यांची सुटका होईल. डॉक्टर सिल्कवर्तचे उदाहरण बिल डब्ल्यू यांच्याशी जुळते ,डॉक्टर कार्ल युगं चे उदाहरण रोलँड यांच्याशी जुळते आणि डॉक्टर बॉब यांचे उदाहरण ऑक्स्फर्ड समुहाशी जुळते. ऑक्स्फर्ड समूहाकडे क्रुतिचा कार्यक्रम होता पण त्यांच्या कडे मद्यपाश् आजार नव्हता. ???डॉक्टर कार्ल युगंला रोलँड यांनी प्रश्न केला मी एवढी माहिती घेऊन आणि वर्षभर ट्रीटमेंट घेऊन मी स्लीप कां झालो. .. . डॉक्टर म्हणाले तुझी परिस्थिती संपूर्ण निराशाजनक झालेली आहे. तुला आता समाजात पुन्हां ताठ मानेने उभे राहता येणार नाही. तुला जर मरायचे नसेल आणि दीर्घकाळ जगायचे असेल तर स्वतःला चोवीस तास कोंडून घ्यावे लागेल नाहीतर चोवीस तास रखवालदार ठेवावा लागेल. रोलँड यांनी पुन्हां प्रश्न केला याला काही अपवाद नाही काय ? डॉक्टर म्हणाले होय अपवाद आहे. पण ते रेअर्लि आहेत. .. . मुळापासून मूलगामी सखोल आध्यात्मिक अनुभव आलेले असे मद्यपी आहेत त्यांच्यात सुधारणा झाली पण आमच्या मेडिकल ट्रीटमेंट असे अनुभव दिसतं नाही. पहिली विचारसरणी काढून त्याच्या जागी नवीन विचार सरणी आत्मसात करणे ,ऐक भावनिक स्थिती काढून तिच्या जागी दुसरी भावनिक अवस्था बसविणे. डॉक्टर कडून हे ऐकल्यावर रोलँडला हायसे वाटले. ???रोलँड भयानक द्विधामनस्थिती मध्ये सापडलेला होता. पण त्याच वेळेला त्याच्या वाटेला ऐक अनुभव आला आणि त्याची ऐक स्वतंत्र माणूस म्हणून ओळख निर्माण झाली. त्याला कोणीतरी ऑक्स्फर्ड समूहाचा मेसेज दिला. तिथला कार्यक्रम त्याने आपलासा केला. त्याची दारू थांबली. आता त्याला स्वतःला कोंडून घेण्याची किंवा चोवीस तास रखवालदार ठेवण्याची गरज नाही. .. .. ???केदार भाऊ आपले आभार. आपण पाठवीत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची हमी देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. .. .??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, म स बी बु भाग -032 ची प्रतिक्रिया... ?ह्या आजाराला उपाय आहे का? ?आध्यात्मिक अनुभव हाच उपाय आहे, जो आपण मागील -031 व्या भागात पहिला आहे.?मनावर झालेले खोलवर, अंतर्गत असे परिणाम आमच्या चालण्यातून, बोलण्यातून, विचार करण्याच्या पद्धतीतून दिसून येतात. ?आध्यात्मिक अनुभवाने आमच्या स्वतःबद्धल, स्वजनाबद्धल, परमेश्वराच्या विश्वाबद्धल दृष्टिकोनात क्रांतिकारक बदल घडवून आणलेला दिसून येतो, आणि हा एक चमत्कारच आहे.?आम्हाला जे कदापिही शक्य न्हवते ते साध्य करण्यास त्याने हळूहळू सुरुवात केली आहे.?हे अनुभव आम्हांला मोठ्या कालखंडात छोट्या, छोट्या स्वरूपात येणार आहेत.?जर आम्ही पुस्तकात सांगितलेल्या 100 मद्यप्यांसारखे झालेलो असू तर आमच्या पुढे दोनच पर्याय आहेत.1. पित, पित मरायचे 2. आध्यात्मिक सहाय्याचे पाठबळ मिळवायचे.?ह्याच्या शिवाय दुसरा कोणताच मधला पर्याय नाही.?आम्ही दुसरा पर्याय निवडला आणि त्यासाठी प्रामाणिकपणे, मनाची तयारी करून त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तयार झालो. ?रोलॅन्ड हजार्ड हा एक कर्तबगार, हुशार, सच्चारित्र असलेला अमेरिकेतील व्यापारी होता. ?त्याच्यावर यूरोपातील डॉ. यूंग यांनी वर्षभर उपचार केले, आणि त्यांनी त्याला आपल्या मानसिकतेबद्धल सर्व ज्ञान दिले.?त्यामुळे त्याची शारीरिक, मानसिक अवस्था चांगली झाली. ?त्यामुळे त्याला आता आपली मद्यपानात अधोगती होणे अशक्य आहे असे वाटू लागले.?पण थोड्याच काळात तो मद्यपान करून बेहोष झाला ?सर्व माहित असतानाही आपला हा अधहःपात का झाला? याचे समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही.?तो पुन्हा एकदा डॉ. यूंग कडे गेला आणि त्याने आपण पुन्हा मद्याकडे का गेलो? हा प्रश्न विचारला.?खरेतर त्याला मनावर ताबा ठेवून ईच्छाशक्तीवर मद्यावर नियंत्रण ठेवायचे होते.?त्याने डॉ.ना खरे कारण सांगण्याची विनंती केली.?डॉ. यूंग त्याला म्हणाले कीं त्याची परिस्थिती निराशाजनक आहे. पण जर तुला आध्यत्मिक अनुभव आला तरच तू यातून वाचू शकतोस.?यूंग त्याला म्हणाले कीं मद्यासक्त विचार असलेल्या कोणत्याही मद्यासक्ताला त्यांनी सुधारलेले पाहिलेले नाही.?पण ज्यांना आध्यात्मिक अनुभव आलेले आहेत असे काही अपवाद आहेत.?त्यांच्या मनात असलेल्या चुकीच्या भावना, कल्पना, आणि दृष्टिकोन बाजूला फेकून त्याजागी नविन मनोकल्पना, हेतू प्रभाव गाजवू लागतात?ते म्हणतात कीं खरेतर मी तुझ्यात हेच बदल वर्षभर करायचा प्रयत्न करत होतो, पण तो इतर लोकांच्या बाबतीत यशस्वी झाला, तुझ्यात मात्र मला अपयश आले.?तळटीप --ह्याच्या स्पष्टीकरणासाठी परिशिष्ट 2 पहा. आध्यात्मिक अनुभव.?डॉ. सिल्कवर्थ ह्यांना फक्त आजार माहित होता, डॉ. यूंग ह्यांना फक्त आध्यत्मिक अनुभव म्हणजे काय हेच माहिती होते, आणि डॉ. बॉब ह्यांना फक्त आध्यात्मिक अनुभवाच्या कृतीचा ऑक्सफोर्ड ग्रुपचा कृतीचा कार्यक्रम माहित होता.?त्यामुळे हे तिघेही मद्यासक्ताना सुधारू शकले नाहीत.?मद्यासक्ताचे धार्मिक ज्ञान, धार्मिक निष्ठा चांगल्या असल्या तरी त्यांच्यात मुलगामी आध्यत्मिक अनुभव प्राप्त होण्याचा संभव नाही. ?पण रोलॅन्ड हजार्ड ला त्याचवेळी एक विलक्षण आध्यात्मिक अनुभव आला आणि तो सुधारला ?बिल ह्यांनी बिगबुक मध्ये आजार, आध्यात्मिक अनुभव, आणि त्यावरील 12 पायऱ्यांचा कृतीचा कार्यक्रम आपल्याला एकत्र पुस्तक रूपात करून दिलेले आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. केदारभाऊच्या मुळे हे सर्व कळायला सोपे गेले. त्यांचे मनःपूर्वक आभार. आपले साहित्य कोणालाच देणार नाही ही खात्री देतो आणि पुढील भाग -033 ची अपेक्षा करतो. धन्यवाद आणि आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video
162cae189c7f571657463177
video