BBIU-042 मला समजलेले बिगबुक, भाग - ०४२ मसबिबु-०४२

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-042 मला समजलेले बिगबुक, भाग - ०४२ मसबिबु-०४२

BBIU-042 मला समजलेले बिगबुक, भाग - ०४२ मसबिबु-०४२

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

? आपण जर धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त असाल तर आपल्याला माझ्या दुसऱ्या चॅनेलवरील व्हिडीओ नक्की आवडतील. ? दोन्ही चॅनेल वरील व्हिडिओंना लाईक, शेअर, *कॉमेंट* आणि सबस्क्राईब करा. ?✍✅??

??? BBIU-042 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - बेचाळीसावा वेळ - 48.30 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर प्रत्येक ऑडिओच्या सुरुवातीचा प्रस्तावानेचा पराग्राफ वाचन या भागापासून बंद केले आहे कारण आता तुम्हाला माझी कार्यपद्धती व्यवस्थित माहीत आहे. ? पान क्र 41 ते 43 आम्ही आज्ञेयवादी दुसऱ्या पायरीचा प्रवास क्रमशः परमेश्वराबद्दलचे गैरसमज बाजूला ठेवा तुमचाच परमेश्वर सुरुवात करणे आवश्यक दुसऱ्या पायरीचा महत्वाचा प्रश्न खुले मन आध्यात्मिक विकासाला सुरुवात आम्हाला श्रद्धा ठेवणे का अवघड होते तळटीप श्रद्धेकडे प्रवास आमच्या अडचणी हरवलेला विवेक दहाव्या पायरीत विद्युतशक्ती आणि लोखंडी रॉड उदाहरणे परमेश्वराबद्दलची रिझर्व8काढण्याची प्रक्रिया पान 43 वाचन पूर्ण ??? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 3 दिवसांनी ऐकावा. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -042 ची प्रतिक्रिया प्रकरण-3 आम्ही आज्ञ्येवादी ?बिल म्हणतात की तुमच्या मनात परमेश्वराबद्धल ज्या संकल्पना असतात त्याबद्धलच आम्ही बोलतो , आमच्या संकल्पना तुमच्यावर लादत नाही. ?तुम्ही कुठेतरी विश्वास ठेवून,मनाची तयारी करून,खुले मन ठेवून,कृती करणे गरजेचे आहे. ते केल्याने पुढचा मार्ग तुम्हाला आपोआपच सापडेल. आणि दुसऱ्या पायरीला सुरुवात करण्यासाठी हे गरजेचे आहे.?त्यानंतर पूर्वी ज्या गोष्टी आम्हाला अशक्य वाटत होत्या त्या आम्ही स्वीकारू लागल्याचे आढळून आले आणि तो आमचा अध्यात्मिक विकासाचा पाया होता.?त्यानंतर आम्ही जर पुढील कार्यक्रम घेतला तर आम्हाला मानसिक, भावनिक, आध्यात्मिक दृष्ट्या प्रचंड फायदा होणार आहे.?बिल म्हणतात की नास्तिक किंवा अज्ञ्येवादी लोकांना श्रद्धा ठेवणे अवघड असते, पण त्यांनी जर कठीण असलेल्या अनेक गोष्टीचा विश्वास ठेवून, श्रद्धापूर्वक स्वीकार करून,मनाची तयारी केली तर ते आध्यात्मिक विकास करू शकतात.पण त्यासाठी कुठेतरी सुरुवात करणे आवश्यक आहे.?आमच्या असमर्थतेच्या जोडीला आमचा हेकट स्वभाव, भावनांशीलता, आणि आमचे अविवेंकी पूर्वग्रह आमचे मार्ग कुंठीत करत होते.अशा तर्हेची आमची विचारसरणी आम्हांला सोडून देणे भागच होते, जसे आम्ही पहिल्या पायरीतील हतबलता मान्य केली होती.?त्यानंतर श्रद्धेचा हा स्वीकार करणे आम्हाला फारसे अवघड गेले नाही.?मद्य हीच आमचे मन श्रद्धेकडे वळविण्यास कारणीभूत ठरली.?त्या मद्यशक्तीनेच आमचा हरवलेला विवेक आम्हांला परत मिळवून देण्यास सुरुवात केली, जो की आम्हांला 10 व्या पायरीत पूर्ण मिळतो.?काहीवेळा आम्हाला हा कार्यक्रम घेणे हे मनाविरुद्ध असल्याने कंटाळवाणे वाटते तरीपण आम्हाला आशा आहे की यातूनही आम्ही श्रद्धेकडे जाऊ शकू. ?उच्चशक्तीवर विश्वास ठेवण्यासाठी पुस्तकात काही उदाहरणे दिलेली आहेत.?काही बाबतीत आमच्याकडे पहिल्यापासून श्रद्धा असते, कारण आजचा माणूस हा वस्तुस्थिती आणि तीचे परिणाम याचा भोंक्ता असतो.तो सिद्धांताचा स्वीकार करीत असतो कारण तो वस्तुस्थिती वर आधारित असतो.त्याच्याबाबत तो प्रतिप्रश्न करीत नाही जसे की तो परमेश्वरा बाबत करतो.त्यासाठी त्यांनी विद्युतशक्तीचे उदाहरण दिले आहे.?वीज आहे या सिद्धांतावर त्याचा विश्वासअसतो म्हणून पंखा, लाईट अशी अनेक उपकरणे त्यावर चालतात,आणि तो त्यावर प्रतिप्रश्न करीत नाही.?तो जे पाहतो, जे त्याला भासते, ज्याचा तो उपयोग करून घेतो पण त्याचे स्पष्टीकरण करणे शक्य नसते म्हणून अशा गोष्टींचा तो सुरवातीलाच स्वीकार करतो.?ती कुठून येते, कशी बनते, ती आपल्यापर्यंत कशी येते यावर तो विचार करीत नाही, किंवा संशय घेत नाही जो की आपण परमेश्वरा बाबत करत असतो.?बिल आपल्याला असाच विचार आपण परमेश्वरा बाबत करावा हे सांगतात. ?विज्ञानाचे ही असे म्हणणे आहे की दृश्य पुरावा हा सगळ्यात दुबळा पुरावा असतो. जे आपल्याला दिसते त्यापेक्षा काहीतरी वेगळे असू शकते.?त्यामुळे आम्हाला जरी उच्चशक्ती दिसत नसली, जाणवत नसली, भेटत नसली तरी त्याचा अर्थ ती नाहीच आहे असा होत नाही.?उच्चशक्ती वर विश्वास ठेवण्यासाठी त्यांनी पोलादी कांबेचे उदाहरण दिले आहे. पोलादी कांब हा एक विद्युत कणाचा गोळा असतो, आणि हे विद्युतकण परस्परांभोवती बेफाम वेगाने फिरत असतात. हे कण कायद्यानी बांधलेले असतात आणि हे सर्व जगात प्रचलित आहे, त्यामुळे त्यावर अविश्वास ठेवण्याचे कारण नसते ते विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. पण परमेश्वराबाबत आमची मनोभुमिका विकृत होते. आमची अशी दृढ श्रद्धा झाली आहे की परमेश्वराचे अस्तित्व काही खरे नाही. म्हणून आम्ही त्यावर प्रश्न विचारतो, युक्तिवाद करतो. तो खोटा आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.?आमचे हे युक्तिवाद जर खरे असतील तर एक गोष्ट सिद्ध होईल की जीवन हे शून्यातून निर्माण झाले आहे, त्या जीवनाला काही अर्थ नाही आणि ते दिशाहीन आहे. केदार भाऊंचे मनःपूर्वक आभार. आपले साहित्य कोणालाच देणार नाही ही ग्वाही देतो आणि पुढील भाग पाठवावा ही विनंती करतो. ??????

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम ,मला समजलेले बिगबुक प्रकरण. . आम्ही अद्नेयवादी (दुसरी पायरी ) प्रतिक्रिया. .. . बिगबुकचे लेखक जेव्हां देवाविषयी बोलतात तेव्हां ते आमच्या मनातील देवाविषयी बोलतात. ते त्यांचा परमेश्वर आपल्यावर लादत नाहीत. जेव्हां आम्ही देव उच्चशक्ती , आध्यात्मिकता असे शब्द ऐकतो तेव्हां या शब्दांविषयी पूर्वग्रह दूषित असता कामा नये. आम्हांला आमचा आध्यात्मिक विकास करायचा असेल तर प्रत्येकाच्या कल्पनेत बसत असलेला जो कोणी परमेश्वर आहे त्याच्याशी जाग्रुत संपर्क करण्यासाठी मनाची तयारी आणि हळूहळू क्रुति करणे गरजेचे आहे. माझ्यापेक्षा एक श्रेष्ठ तर शक्ती आहे त्यावर आमचा आता विश्वास बसला आहे काय ? त्याने होय म्हंटले तर त्याला आम्ही तात्काळ आश्वासन देऊ इच्छितो बाबारे तू योग्य मार्गावर आहेस , पहिली पायरी जर आमची पक्की झाली असेल तर या दुसऱ्या पायरीचा मानसिक भावनिक शारीरिक आध्यात्मिकरीत्या मोठा फायदा होणार आहे. .. . ????ही पायरी घेण्यासाठी अगदीच धार्मिक बनणे धार्मिक तत्वांचे पालन करणे श्रध्दावान बनणे हे सगळं असेल तरच आम्ही आध्यात्मिक जीवन जगू शकतो हा देखील आमचा गैरसमज आहे. आम्हांला केवळ मनाची तयारी किंवा विश्वास ठेवायला तयार होणे हे पुरेसे आहे. अजून एक अडचण होती श्रध्देच्या बाबतीत कारण मी हेकट होतो ,माझ्या विचित्र स्वभावामुळे , माझ्या भावनाशिलतेमुळे ,गैरसमजामुळे परमेश्वराकडे जाणारे मार्ग आम्ही रोखुन धरले होते. उच्चशक्ती शिवाय खरे तर आम्हांला आता पर्याय नाही.कारण हीच उच्चशक्ती आम्हांला आमचा हरवलेला विवेक परत मिळवून देणार आहे. पण त्याकरिता आम्हांला दहाव्या पायरीपर्यंतचा प्रवास करणे गरजेचे आहे. दहाव्या पायरीत बिल सांगतात आता आम्हांला हरवलेला विवेक परत मिळाला आहे. ????एवढं सगळं वाचकांना समजाऊन सांगितलं तरी काही वाचक विचारतात आम्ही उच्चशक्तीवर देवावर विश्वास का ठेवावा ? लेखक सांगतात आपण व्यवहारी जगात राहतो ,आताचे जग सायन्स, सिध्दांतावर ,फिलॉसॉफीवर ,वस्तूस्थितीवर चालते. आपल्या सगळ्यांचा आग्रह असतो बाप दाखव नाहीतर श्राध्द कर. .. . अनेक उदाहरणे आहेत जे सिध्दांतावर चालतात. त्यातले एक उदाहरण विद्युतशक्ती प्रत्येकजण या विद्युतशक्तीवर विश्वास ठेवतो. ती विद्युतशक्ती घरातला पंखा लावते दिवे लावते ए. सी. लावते. याबद्दल कोणालाही संशय येत नाही का ? बहुधा आपण जे पाहतो ,आपल्याला जे भासते , याचे स्पष्टीकरण करणे शक्य नसते. म्हणजे आपण वीजनिर्मिती , ज्या धरणात ती तयार होते , आपल्यां घरापर्यंत आणणारे सपलायर ट्रान्सफर या सगळ्या गोष्टी आम्ही ग्रुहित धरलेल्या असतात. खरे तर याबाबत अद्न्यान असते. याचीच लिंक बिल उच्चशक्तीशी जोडायला सांगतात. उच्चशक्ती बद्दल देखील आमच्या मनात अद्न्यान आहे. जसा आम्ही विद्युतशक्तीवर विश्वास ठेवतो त्याच प्रकारचा विश्वास उच्चशक्तीवर ठेवायला काय हरकत आहे. सायन्स देखील असे मानते ,जे डोळ्याने दिसते तो सर्वात वीक पुरावा असतो. त्यामुळे उच्चशक्ती जरी आम्हांला दिसत नसली तरी याचा अर्थ असा होतं नाही उच्चशक्ती अस्तित्वात नाही. .. . देव नसता तर जगाचे कालचक्र हे शिस्तबद्द पध्दतीनं कसे चालते ,रुतुबदल त्या त्या वेळेला कसे होतात. वेळेतच सूर्याचे उगवण आणि वेळेतच त्याच मावळण हे कसे शक्य आहे. आकाशात ताऱ्यांच एकमेकांना न धडकणे , पावसाच्या रुतुतचं पाऊस पडणे हे परमेश्वराच्या अस्तित्वाचे संकेत आहेत. ????केदार भाऊ आपले शतकोटी आभार आपण पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची आपल्याला हमी देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. .. .. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार ?

You may also like

1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video
1636550b2a60701667584178
video