BBIU-049 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणपन्नास

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-049 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणपन्नास

BBIU-049 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणपन्नास

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त मद्यपीन्करिता आहे. 
कृपया आपल्या Kedar Seeker सनातन संस्कार चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करावे ही विनंती आहे. 
???
BBIU-049
"मसबिबु - मला समजलेले बिगबुक"
भाग - एकोणपन्नास 
वेळ -  47.27 मिनिटे
???

सेट असाईड प्रेयर  
12 आणि 12 नैसर्गिक प्रवृत्ती क्रमशः 
सामाजिक प्रवृत्ती 
आत्मसन्मान
गर्व 
सुरक्षा प्रवृत्ती 
अवाजवी भीती 
लैंगिक प्रवृत्ती 
आम्ही आणि प्राणी यात फरक 
नैसर्गिक प्रवृत्ती परमेश्वराने का दिल्या 
स्वेच्छा मिसल्यामुळे आमचे नुकसान 
???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. 
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. 
आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच भागाच्या कॉमेंटमध्ये सुद्धा पोस्ट करावी.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -049 ची प्रतिक्रिया. स्वेच्छेचा गैरवापर आपण आपल्या नैसर्गिक प्रवृत्यात कुठे आणि कसा करतो याबाबत ?सामाजिक प्रवृत्तीतील?3 री संज्ञा आत्मसन्मान - ही परमेश्वराने प्रत्येकाला दिलेली असते. यात आपल्याला स्वतःबद्धल जे वाटते, तसेंच आपल्याला लोकांनी स्वीकारले, आपले कौतुक केले, तर आपल्याला खूप भारी वाटते. पण जर लोकांनी आपल्याला न स्वीकारता त्यांना आपण आवडेनासे होतो तेंव्हा आपल्याला स्वतःबद्धल घृणा यायला लागते आणि आपला तेंव्हा आतमसन्मान खाली गेलेला असतो.?4. गर्व -गर्व म्हणजे स्वतःचे स्वतःबद्धल असलेले असमर्थनिय असे मत.यात आपण स्वतः एकतर खूप भयंकर समजतो किंवा काहीच नाही आणि हे दोनही प्रकार खरे किंवा योग्य नाहीत. ?5.वैयक्तिक संबंध-आपले इतरांशी, आजूबाजूच्या लोकांशी असलेले व्यक्तिगत संबंध होय.?6महत्वाकांक्षा यात आपले भविष्याचे नियोजन असते. ?त्यात लोकांनी आपल्याला स्वीकारावे, त्यांना आपण आवडावे ?पैशाच्याबाबत ?प्रतिष्टेबाबत ?लैंगिकसंबंधाबाबत असते. ?आपल्याला भविष्यात यश मिळवण्यासाठी,समाजासाठी,काहीतरी चांगले करावेसे, आपला उद्योग असावा, देशसेवा करावी ही महत्वाकांक्षा असते आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न आणि कष्ट करावे लागतात. ते केल्यावर आपण लोकांना आवडू लागतो. ?आपली ही भावना खूप सुखावह असते. पण ती काही काळापूरतीच मर्यादित असते. कारण आपले हे यश परत परत काही मिळत नाही. आणि मग लोग हळूहळू आपल्याला विसरू लागतात.?तसेंच काही अनैतिक गोष्टी करताना ज्यामुळे आपल्याला खूप आनंद मिळतो. पण हे जर लोकांना समजले तर आपण त्यांना आवडेनासे होतो.?आपली भावना असते की लोकांनी कायमच माझे कौतुक करावे जी चुकीची असते, आणि जेंव्हा असे होते तेंव्हा आपल्यात काहीतरी कमी आहे ही भावना येते.आपल्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्यामुळे आपण त्यांच्याशी असलेले मैत्रीचे संबंध स्वतःची अवाजवी इच्छा वापरल्याने बिघडवून बसतो. आणि मग आपल्यात इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स येऊन आपले व्यसनाचे प्रमाण वाढते.?बिल म्हणतात की स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन हे क्वचितच यशस्वी होते. आपल्या अशा वागणुकीमुळे आपल्या भोवतालचे लोक, जागा, आणि परिस्थिती यात सतत संघर्ष होत असतो. ?2.संरक्षण प्रवृत्ती --आपले भविष्य सूरक्षीत करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला ही दिलेली असते.त्याचाच एक भाग म्हणून आपण विमा उतरवलेला असतो.?भविष्यात अन्न, वस्त्र, निवारा याची तरतूद करण्यासाठी आपण काही निर्णय घेतो. आपले राहणीमान, गरजा यावरून हे निर्णय घेतो.?आपण जेंव्हा त्या निर्णयात आपल्या अपेक्षा घुसडवतो आणि त्यात अपयश आले की त्याचे रूपांतर अवाजवी भीतीत होते. आणि मग आपला लोकांशी, जागेशी, परिस्थितीशी संघर्ष सुरू होतो.?आपण लोकांना फसवायला लागतो, खोटे बोलतो.?कदाचित आपल्याला पैसा भरपूर मिळेल पण त्या यशाला मानसिक शांति, सुख मिळत नाही. आणि मग आपण पुन्हा व्यसनाकडे वळतो. ?3. लैंगिक प्रवृत्ती --प्रत्येक प्राणीमात्र प्रणयाची इच्छा घेऊनच जन्माला येतो, आणि ही इच्छा परमेश्वराने आपल्याला भावी पिढी निर्माण करण्यास दिलेली असते. आपण सेक्स केला नाही तर पिढी निर्माण होणार नाही. समाज चालू रहायला हवा त्याचे प्रजजन होत राहिले पाहिजे हा त्यामागील उद्धेश असतो.?आपण त्यात आपली अतिरेकी स्वेच्छा वापरतो. आपल्याला ते सतत हवे हवे से वाटते वेगवेगळ्या स्त्रिया हव्याशा वाटतात वेगवेगळी पद्धती, वरून, खालून करावेसे वाटते कारण सेक्स केल्यावर मिळणारी सुखद भावना त्यामागे असते. ?ईतर प्राणीमात्र तसें करत नाहीत उदाहरणार्थ कुत्रे, गाय आणि बैल.?आपली सुखद भावना पूर्ण होत नाही तेंव्हा आपण खोटे बोलतो,राग राग करतो, वगैरे वगैरे आणि मग पुन्हा आपले व्यसनाचे प्रमाण वाढते. केदार भाऊंनी मेहनत घेऊन सुंदर पद्धतीने आपल्या स्वेच्छेच्या अतिरेकाबद्धल समजावून सांगितले. आपले हे साहित्य कोणालाच देणार नाही आणि पुढील भाग पाठवावा ही विनंती करतो. आभार, आभार, आभार. ??????

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ , आपणांस सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह , जोगेश्वरी पूर्व ,मुंबई. . मला समजलेले बिग बुक भाग 49ची प्रतिक्रिया देत आहे. .. . खरे तर माझी सामाजिक प्रव्रुत्ति , माझी संरक्षणाची प्रव्रुत्ति , माझी लैंगिक प्रव्रुत्ति या बद्दल ज्यो आणि चार्ली वर्कशॉप मध्ये विस्तारानं ऑडियो मध्ये ऐकले आहे त्या बद्दल लिखाण केलेले आहे. या तीनही प्रव्रुत्या देवाने मानवाला दिलेल्या आहेत. पण याचा अतिरेक वापर झाल्यामुळे , त्यात स्वेच्छा घातल्यामुळे माझे जीवन मी बऱ्याच वेळेला अडचणीत आणले आहे. माझी मुख्य समस्या म्हणजे मला थांबायचं कुठे हेच नेमके कळतं नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला होरपळून निघालो आहे. सोबरायटी मध्ये या तीनही प्रवृत्तीनचा अतिरेक केला ,त्याचा गैरवापर केला , अनैतिक मार्गाने काही करायला गेलो. स्वेच्छेचा धुमाकूळ घातला तर माझे संपूर्ण जीवन पुन्हां एकदा गोत्यात येऊ शकते याची जाणीव ठेवायला लागते. रिल्याब्स आणि रीकंवरी एकत्रित चालतं असतात याच भान ठेवायला लागते. (मागच्या भागात सामाजिक प्रव्रुत्ति बद्दल बराच उहापोह झालेला आहे त्यामुळे त्याबद्दल डिटेल लिहीत नाही. )????संरक्षणाची प्रव्रुत्ति = आपल्यां जीवाचे रक्षण करण्यासाठी ,भविष्य सुरक्षित करण्यासाठी देवाने ही प्रव्रुत्ति दिली आहे. त्यामुळेच जगातल्या जवळजवळ प्रत्येकाने विमा काढलेला असतो. ही प्रव्रुत्ति जर देवाने दिली नसती तर आपण आपल्यां मुलाबाळांच्या शिक्षणाचा , त्यांच्या भविष्याचा , त्यांच्या लग्नाचा आणि नवरा बायको म्हणून आपल्यां म्हातारंपणीचा विचारच केला नसता. बिल म्हणतात प्रत्येक माणूस स्वतःचं भविष्य सुरक्षित करण्याची ईच्छा घेऊनच जन्माला येतो. प्रत्येक माणसाची सुरक्षेची लेवल ही वेगळी असू शकते. एखादा गरीब असेल तर तो काय विचार करेल माझ्याकडं दोन तीन लाख असतील तर माझे म्हातारपण सुरक्षित होईल. एक लाख पगार घेणारा असेल तो काय विचार करेल माझ्याकडे 50 लाख असतील तर माझे म्हातारपण सुरक्षित होईल. त्या करिता मला कष्ट करावे लागतील पैसा अडका जमा करावा लागेल. पण यात मी स्वेच्छा मिसळली तर आता 50लाख म्हातारंपणीची सोय म्हणून अपुरे वाटतील. आता एक दोन करोड हवेत मला मग काय अनैतिक मार्गाने मी पैसा कमवायला जाईन कारण आता मी माझी स्वेच्छा टाकली आहे त्यामुळं लोकं परिस्थिती आणि जागा यात माझा संघर्ष सुरू होईल. अनामिक भीती माझ्या मनात घरं करू लागेल आणि इथेच खरी गडबड झालेली असेल. ????लैंगिक प्रव्रुत्ति = प्रत्येक माणूस हा ही प्रव्रुत्ति घेऊनच जन्माला येतो. कधी कधी चुकीच्या शिकवणीमुळे किंवा चुकीच्या घटनांमुळे ही प्रव्रुत्ति बंद पडू शकते. जर आम्ही सेक्स केला नाही तर भावी पिढ्या निर्माण होणार नाही. प्राण्यांत देखील सेक्स प्रव्रुत्ति असते. त्यांनी जर सेक्स केला नाही तर पुढचं प्रजनन होणार नाही. देवाला असे वाटते की हा समाज चालू राहिला पाहिजे. प्राणी जीवन चालू राहिले पाहिजे त्यांची संख्या वाढली पाहिजे. जुनी लोकं मरतील तर नवीन लोकं जन्माला आली पाहिजे तरच समाज टिकून राहील. सेक्स केल्यानंतर जो शारीरिक फिल येतो तो जर आला नसता तर कोणीही सेक्स केला नसता. पण हा आनंद किंवा फिल जास्त वेळ टिकतं नाही. म्हणून माणूस म्हणून मला हा आनंद पुन्हां पुन्हां मिळावा. मग मला वाटतं मला सतत सेक्स मिळावा मला पुढून पाहिजे मला मागून पाहिजे खालून पाहिजे हे सगळं वाटणं आहे ना. . ते वाटणं म्हणजे माझ्या सेक्स प्रव्रुत्तिचा अतिरेक आहे. आता प्राण्यांबद्दल जेव्हां भाद्रपद महिना असतो तेव्हां कुत्र्यांचा प्रजनांचा काळ असतो कुत्रा कुत्री आपल्याला रस्त्यावर सेक्स करतांना दिसतात. तुरळक अपवाद सोडला तर कुत्रे भाद्रपद महिन्या शिवाय सेक्स करतांना आढळत नाहीत. कुत्रे माणसासारखा गैरवापर करतं नाहीत. मला जसे वेगवेगळ्या बायका पाहिजेत तसे कुत्र्यांचे नसते. एकाच कुत्री बरोबर पाच सहा कुत्रे सेक्स करतात. आणखीन एक उदाहरण गाय जेव्हां माजावर येते तेंव्हाच बैल कामं दाखवितो.बैल कधीच गायीच्या मागे पुढे करतं नाही. पण माणूस म्हणून माझ्या बाबतीत असे का होतं नाही कारण माझ्या सेक्स प्रव्रुत्ति मध्ये मी स्वेच्छा मिक्स करतो. आणि माझा अनैतिक प्रवास सुरू होतो. सेक्सच्या हव्यासापोटी मी चुकीच्या गोष्टी करू लागतो व अडचणीत येतो. मग भीती अपराधीपणा यामुळे मी पुन्हां पुन्हां दारूकडे जातो. असे केल्यामुळे लोकं दुखावली जातात व ते प्रतिहल्ला करतात. पण आपल्यां ए ए मध्ये असे गाढवं आहेत खरे तर ज्या गोष्टींशी मला लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टी मी छाती फुगवून सांगतो. सेक्स मध्ये कधी कधी शरीर साथ देत नाही पण मनातील ईच्छा मरत नाही. मी स्वार्थी व आत्मकेंद्रित असल्यामुळे या तीनही प्रव्रुत्ति मध्ये अतिरेक करतं असतो. मी जर पकडला गेलो तर लोकांना कळलं तर , माझ्या बायकोला कळले तर या भीती

You may also like

163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video
163cbee6d3d1a91674309229
video