Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-037 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - ०३७

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-037 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - ०३७

BBIU-037 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - ०३७

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार*

आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? https://youtu.be/7KP_zu_UEg0

??? BBIU-037 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सदतीसावा वेळ - 48.51 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 33 ते 35 मद्यपीडेविषयी आणखी काही वाचन क्रमशः जिम ची कहाणी समीक्षा इंसॅनीटी फसवा आणि प्रबळ आजार गाड्यांपुढे उड्या मारणाऱ्याचे उदाहरण बुद्धी चालत नाही, आम्ही पागल झालेले दिसून येते नंतर फ्रेड ची कहाणी मानसिक आजार माहीत होता डीनायल बिल साहेब पुनःपुन्हा तेच तेच सांगतात कारण आपल्या मनावर बिंबवले जावे ते प्रत्येक वेळी वेगळे शब्द, वेगळी वाक्ये आणि वेगवेगळी उदाहरणे वापरतात जिम आणि फ्रेड यांच्यातील समानता आणि फरक आत्मज्ञान वाचवू शकत नाही ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार मित्रांनो मीं शंकर, मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव (पूर्व), मुंबई. म. स. बी. बु. भाग -037 ची प्रतिक्रिया ? जिमच्या विचारसरणी सारखीच आमची पण विचारसरणी होती.ती जर नाही बदलली तर आमच्या डोक्यावर कायमच टांगती तलवार राहणार आहे, कारण मद्यपाश हा वाढत जाणारा, फसवा आजार आहे. आमच्यातील ऍलर्जी मरेस्तोवर राहणार आहे.?आम्ही जरी हुशार, बुद्धीमान असलो तरी आमच्यातील विवेक, पागलपणाची कल्पना मद्याप्रती असलेली ओढ आटोक्यात ठेवू शकत न्हवती.?आजार कायमच आम्हाला फसवायचा, आणि एकदा का आम्ही पहिला घोट घेतला की आमची सायकल पुन्हा सुरू व्हायची, आणि दुसऱ्या दिवशी हे कसे झाले हा प्रश्न आम्हाला पडायचा.?आमचे त्याला भीती, राग, चिंता, अशी अनेक समर्थनीय कारणे असायची.?काही वेळा ती कारणे समर्थनीय असली तरी आम्हाला हे मान्य करायलाच हवे की पहिला घोट घेतल्यावर आम्ही थांबू शकत नाही. त्यामुळे आमचे समर्थन हे दुबळेपणाचेच होते.?आपली समस्या अधिक विस्ताराने बिल आपल्याला प्रकरण -3 मध्ये वेगवेगळ्या कहाण्यातून सांगतात.?आत्ताच्या कहाणीतील व्यक्ती ही मद्यपी नाही. त्याला वेगाने जाणाऱ्या गाडयांपुढे उडया मारत जाण्यात आनंद वाटत असे.?अनेकांनी त्याला मित्रत्वाचे सल्ले दिले, पण ते न जुमानता त्याने आपला हा खेळ सुरूच ठेवला.?पागलपणाच्या त्याच्या ह्या कल्पनेमुळे त्याला लागोपाठ किरकोळ ईजा होतात?तरीही त्याने आपला हा खेळ सुरूच ठेवला आणि एकदिवस त्याचे डोके फुटले,हातच मोडतो .? तो निर्धार करतो, आश्वासने देतो, पण काही आठवड्यातच त्याचे दोन्ही पाय निकामी होतात.त्यामुळे काहीवेळातच त्याला काम करणे अशक्य होते.त्याचा घटस्फोट होतो आणि तो सर्वांचा एक चेष्टेचा विषय होतो.?आपली ही कल्पना डोक्यातून काढण्यासाठी तो इस्पितळात स्वतःला कोंडून घेतो, पण बाहेर पडल्यावर त्याच दिवशी आगीच्या बंबापुढे उड्या मारताना तो आपली पाठ मोडून घेतो. तर असा हा माणूस पागलच नाही का??आमच्यासाठी यातून हेच दिसून येते,कीआमचा विवेक,बुद्धी जेथे मद्याचा संबंध येतो तेथे अशीच पागलपणाची ठरते.?आमच्यातले काही म्हणतात, हे जरी खरे असले तरी ते सर्वस्वी आम्हाला लागू होत नाही. कारण आम्ही तुमच्याइतके रसातळाला गेलेलो नाही, किंवा जाण्याची सूतराम शक्यता नाही. आपण दिलेल्या मौलिक सल्याबद्धल धन्यवाद. (डीनायल)?संभाव्य मद्यासक्त निरपवादपणे केवळ आत्मज्ञानाच्या पायावर मद्यपान सोडून देण्यात मुळीच यशस्वी होऊ शकणार नाहीत असे पुस्तकं आपल्याला सांगते. ?फ्रेड आणि जिम ह्या दोघांनाही मद्यपाश हा आजार आहे, पण जिमने पहिल्याच वेळेला आपण मद्यासक्त आहोत हे मान्य केले होते आणि तो कार्यक्रम घ्यायला तयार ही झाला होता. त्याने 3 पायऱ्यानपर्यंत कार्यक्रम घेतल्यावर भौतिक प्रगती झाल्यावर त्याचे कार्यक्रमाकडे दुर्लक्ष झाले. ?फ्रेड हा एका फर्ममध्ये पार्टनर होता, त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, आणि त्याचे वैवाहिक जीवनही सुखी होते. तो सर्व दृष्टीने स्थिर आणि समतोल होता.?अति मद्यपानामुळे त्याला पहिल्यांदाच इस्पितळात दाखल केले होते त्याची त्याला लाज वाटत होती.?आपण मद्यासक्त आहोत हे कबूल करण्याऐवजी आपण ताण कमी करण्यासाठी आलेलो आहोत असा अविर्भाव त्याने आणला.?डॉक्टरानी त्याची परिस्थिती बिकट असल्याचे सांगितल्याने काही दिवस त्याला खिन्न वाटले.?त्याने मद्यपान कायमचे सोडण्याचा निर्धार केला. त्याच्या चारित्र्य, प्रतिष्ठा ह्यामुळे ते करता येणार नाही असे कधीही वाटले नाही.?त्यामुळेच तो मद्यासक्त म्हणवून घ्यायला तयार न्हवता आणि त्याला आध्यात्मिक उपाययोजना ही तर मुळीच मान्य न्हवती.?आत्मज्ञानातून हे साध्य करू ही त्याची खात्री होती. आपले साहित्य कोणालाच देणार नाही ही खात्री देऊन पुढील भाग पाठवा. केदार भाऊंचे आभार. ????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ??? आपल्या कष्टांना वंदन ? आभार ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    डोक्यात डिनांयल असतो त्यामुळे उपहासाने ते म्हणतात तरी देखील माहिती बद्दल धन्यवाद. .. . ????फ्रेड विख्यात हिशोब तपास कंपनीचा भागीदार आहे. त्याची प्राप्ती भरपूर आहे. त्याचे घर सुरेख आहे ,सुंदर पत्नी आहे. कॉलेज मध्ये जाणारी हुशार मुले आहेत. फ्रेडचे व्यक्तिमत्व आकर्षक असल्यामुळे त्याची सर्वांची मैत्री जमते. (जिमच्या उदाहरणात त्याने पहिल्याच वेळी मान्य केले होतें की मी मद्यासक्त आहे आणि मी हा कार्यक्रम घ्यायला तयार आहे. ) पण फ्रेड मध्ये डिनांयल होतां ज्या वेळी अतिमद्यपानांमूळे त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागले त्यावेळी काही सभासदांनी त्याला पहिले होतें तो असे दाखवत होतां मी काही अतिमद्यपानामूळे इथे आलेलो नाही तर प्रचंड ताणामूळे मी इथे आलेलो आहे. त्याला डॉक्टरने देखील सांगितले तुझी <br/>ही गंभीर अवस्था दारू पिण्यामूळे निर्माण झाली आहे. त्याला त्यावेळी खिन्न वाटले मद्यपान काही दिवस सोडण्याचा निर्णय घेतला पण तो स्वतःला मद्यासक्त समजायला तयार नव्हता आणि दारूची समस्या सोडविण्यासाठी आध्यात्मिक उपाय योजना करावी लागेल हे तर त्याला मान्यच नव्हते. नंतर जवळ जवळ सर्व सभासदांनी ऐक ऐक करून त्याला समजावले आता त्याला आस्था वाटायला लागली फ्रेड ने मान्य केले अशा प्रकारची चिन्हे माझ्यात आहेत. पण इच्छाशक्तीवर दारू थांबविता येणार नाही हे काही तो मान्य करायला तयार नव्हता. उच्चशक्तीला देखील तो मानायला तयार होईना. ????केदार भाऊ तुमचे प्रचंड आभार. तुम्ही पाठवत असलेले ऑडियो मी कोणालाही देणार नाही याची हमी मी तुम्हांला देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार !!! ?

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम ,मी राजेश पी. (नई रोशनी समूह ,जोगेश्वरी. मुंबई ) मला समजलेले बिगबुक भाग 37 ची प्रतिक्रिया. .. .. जिम चे उदाहरण वाचकांना अतिरंजित म्हणजे चढवून आम्ही कायच्या काय सांगतोय पण आम्हांला तसे वाटत नाही कारण आमच्या प्रत्येकाची विचारसरणी ही जिमच्या विचार सरणी सारखी होती. विचार सरणी बदली करण्यासाठी जर मी प्रयन्त केले नाही तर आमची विचारसरणी तशिच राहणार त्यामुळे दारूची टांगती तलवार मानेवर सतत राहणार आहे. पहिल्या घोटाकडेपरत घेऊन जाणारी इनसॅनीटी होती तिने आमच्यावर मात केलेली आहे. काही परिस्थितीत आम्ही जाणूनबुजुन दारू पिऊन बेहोश होतं असू. आम्हांला कुठल्या तरी गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो. किंवा कुठल्यातरी गोष्टींची भीती वाटतं असते किंवा चिंता त्यामुळे प्रचंड मानसिक ताण आलेला असतो किंवा कोणाबद्दल तरी जाम खुन्नस आहे. आमची ही कारणे खरी असली तरी पहिला घोट घेतल्यानंतर जे घडते त्या बेहोशिचे समर्थन दुबळे पणाचे होतें. आम्हांला ऐक तर आठवत नाही आणि आठवले तरी त्याचा फारसा परिणाम होतं नाही. ????वैद्यकिय मत व बिल यांच्या कहाणी मधून मला माझी समस्या बिल यांनी सांगितली आहे आणि त्या समस्ये विषयी ओळख मिळण्यासाठी त्यांनी मद्यपिडे बद्दल आणखीन काही हे प्रकरण लिहले. यात त्यांनी मद्यपी असलेल्या व नसलेल्या काही व्यक्तींची उदाहरणे लिहली आहेत. आता बिल यांनी पोरकट पणाची कल्पना बाळगणाऱ्या मद्यपी नसलेल्या माणसाची गोष्ट आपल्याला ओळख मिळावी म्हणून इथे सांगितली आहे. त्याला भरदाव जाणाऱ्या गाड्यासमोरून पळत जाऊन किंवा उडी मारून क्रॉस करण्याचा वेडा नाद होता. हात मोडतात. कंबर मोडते हॉस्पिटल मध्ये जावे लागते. मग तो हॉस्पिटल मध्ये निर्धार करतो शपथ घेतो. पण पुन्हां येरे माझ्या मागल्या. यावेळी मात्र त्याच्या वेड्या नादा पायी त्याचे दोनिहि पाय निकामी होतात. बिल आपल्याला त्याची इनसॅनीटी सांगत आहेत तो गाड्यांच्या पुढे उड्या मारत होता आणि आपण बेवडे दारूच्या ग्लासासमोर उड्या मारत होतो. ????ज्या मद्यपीं मध्ये प्रचंड डीनांयल असतो त्यांना ही उदाहरणे हास्यास्पद वाटतात. ते म्हणतात तुम्ही जी काही उदाहरणे सांगितली आहे. ति आम्हांला लागू पडत नाही. तुम्ही सांगत असलेली चिन्हे ,हा त्यातली काही चिन्हे आमच्या मध्ये आहेत. पण तुम्ही ज्या थराला गेलात त्या थराला आम्ही गेलेलो नाही. आणि जाण्याची शक्यता नाही.

You may also like

163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video
163233896c0b311663252630
video