Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-038 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३८

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-038 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३८

BBIU-038 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०३८

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

https://atoplay.com/channels/161b46021d2e83 ? हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ? दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅?? ??? BBIU-038 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - अडतीसावा वेळ - 48.53 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 35 ते 37 मद्यपीडेविषयी आणखी काही वाचन क्रमशः फ्रेड ची कहाणी समीक्षा पुन्हा तोच आजार शब्द, वाक्य आणि उदाहरण वेगळे पण मुद्दे किंवा आजार तोच इंसॅनीटी फसवा आणि प्रबळ आजार फ्रेड च्या शब्दात त्याला आजाराने कसे फसवले त्याची कहाणी निर्धार केला होता अचानक पिण्याचा विचार चमकून गेला फ्रेड फसला आणि पहिला घोट घेतला सायकल सुरू झाली ब्लॅक आऊट पुन्हा हॉस्पिटलमध्ये आता ए ए चे पटले पहिल्या घोटाला नाही म्हणता आले नाही परिणामांचा विचारही आला नाही आत्मज्ञान वाचवू शकत नाही ??? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

    शंकर राव ? आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. मला आपले विशेष कौतुक आहे कारण आपण ए ए उपक्रम व भगवद्गीता अशा दोन्ही उपक्रमांना सुंदर सुंदर विस्तृत प्रतिक्रिया इथे ही लिहिता आणि त्याच प्रतिक्रिया Atoplay वर पण पोस्ट करता आणि ते ही अगदी नियमितपणे ✍️?✍️?✍️? आपले खुप खुप आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मीं शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव (पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -038 ची प्रतिक्रिया ?मद्यपाश या आजाराबद्धल आणखीन काहीतरी हे प्रकरण आजार समजल्यावर,पहिली पायरी ही 100% मनात कोणतीही आडकाठी न ठेवता का घ्यायला हवी हे वाचकांच्या मनावर बिबवण्यासाठी लिहिलेले आहे.हा आजार धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा फसवा आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कहाण्यातून आपल्याला समजण्यासाठी हे दाखवून दिले आहे.त्यातील फ्रेडची ही कहाणी... ?मागील भागात फ़्रेंडला ए ए सदस्यांनी आजाराबद्धल सांगितले होते.पण आजार समजूनही तो मद्यासक्त आहे हे मानायला तयार न्हवता.?काहीकाळानंतर तो हॉस्पिटल मध्ये आहे हे समजले , तो प्रचंड हादरलेला होता आणि ए ए सदस्यांना भेटण्यास तो उत्सुक होता.?फ़्रेंडकडे पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा सर्वकाही होते.मद्यपान करण्यासाठी त्याच्याकडे कोणतेही कारण न्हवते. त्याने तसा निर्धारही केला होता, आणि तरी तो अंथरुणाला खिळला होता. ?त्याच्याबाबत काय घडले ते आता तो सांगत आहे..?तो म्हणतो मद्यपान करण्याआधी मनातील विचार कसे माझी इच्छाशक्ती, कर्तृत्व, माझा गर्व ह्या सर्वावर मात करतो जो आजाराचा फसवा भाग आहे.?आजार मला पटला होता पण तो मला झाला आहे हे मला मान्य न्हवते.?पहिला घोट घेण्याआधीची पागलपणाची उर्मी मला पटली होती, पण माझ्याबाबतीत तुमच्यासारखे होणार नाही.कारण इतर व्यक्तिगत प्रश्नांची सोडवणूक करण्यात मीं यशस्वी होत असे, तसेंच मद्यपानाच्या बाबतीतही होईन हा आत्मविश्वास माझ्यात होता. ?काही काळ त्याचे सुरळीत चाललेही होते. पण एके दिवशी त्याला कामानिमित्त बाहेर गावी जायला लागले.तसा तो या आधी बऱ्याचवेळा बाहेरगावी कामानिमित्त गेला होता.त्यावेळी त्याला कधीही दारु पिण्याची इच्छा झाली न्हवती. त्यामुळे त्यात नावीन्य असे काहीच न्हवते. तो सर्वदृष्टीने सक्षम होता.?त्याचे कामही चांगल्यारीतीने पार पडले. त्यामुळे तो खूष झाला आणि त्याचे भागीदारही खूष होतील याची त्याला खात्री होती.?त्याला त्यावेळी दारु पिण्याची कोणतीही शक्यता न्हवती.?काम संपवून तो हॉटेलमध्ये गेला, आणि जेवणासाठी तो भोजनालयात गेला असता त्याच्या मनात एक विचार आला की जेवणापूर्वी एखादंदोन कॉकटेल का घेऊ नये(आजाराचा फसवा भाग)??मनातील विचारांवर त्याने लगेंच कृती केली आणि जेवणाबरोबर कॉकटेलही मागवली.त्यानंतर अजून एक कॉकटेल त्याने प्यायले.?भोनानंतर शतपाउली मारून तो हॉटेलमध्ये परत आला, आणि पुन्हा त्याच्या मनात विचार आला की निजण्यापूर्वी एखादे ड्रिंक घ्यावे म्हणजे चांगली झोपही लागेल.(वाढत जाणारा आजार).?त्यानंतर तो परत बारमध्ये गेला. त्याने एक ड्रिंक घेतले आणि त्याची ऍलरजीं ट्रिगर झाली. त्यानंतर तो सकाळपर्यंत पेग घेतच राहिला.?त्यानंतर त्याला एव्हडेच आठवते की सकाळी तो त्याच्या घरी जाणाऱ्या विमानात बसला. विमानतळावर त्याच्या पत्नीऐवजी त्याला टॅक्सीड्राइव्हर मित्र भेटला.त्याने त्याला अनेक दिवस इतरत्र फिरविले. तो कुठे गेला, काय बोलला यापैकी फार थोडेच त्याला आठवत होते.त्यानंतर त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल केले, असे त्याचे हे असह्य मानसिक, आणि शारीरिक यातना देणारे अनुभव होते.?आता त्याला ए ए मेंबर सांगत होते ते पटले होते, आणि तो त्याची कबुलीही देत होता. ?नुसता आजार समजून चालणार नाही, त्यावरील उपाय आणि कृतीचा कार्यक्रमपण समजून घायला हवा. ?या आजारावर आध्यात्मिक कार्यक्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि दररोज आध्यात्मिक प्रगती करत रहाणे जे आपल्या हातात आहे.?मद्यपाशा समोर 100% शरणागती म्हणजे हेच आहे. आपण दिलेले साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देतो आणि पुढील भाग पाठवावा ही विनंती करतो. केदार भाऊंचे आभार. ?????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर राव ? आपले कौतुक करावे तितके कमीच आहे. मला आपले विशेष कौतुक आहे कारण आपण ए ए उपक्रम व भगवद्गीता अशा दोन्ही उपक्रमांना सुंदर सुंदर विस्तृत प्रतिक्रिया इथे ही लिहिता आणि त्याच प्रतिक्रिया Atoplay वर पण पोस्ट करता आणि ते ही अगदी नियमितपणे ✍️?✍️?✍️? आपले खुप खुप आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम , मी राजेश. पी. (नई रोशनी समूह ,जोगेश्वरी (पूर्व )मुंबई. मला समजलेले बिग बुक भाग 38 ची प्रतिक्रिया देत आहे. .. .. . त्यावेळच्या सभासदांना फ्रेड बद्दल काही काळा नंतर कळलेले होतें. फ्रेड पुन्हां हॉस्पिटल मध्ये अँडमीट आहे. यावेळी मात्र फ्रेड बराच हादरलेला होतां. वारंवार सगळं ठरवून ,मला सगळी अक्कल असताना ,इच्छाशक्तीच्या जोरावर दारू पासून लांब राहण्याचा प्रयन्त फेल कां गेला ? फ्रेडने सभासदांना हॉस्पिटल मध्ये पुन्हां बोलावून घेतले. फ्रेड सांगू लागला तुम्ही मद्यपाशा बद्दल जे काही सांगितलं होतं त्याचा माझ्या मनावर चांगला परिणाम झाला होतां. मला आता मद्यपान करणे शक्य नाही असे खरेखुरे वाटले होतें. पहिला घोट घेण्याअगोदरची जी इनसॅनीटी असते जो पागलपणा असतो हे देखील तुमच्या सांगण्यातून पटले होतें. पण माझे आत्मज्ञान , माझा आत्मविश्वास असे सांगत होता फ्रेड तुझ्या बाबतीत असे काही होणार नाही. तुझे व्यक्तीगत प्रश्न तू यशस्वी रीत्या कोणाचीही मदत न घेता सोडविले आहेत. फ्रेड म्हणतो स्वता बद्दल आत्मविश्वास ठेवण्याचा मला अधिकार आहे. फ्रेड स्वतःशीच युक्तिवाद करतं होतां. एकदा कामानिमित्त साक्ष देण्यासाठी मला वॉशिंग्टनला जावे लागले. माझे तिकडचे काम देखील चांगले झाले होतें त्यामुळे वाईट घडण्याचे काहीच कारण नव्हते. रात्रीच्या जेवणासाठी तो हॉटेलच्या आवारात आला. आणि फ्रेडच्या मनात पटकन विचार आला ,जेवणापूर्वी ऐक दोन कॉकटेल घेण्यास काय हरकत आहे. हा जो या रोगाचा फसवा भाग आहे त्याने फ्रेडला फसवले. त्याने पटकन कॉकटेल आणि जेवणाची ऑर्डर दिली. दोन कॉकटेल झाली. जेवल्यानंतर हॉटेलच्या रूमवर आल्यानंतर ऐक विचार सरकून गेला झोपण्यापूर्वी दारूचा ऐक चषक घेतला तर चित्तवृत्ती उल्लासित होतील. दारूचा चषक घेतल्यानंतर नंतरचे फ्रेडला अंधुक आठवत होतें तो न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानात बसल्याची. न्यूयॉर्कला आल्यावर ऐक कॅब ड्राइवर त्याला रिसीव्ह करायला आला त्याच्या बरोबर तो अनेक दिवस ब्लॅक आऊट स्टेज मध्ये फिरत राहिला. आणि मग प्रचंड शारीरिक मानसिक यातना देणारी परिस्थिती म्हणजे पुन्हा हॉस्पिटल मध्ये अँडमीट. .. .????हॉस्पिटल मध्ये फ्रेडचा मेंदू विचार प्रवरुत्त झाल्यावर फ्रेडने चिंतन करायला सुरवात केली. नेमके असे काय घडले की मी स्लीप झालो. .. . त्याच्या लक्षात आले ,तो जादा आत्मविश्वासात होतां. मद्य त्याला पुन्हां घेरणार आहे इतपत तो गाफील राहिला. त्यामुळे पहिल्या घोटाचा त्याने प्रतिकारही केला नाही. मद्यपाश प्रबळ आहे. . कारण आम्हांला मनाने तो दारू पासून लांब राहू देत नाही. आणि शरीराने थांबू देत नाही. माझे मन मद्यासक्त असेल तर वेळ आणि ठिकाण मला केव्हाही घेरु शकते. 100% शरणागती म्हणजे नेमके काय हे आता फ्रेड ला समजले होतें. ???? केदार भाऊ तुमचे लाख लाख आभार , तुम्ही पाठवत असलेली ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची हमी देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? अब्बार ?

You may also like

163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video
163332626bd00c1664296486
video