Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-039 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणचाळीसावा

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-039 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणचाळीसावा

BBIU-039 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणचाळीसावा

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-039 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एकोणचाळीसावा वेळ - 48.57 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 37 ते 38 फ्रेड ची कहाणी शेवट त्याचे, ए ए सदस्यांचे आणि डॉक्टरांचे मत हतबलता केवळ आध्यात्मिक उपाय आणि एकच उपाय पहिल्या पायरीचे फायनल प्रश्न आमची हतबलता आणि अस्ताव्यस्तता आमची मनोमनी (अंतर्मनातून) कबुली की आम्ही हतबल आणि अस्ताव्यस्त आहोत पहिली पायरी बिगबुक च्या पद्धतीने पूर्ण अभिनंदन ???

आपले ऑडिओ केवळ वैयक्तिक वापरासाठीच वापरावे. कृपया आपले ऑडिओ किंवा त्यासंदर्भातील काहीही कोणालाही कोणत्याही स्वरूपात परस्पर देऊ नका ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे. ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

पुढचा ऑडिओ किमान 4 दिवसांनी मागवावा. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर, मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -039 ची प्रतिक्रिया... ?फ्रेडची कहाणी उत्तरार्ध.... ?फ्रेडला ए ए चे दोन सभासद पुन्हा भेटावयास आले त्यांनी त्याला दोनच प्रश्न विचारले, ?त्याने आपण मद्यासक्त आहोत, आणि आपला संपूर्ण पराभव झाला आहे हे मान्य केले, कारण त्यांनी त्यांच्या अनुभवातून त्याला त्याची मद्यासक्त मनस्थिती जी त्याने प्रकट केली होती ती नैराश्यपूर्ण परिस्थिती दाखवून देत होती.?त्याला हे 100% पटले होते की तो स्वतःच्या हिमतीवर,इच्छाशक्तीच्या बळावर मद्यापासून दूर नाही राहू शकत.?ए ए सदस्यांनी फ्रेडला या आजारावरील आध्यात्मिक उपाय आणि कृतीच्या कार्यक्रमाची माहिती दिली.त्यांनी हा उपाय यापूर्वी शेकडो लोकांनी अमलात आणलेला असून त्यात ते यशस्वीही झालेले आहेत हेही सांगितले.?फ्रेडचा चर्चशी फारसा संबंध न्हवता, तरीही त्याला त्यांच्या सूचना बौद्धिक दृष्टीने आत्मसात करायला अवघड वाटल्या नाहीत.पण कृतीचा कार्यक्रमाचे तसें न्हवते,तो कडवा असला तरी शहाणपणाचा होता. तो कृतिमध्ये आणणे तेवढे सोपे न्हवते कारण तो क्षणाक्षणाला मनाविरुद्ध वागायला लावणारा होता.?त्यासाठी जन्मभर जतन केलेला आपला (स्वतःकडे, जगाकडे, परमेश्वराकडे)बघण्याच्या दृष्टिकोन सोडून नविन गोष्टींचा (दृष्टिकोनाचा) स्वीकार करायला हवा जे की तेव्हडे सोपे न्हवते.?फ्रेड म्हणतो, ज्याक्षणी मी तो स्वीकारण्याचा निर्धार केला त्याक्षणी माझ्या मनात एक अपूर्व भावना जागृत झाली की माझी मद्यासक्त भावना नाहीशी होत चालली आहे, आणि त्याचा त्याला प्रत्ययही आला, आणि हे 100% शरणागती पतकरल्यावर झाले असे त्याला वाटू लागले.?फ्रेड म्हणतो की मला हा शोध लागला की माझ्या विचार करण्याच्या प्रक्रियेत आध्यात्मिक तत्वेच माझे सारे प्रश्न सोडवू शकतात. माझा पैसा, प्रतिष्ठा, अक्कलहुशारी हे सर्वकाही ते सोडवू शकत नाहीत.?तो म्हणतो की ए ए च्या जीवनपद्धतीत तो आता सामावून गेला आहे, आणि ती विलक्षण समाधानी आहे, आणि मला आशा आहे की ती पूर्वीच्या जीवनपद्धतीपेक्षा खूपच उपयुक्त आहे. ?तो म्हणतो की मी आता पूर्वीच्या जीवनपद्धतीकडे परत जाणार नाही. येथे फ्रेडची कहाणी समाप्त होते. ?फ्रेडची ही कहाणी ए ए तील सदस्यांना उदबोधक ठरेलं असे बिगबुकच्या लेखकांना वाटते.?डॉक्टर आणि मनोवैज्ञानिक आमच्या या निर्णयाशी सहमत होतात.?एका जगप्रसिद्ध डॉक्टरांचे म्हणणे आहे की ए ए सदस्य जे बोलतात त्या मताशी ते 100% सहमत आहेत.?मद्यापुढील हतबलतेवर आध्यत्मिक उपाय आणि कृतीचा कार्यक्रमच त्यांना सुधारू शकतो.?ते म्हणतात की मी धार्मिक नसूनही तुमच्या बाबतीत कोणतीही मानवी शक्ती अथवा डॉक्टर तुम्हांला त्यातून वाचवू शकत नाही. ?तुमच्यासारख्या लोकांच्या बाबतीत याच्याशिवाय दुसरा उपायच नाही. ?यानंतर पहिल्या पायरीचे महत्वाचे प्रश्न, आपली अस्ताव्यस्तता यावर पुस्तकात आणखीन कुठे लिहिले आहे याबाबत केदार भाऊंनी माहिती दिली आहे. केदार भाऊंचे आभार आणि पुढील भाग पाठवावा ही त्यांना नम्र विनंती. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह जोगेश्वरी , मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 39 ची प्रतिक्रिया देत आहे. .. . एवढ सगळं घडल्यानंतर देखील ए. ए. चे दोन सभासद फ्रेड ला भेटायला आले. त्यांनी पहिल्या पायरीचे दोन प्रश्न फ्रेड ला विचारले. आता तरी फ्रेड तू स्वतःला मद्यासक्त मानतोस की नाही ? आणि दुसरा प्रश्न यावेळी तरी तुझा संपूर्ण पराभव झालेला आहे असे तुला वाटते की नाही ? त्या दोन सभासदांनी त्यांच्या अनुभवांचा डोंगरच फ्रेड समोर ठेवला. फ्रेडला मागच्या वेळेला जी आशा वाटत होती की स्वतःच्या हिमतीवर मी दारू थांबवू शकेन ती आशा देखील आता मावळली होती. आता फ्रेड ला 100%पटलं होतं मी स्वताच्या आत्मविश्वासावर दारू पासून लांब राहू शकत नाही. मद्यपाशातून सुटका करून घेऊ शकत नाही. त्या दोन सभासदांनी उपाययोजना व आध्यात्मिक क्रुतिचा कार्यक्रम याची संपूर्ण कल्पना फ्रेडला दिली. फ्रेड काही रोलँड सारखा किंवा डॉ. बॉंब सारखा चर्च भक्त नव्हता. त्याची चर्चशी तोंडओळख होती. फ्रेड म्हणतो हा कार्यक्रम बौध्दिकरीत्या समजून घ्यायला जड नव्हता पण प्रत्यक्ष क्रुतित आणायला कठीण होता.या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची म्हंटलं तर जन्मोजन्मी ठरविलेल्या कल्पना , माझा स्वताकडे बघण्याचा ,जगाकडे बघण्याचा ,देवा कडे बघण्याचा , अँगल मला बदली करावा लागेल. आणि ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. तरीही हा पुढचा कार्यक्रम घ्यायला फ्रेड तयार झाला. आणि त्याच क्षणी एक विलक्षण भावना फ्रेडच्या मनात निर्माण झाली. माझा मद्याचा प्रश्न आता सुटणार आहे असे त्याला आतून वाटायला लागले. ????बरेच डॉक्टर आणि मनोवैज्ञानिक आमच्या मताशी म्हणजे आमचा आजार ,उपाय ,आणि आध्यात्मिक क्रुतिच्या या कार्यक्रमाशी सहमत होतात. डॉक्टर सांगतात तुम्ही जी मद्यपाशातिल हतबलता सांगता कारण तुम्ही स्वतःला पहिल्या घोटापासून लांब राहू शकत नाही आणि एकदा का पहिला घोट घेतला की मी थांबू शकत नाही. आम्ही डॉक्टर असून देखील तुम्हांला वाचवू शकलो नाही. तुम्हांला दैवीशक्ती वगळता कोणीही वाचवू शकले नसते. तुमच्या सारख्यानचे अनुभव भयानक असतात ,रुदय पिळवटून टाकतात. आम्ही डॉक्टर किंवा जगातील कुठलीही मानवी शक्ती एखादं दुसरा अपवाद सोडला तर वाचवू शकला नाही. त्यामुळं तुमचा बचाव उच्चशक्ती कडून होईल. (इथे मद्यपिडे बद्दल हे प्रकरण संपले आहे. ) पुढे केदार भाऊंनी पहिल्या पायरी विषयीचे प्रश्न आणि उत्तरे सांगितली आहेत. ) ????केदार भाऊ धन्यवाद धन्यवाद तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथे थांबतो. .. . ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video
163419725e25341665242917
video