Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-041 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एककेचाळीसावा

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-041 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एककेचाळीसावा

BBIU-041 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एककेचाळीसावा

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

??? BBIU-041 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - एककेचाळीसावा वेळ - 48.39 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 40 ते 41 आम्ही आज्ञेयवादी दुसऱ्या पायरीचा प्रवास क्रमशः आमचे परमेश्वराबद्दलचे पूर्वग्रह आमचे चुकीचे विचार मनाची तयारी विश्वास ते श्रद्धा प्रवास गॅरेज उदाहरण परमेश्वराची तुमची स्वतःची कल्पना (कागदावर लिहिल्यास फायदा होतो) नवी शक्ती आणि नवी दिशा ???

आपली ह्या भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये पोस्ट करा माझ्या Kedar Seeker सनातन संस्कार चॅनेल ला पण सबस्क्राईब करावे ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे. ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव (पूर्व), मुंबई . म स बी बु भाग -041 ची प्रतिक्रिया. प्रकरण -4, आम्ही अज्ञ्येवादी (दुसरी पायरी) ?आमच्यपैकी बऱ्याच लोकांच्या देवाबद्धलच्या कल्पना, भावना पूर्वग्रह दूषित झालेल्या होत्या, त्यामुळे आम्ही देवाची कल्पना मान्य करू शकत न्हवतो.?कारण लहानपणी आमच्यावर जे संस्कार झाले होते, आणि आम्ही जे ऐकत होतो की आम्ही जर खोटे बोललो, देवाला नमस्कार केला नाही, उपवास केला नाही वगैरे वगैरे तर तो आम्हांला शिक्षा करणार आहे?. त्यामुळे आमच्यामद्धे देव हा शिक्षा देणारा आहे ही कल्पना ठाम रुजलेली होती.?आम्ही त्याची चांगली बाजू कधीच बघितलेली न्हवती?देव हा सर्वांसाठी प्रेमळ आहे, सर्वांचे कल्याण करणारा आहे,सर्वांची काळजी घेणार आहे ही चांगली भावना कधी आमच्यात रुजलीच न्हवती.?त्यात दारु सुटावी म्हणून प्रार्थना करत होतो पण ती थांबत न्हवती. त्यामुळे देव आहे पण तो माझ्यासाठी नाहीच आहे. असा ठाम विश्वास झालेला होता.?आमच्या जीवनात देव पुन्हा कधीच येणार नाही अशी आमची ठाम कल्पना झाली होती.?अशा दोलायमान स्थितीत आम्ही ए ए त आलो होतो.?ह्या भावना आम्ही समजू शकतो असे पुस्तकाचे लेखक म्हणतात, कारण आम्हीही पहिल्यांदा ह्याच भावना घेऊन ए ए त आलो होतो.?आम्हाला आमच्या कर्तृत्वावर एवढा भरवसा होता की सर्वकाही मी करू शकतो, मला परमेश्वराची गरजच नाही, आणि जे लोक त्याची मदत घेतात ते दुबळे आहेत असा आमचा समज झालेला असतो.?जे धर्मगुरू देवाबद्धल बोलतात त्यांच्या कृतीतून त्यांची आध्यात्मिकता आम्हांला दिसून येत न्हवती तेही संघर्ष करत होते.?जगात जर परमेश्वर आहे तर जगावर आपत्ती का येत होत्या??यासर्वांमुळे आम्ही देवाकडे, जगाकडे संशयाने बघत होतो.?देव कोणी बघितला आहे? वगैरे भावना घेऊन आम्ही आलेलो होतो.?पण एखादे दिवशी आकाशातील तारे, सूर्य, चंद्र पाहून आम्ही हेही विचार करायचो की हे सर्व बिनबोभाट कोण करतो? याचेही आम्हांला आश्चर्य वाटतं होते. पण हा विचार आमच्या मनात क्षणिक यायचा आणि निघूनही जायचा. येथेच आमचा परमेश्वराच्या अस्थीत्वाचा प्रवास सुरू झालेला असतो.?आम्ही जेंव्हा आमचे परमेश्वराबद्धलचे पूर्वग्रह बाजूला ठेवून, आपल्याहून श्रेष्ठ अशी शक्ती आहे असा विश्वास ठेवून नुसती मनाची तयारी केल्यावर त्याचा आम्हाला प्रत्ययही येऊ लागला.?जेंव्हा आम्ही मनाची तयारी करून ए ए तील सभासद जे सांगतात त्यावर विश्वास ठेवून कृती करायला लागतो तेंव्हा आम्ही हळूहळू दारूपासून दूर राहू लागतो.?त्यात सातत्य ठेवले की त्याचे श्रद्धेत परिवर्तन होते. आणि येथेच आमची दुसरी पायरी घ्यायला सुरुवात होते.?त्यामुळे मनाची तयारी, खुले मन, प्रामाणिकता, विश्वास ह्या आम्हाला प्रत्येक पायरी घेण्यासाठी अत्यावश्यकच आहे.?आमची पहिली पायरी आम्हाला 100% घ्यायची आहे. दुसरी पायरी आम्हाला तुकड्या, तुकड्याने जन्मभर घ्यायची आहे.?परमेश्वराबाबत आमचे पूर्वग्रह दूषित असल्याने ए ए आम्हाला सांगतात की तुम्हांला वाटेल त्या परमेश्वराला माना. (जसे बिलना ए बी टी ने सांगितले होते).?ती परमेश्वराची कल्पना कशीही असू दे, ती श्रद्धा ठेवण्यासाठी पुरेशी आहे असे ते सांगत होते.?आम्ही जेंव्हा हे करतो तेंव्हा आमच्यामाद्धे एक नवी शक्ती संचारल्यासारखी आणि तिच्या मार्गदर्शनाची एक नवी दिशा आम्हांला भासू लागते.?त्यामुळे नुसती प्रार्थना आणि श्रद्धा ठेऊन काही होणार नाही, आम्हाला कृती ही करायला हवीच. म्हणून बिल ने लिहिलेच आहे की कृतिविना श्रद्धा मृतवत आहे.?आता आम्हाला हे समजले आहे की आम्हाला जे शक्य आहे तेच परमेश्वर आम्हाला करायला सांगतो, तो दयाळू आहे, शिक्षा देणारा नाही. आपण दिलेले साहित्य कोणालाच देणार नाही, पुढील भाग पाठवावा ही विनंती. केदार भाऊंचे आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर राव ? आभार आभार आभार ?

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ , सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह , जोगेश्वरी. मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 41 ची प्रतिक्रिया. .. . नवागतानच्या उच्चशक्ती बद्दलच्या भावना त्यांचे परमेश्वरा बद्दलचे पूर्वग्रह दूषित झालेले असतात. 80% सभासद नास्तिक किंवा अद्नेयवादी अवस्थेला पोहचलेले असतात. त्यातील काही लोकं धर्म विरोधी असतात.देवाचं नाव ऐकले तर आम्हाला धर्माने शिकवलेला आमच्या घरच्या लोकांनी शिकवलेला देव आम्हाला आठवतो. आई वडिलांच्या बोलण्यात सक्ती असते तुला नमस्कार केलाच पाहिजे तू पूजा अर्चा केलीच पाहिजे हे सगळं नाही केलंस तर तू नरकात जाशील. त्यामुळे माझे देवा बद्दल प्रचंड गैरसमज झालेले असतात. देव हा ठरावीकचं लोकाना मदत करतो. पण माझ्या आयुष्यातून देव निघून गेला आहे. ????एक वर्ग असतो जो स्वताच्या आकलेवर ,स्वताच्या कामगिरीवर ,स्वताच्या कर्तुत्वावर जादा आत्मविश्वास असतो पण त्याला गर्वाचि झालर असते. देशावर ,जगावर आपत्ती का येते , युध्द का होतात या जगतनियन्त्याला काय चिंता आहे माणसे जगोत किंवा मरोत असा देवा बद्दलचा तुच्छ विचार आमच्या मनात येत असतो. पण आम्ही कितीही नास्तिक असलो किंवा अद्नेयवादी असलो तरीही या जगाला चालवणारी एक शक्ती आहे हे आम्ही कळतंनकळत पणे का होहिना पण ते आम्ही मान्य करतो. ग्रह ,तारे एकमेकास धडकत नाहीत , आकाशातून सूर्य कधी खाली पडत नाही , चंद्र पडत नाही. ही किमया हे नियोजन कोणाचे आहे त्या शक्तीला आम्ही नक्कीच मानत होतो. ए. ए. मध्ये आल्यावर प्रथम मनाची तयारी करावी लागते ,मग कशावर तरी विश्वास ठेवावा लागतो. मग क्रुति करावी लागते ,याची गोड फळे मिळायला सुरवात होते. आणि मग या कार्यक्रमावर माझी श्रध्दा बसते. ज्यो आणि चार्ली मधील जे उदाहरण गाडी गॅरेज याच्या बाबत दिले आहे त्यावरून विश्वासाकडून श्रध्देकडे घेऊन जाणारा हा प्रवास आहे हे कळते. बिल यांच्या जीवनात परमेश्वर झटकन आला पण आमच्या जीवनात देव सावकाशीने येणार आहे. पहिल्या पायरीत कुठल्याही प्रकारची हात राखणी असता कामा नये. दुसरी पायरी आयुष्यंभर तुकड्या तुकड्याने घेता येते. ए. ए. आपणा सर्वांना परमेश्वरा बाबत ओपन चॉईस दिलेला आहे. दुसऱ्या लोकांच्या देवाविषयी काय कल्पना आहे याचा विचार करण्याची आम्हाला गरज नाही. माझ्याकडे नवीन शक्ती नव्हती पण अशी शक्ती आता मला मिळत आहे. ????आता माझी उच्चशक्ती मला मार्गदर्शन करणार आहे. अर्थात त्या करिता काही साधी पावले उचलण्याची गरज आहे. असेल हरी तर देईल खाटल्यावरि आता ही साधी पावले म्हणजे काय तर बारा पायऱ्या. पायऱ्यांचे आचरण करण्याचे काम हे मलाच करावे लागेल. हे माझं काम परमेश्वर माझ्या करिता करणार नाही. परमेश्वर माझ्या करिता त्याचे काम करणार आहे. जे देवाची भक्ती करतात ,आराधना करतात ,श्रध्दा ठेवतात त्याना देव कठीण अशा अटी घालत नाही. यातून एक गोष्ट लक्षात येते परमेश्वर हा शिक्षा देणारा नाही. हा असा परमेश्वर आहे तो कोणालाही वगळत नाही. ????केदार भाऊ तुमचे आभार. तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार !!! ???

You may also like

16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video
16357ddbc8f98e1666702780
video