Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-043 (मसबिबु) मला समजलेले बिगबुक भाग क्र ४३

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-043 (मसबिबु) मला समजलेले बिगबुक भाग क्र ४३

BBIU-043 (मसबिबु) मला समजलेले बिगबुक भाग क्र ४३

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

माझ्या "Kedar seeker सनातन संस्कार" चॅनेलला पण सबस्क्राईब करावे ? हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ? दारुड्यांनी चॅनेल सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ? प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ? ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? BBIU-043 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - त्रेचाळीसावा वेळ -  49.28 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर आम्ही आज्ञेयवादी (दुसरी पायरी) वाचन क्रमशः

? पान क्र 44 ते 45 आम्ही आज्ञेयवादी दुसऱ्या पायरीचा प्रवास क्रमशः पुन्हा नागरिक धर्माबद्दलचे गैरसमज सोडून द्या आमचे चुकीचे विचार आणि दृष्टिकोन आम्ही काय चुकीचे केले आम्ही श्रद्दा का ठेवली पाहिजे दुसऱ्या पायरीची आश्वासने हळूहळू विचारांमध्ये बदल श्रद्धेकडील प्रवास ??? कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -043, प्रकरण -4 याची प्रतिक्रिया खाली देत आहे. ?आम्ही परमेश्वराचा एक छोटासा भाग आहोत हे मानण्या ऐवजी आम्ही मानवी बुद्धी ही जीवनाचे सर्वस्व आहे असाच विश्वास दृढ करण्याचा प्रयत्न केला.?आमचा परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टिकोन, तो वेडा विचार, हे सर्व निष्फळच ठरले नाही का??बिल डब्लू म्हणतात की जगातील कोट्यावधी लोकांना ज्या धार्मिक ग्रंथानी, पंथानी, पुस्तकांनी जीवनाला नवी दिशा मिळवून दिलेली आहे, श्रद्धा मिळवून दिलेली आहे आणि त्यांचे जीवन सुरळीत सुरू आहे, तेंव्हा तुम्हीही त्याबद्धलचे असलेले तुमचे विचार काढून टाका. आम्हांला त्यांना पटण्यासारखी कोणतीच कल्पना सादर करता आलेली नाही.?आम्ही जरी त्यांची चेष्ठा करीत होतो, तरी आमच्यासारखे ते चलबिचल, विवेक हरवलेले न्हवते.त्यांच्या जीवनाला स्थिरता, सुख, उपयुक्तता दिसून येत होती, जी आमच्यात न्हवती. ?आम्ही धार्मिक लोकांच्या दोषाकडे,उणीवांकडेच कायम लक्ष पुरविले, त्यांच्या उणीवांचा त्यांच्या आध्यात्मिकतेवर हल्ला करण्यासाठी उपयोग केला.?त्यांच्यातील चांगल्या गोष्टींकडे कधीच लक्ष पुरविले नाही. आम्ही कायमच परमेश्वर आम्हाला शिक्षा देईल, आम्हांला पाप लागेल वगैरे गोष्टींकडे लक्ष देत राहिलो.?आम्ही धार्मिक लोक कायमच दुसऱ्याला सहकार्य न करणारे लोक आहेत अशी ओरड करीत होतो.?त्यांची चांगली बाजू आम्ही कधीही बघितली नाही.?आम्ही आयुष्यभर नकारात्मकतेवर भर दिला आणि त्याचीच ढाल करून आम्ही दारु पित राहिलो होतो.?पुस्तकातील व्यक्तिगत कहाण्यात प्रत्येकाचा श्रेष्ठतर असलेल्या शक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन यात बराच फरक दिसून येईल.?आमचे विचार त्यांच्याशी सहमत होत न्हवते. आमचे विचार त्यांच्या विचाराशी जुळो अथवा न जुळो, अनुभवाने आम्हाला हे शिकविले की याची चिंता करण्याचे कारण नाही.?आम्ही फक्त आमचे अनुभव आणि विचार तुमच्या समोर ठेवत आहोत, कोणतीही सक्ती नाही. प्रत्येकाने हे प्रश्न आपल्यापरीने सोडवायचे आहेत.?बिल आता हळूहळू आपल्याला परमेश्वरावरील श्रद्धेकडे नेत आहेत. परमेश्वर आहे याला काय पुरावा आहे?, आणि त्यावर आम्ही श्रद्धा का ठेवावी? याचे उत्तर देताना ते म्हणतात ?आमच्यातील प्रत्येकाने आपल्यापरीने आपल्यापेक्षा श्रेष्ठतर अशा शक्तीशी संपर्क साधला आहे आणि त्या शक्तीवर त्यांची नितांत श्रद्धा आहे.?त्या उच्चशक्तीने प्रत्येकाच्या बाबतीत चमत्कार घडवून आणलेला आहे. मानवीदृष्टीने दारु थांबवणे अशक्य होते ते त्याने साध्य करून दाखवले होते आणि तो आमच्यासाठी पुरावाच आहे म्हणून आम्हाला परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा.?आम्ही ए ए चे सदस्य हे धार्मिक आहेत असे नाही, ते सामान्य जीवनही जगत असतात. अशा प्रापंचींक जीवन जगत असणाऱ्या लोकांच्या निवेदनाचे सारच ते आपल्या पुढे ठेवत आहेत.?त्यांनी स्वतःपेक्षा उच्चशक्तीवर विश्वास ठेवल्यापासून (दुसरी पायरी घ्यायला सुरुवात केल्यापासून) त्यांच्या जीवन व विचार करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक बदल घडून आला आहे. (त्यासाठी मनाची तयारी, विश्वास, आणि श्रद्धा असायला हवी)आणि हे एक आश्वासन आहे.?आमचे पूर्वीचे जीवन, त्यातून येणारी निराशा, आणि मानवी प्रयत्नांना येणारे अपयश हे जाऊन आमच्यामध्ये एक नवी शक्ती, एक नवी दिशा, शांतता, सुख जागृत झालेली आम्हांला दिसते आणि हे एक आश्वासन आहे.?आम्ही जर दुसऱ्या पायरीपासून पुढील वाटचाल सुरू ठेवली तर आमच्याही जीवनात हे घडून येणार आहे.?आता त्यांना हे कळले आहे की आपण कोणत्या कारणासाठी जीवनावर सारा भार टाकीत आहोत.?आता ते मद्यपानाचे प्रश्न वगळून त्यांचे जीवन इतके असमाधानकारक का होते हेही ते सांगू लागले.?त्यांना सुख, प्रसन्नता का मिळत न्हवती हेही ते आता सांगू लागले आहेत. ?त्यांनी कार्यक्रम कसा घेतला आणि त्यांच्यात बदल कसा घडून आला हेही ते सांगू लागले आहेत.?शेकडो लोक जेंव्हा हे सांगू शकतात की परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ही त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तेंव्हा साहजिकच माणसाने श्रद्धा का ठेवावी याचे एक प्रबळ कारण उपलब्धच होते.?गेल्या 100 वर्षात जगाने अधिक अधिभौतिक प्रगती केली आहे. त्याचे कारण आजच्या काळातील सर्वोत्तम लोकांएवढीच बुद्धी पूर्वीच्या लोकांना पण होती, पण त्यांची प्रगती झाली नाही, कारण आधुनिक विज्ञानाविषयी शोध, बोध आणि संशोधनाची प्रवृत्ती नसल्यासारखीच होती.?अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा, परंपरा अशा विचारांचे ते लोक होते.?त्यासाठी त्यांनी कोलंबसच्या काळातील पृथ्वी गोल आहे ही कल्पनाच मूर्खपणाची आहे, आणि ग्यालिलियोच्या खागोल शास्त्राविषयक विचार पाखंडी असल्याचे समजून त्याला मृत्युंदंड देण्यास ते उद्युक्त झाले होते. केदार भाऊंचे आभार. आपले साहित्य कोणालाच न देण्याची खात्री देऊन पुढील 44 वा भाग पाठवावा ही विनंती. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास सादर प्रणाम , मला समजलेले बिगबुक भाग 43 आम्ही अद्नेयवादी (दुसरी पायरी ) मी राजेश पी. या भागाची प्रतिक्रिया देत आहे. .. . हे काय जग चाललेले आहे त्याचा मी एक लहानसा भाग आहे. असा विचार करण्या ऐवजी आम्ही नास्तिक किंवा अद्नेयवादी लोकांनी काय विचार केला मानवीबुध्दी अखेरचे प्रमाण आहे. त्याच्या पलीकडे काहीही नाही. देव ईश्वर उच्चशक्ती असे काहीही नसते. हा आमचा वेडा विचार , निष्फळचं ठरला होता. बिल सांगतात संघटित धर्मग्रंथा बद्दल देखील आम्ही अनादर करून चालणार नाही कारण जगातल्या कोट्यावधी लोकांना त्यांच्या जीवनात नवीन दिशा मिळाली आहे. श्रध्दावान लोकं असतात त्याना जीवन म्हणजे काय याची तर्कशुध्द कल्पना असते. माहीत नव्हते ते केवळ दारुड्याना कारण आमचे स्वताकडे ,स्वताच्या जीवनाकडे बघण्याचे अँगल चुकीचे होते. आम्हाला स्वतःचे जीवन स्वता चालविता आले नाहि. त्यामुळे आम्हाला धड हेहि करता आले नाही आणि तेही करता आले नाहि मध्येच हेंगिंग गार्डन प्रमाणे अडकून राहिलो. स्थिरता ,उपयुक्तता ,दुसऱ्या करिता जीवन जगणे हे माहितीच नव्हते. आता आम्ही वर दिलेल्या गोष्टींची चेष्टा करण्याऐवजी आम्ही आतातरी याचा ध्यास घ्यायला हवा. (बिल आता आपल्याला हळूहळू श्रध्देकडे नेत आहेत )आम्हाला पुन्हां या देशाचा नागरिक ,समाजाचा घटक ,आम्हाला कामाच्या ठिकाणी एक सहकर्मी आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग बनायचे आहे. ????जी धार्मिक लोकं आहेत त्यांच्या मानवी दोषांकडेच आम्ही लक्ष देत राहिलो. देवाच्या बाबतीत देखील आम्ही तेच केलं त्याच्या चांगल्या बाबींकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही ,सतत देव हा शिक्षा करणारा आहे , देव मला नरकात नेईल. .. . आम्ही स्वतः असहिष्णु असताना त्या धार्मिक लोकाना असहिष्णु बोलतं राहिलो. जंगलात जे काही चांगलं घडत असत त्यात खरं तर आमचं कर्तुत्व काहीच नसतं पशू पक्षी जंगल अरण्य ही सगळी परमेश्वराची किमया आहे. या जंगलातल्या चांगल्या गोष्टीं आम्हाला कधीच दिसल्या नाही. आम्ही सतत जंगलातल्या कुरुप प्राण्याकडे , खराब झालेल्या झाडाकडे आम्ही लक्ष दिले. आम्ही सातत्यानं निवडुंग बघत बसलो आणि संपूर्ण जंगलाची व्याख्या ठरवून टाकली. आम्हाला लोकांच्या ,जगाच्या चांगल्या गोष्टीं कधीच दिसल्या नाहीत. माझ्या जीवनाची उजवी बाजू म्हणा , पॉजिटीव्ह बाजू होत्या तिकडे आमचे कधीच लक्ष दिले नाही. याचीच ढाल करून दारू पीत राहिलो. ????बिल सांगतात आमच्या अगोदर आलेल्या सभासदांचा श्रेष्ठतर शक्ती कडे बघण्याचा जो अँगल असतो , जे उच्चशक्ती बद्दलचे विचार असतात ते विचार आमच्या विचारांशी जुळतात किंवा नाही हा प्रश्न महत्वाचा नाही. मनाची तयारी असली तरी देखील आपण दुसऱ्या पायरिचा प्रवास सुरू करू शकतो. तुमची प्रगती करू शकता. पुस्तकातले लेखक केवळ आध्यात्मिक जीवन जगतात असे नाही तर ते प्रापंचिक जीवन देखील जगत असतात.काही साध्या गोष्टीं त्यांनी केल्या म्हणजे मनाची तयारी केली आणि विश्वास ठेवण्याची तयारी केली. हे केल्यामुळे त्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले. विचार करण्याच्या पध्दतीत जबरदस्त बदल झाले. आमच्या अगोदरचे सभासद सांगतात आमच्या जीवनात परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव ही आमच्या जीवनातील अत्यंत महत्वाची गोष्ट होती. बिल परमेश्वराबाबत आमचे मन खुले करतं आहे. आमचे देखील पूर्वीचे जे निराशाजनक जीवन होतं आता आमच्या जीवनात नवीन दिशा ,नवीन शक्ती , आंतरिक ऊर्जा ,शांतता ,सुख ,आणि मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. (आश्वासन ).????केदार भाऊ तुम्ही आमच्या प्रति घेत असलेल्या मेहनतीला आदरयुक्त प्रणाम. तुम्ही पाठवत असलेले इतर विषयांचे जे खरे तर आध्यात्मिक ऑडियो व्हीडिओ असतात ते सगळेच ऐकायला पाहायला कामाचा बोजवारा असल्यामुळं शक्य होतं नाही. जे एकेन , त्याबद्दल मात्र कमेंट लिहून पाठवेन. तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथे थांबतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार ??✍️??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? आभार आभार आभार ??✍️??

You may also like

163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video
163737cc260ace1668512962
video