Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-046 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सेहेचाळीस ???

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-046 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सेहेचाळीस ???

BBIU-046 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सेहेचाळीस ???

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे ? ??? BBIU-046 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सेहेचाळीस वेळ -  52.12 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर ए ए समूहात मीटिंगच्या आधी जे वाचले जाते त्याची माहिती आणि त्यातील चुका ए ए प्रस्तावना माहिती आणि चुका 1940 ला वाचले जाणारे प्रिअँबल पुडतकांशी जुळणारे ? हे कसे घडते, बारा पायऱ्या आणि बारा रूढी वाचन चुकांची माहिती ???

कृपया Kedar Seeker सनातन संस्कार चॅनेल ची पण नोटिफिकेशन ON करावी.

कृपया ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच भागाच्या कॉमेंटमध्ये पोस्ट करावी.

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो मी शंकर,मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव (पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -046, ची प्रतिक्रिया. ? ए ए च्या सभेत आपण प्रस्तावना, हे कसे घडते, आणि 12 पायऱ्या,12 रूढी, रोजचे प्रतिबिंब इत्यादी वाचले जाते, प्रस्तावनेमुळे नवागताना, आणि सर्व सभासदांना या सभेची माहिती दिली जाते, हे कसे घडतेमुळे कार्यक्रमांची थोडक्यात माहिती सांगितली जाते.?सभेत वाचली जाणारी प्रस्तावना, हे कसे घडते ह्या दोन्हीमध्ये आणि पुस्तकातील ह्या संदर्भातील प्रकरणाशी त्या मिळत्या जुळत्या नाहीत , त्यातील शब्द वेगळे आहेत.तो फरक आपण समजून घेणार आहोत.?आपल्या सभेत जी प्रस्थावना वाचली जाते त्यात एक मोठी चूक आहे, एक वाक्य पण त्यात राहून गेलेले आहे,आणि त्याची भाषा पण सुधारण्याची आवश्यकता आहे.?बिलच्या नजरेतूनच्या प्रस्थावनेत त्यांनी लिहिले आहे की पुस्तकातील उतार्यांचा उपयोग समूहात दैनिक चिंतनासाठी अथवा समूह चर्चा सत्रानं मध्ये व्हायला हवेत.?पहिली रूढी जी वाचली जाते तिचा अनुवादही पुस्तकांशी मिळताजुळता नाही.?तसेंच ते काहीवेळा चुकीच्या पद्धतीने वाचले जाते त्यामुळे त्याचा अर्थही वेगळा होतो जसे की आमचे सर्वांचे कल्याण हे प्राधान्याने व्यक्तिगत सुधारणा असा आहे, पण चुकीच्या स्वल्पविरामाने तसें ते वाचले जाते आणि त्याचा अर्थाच बदलतो.?1940 मध्ये वाचली जाणारी प्रस्थावना जी इंग्लिश मध्ये आहे ती समजली.?ए ए च्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश हा आपल्याला समजलेल्या उच्चशक्तीची मदत कशी मिळवायची हे सांगणारा साधा सरळ आणि सोप्पा कार्यक्रम आहे.?आम्ही एका गंभीर आजाराला बळी पडलेलो आहोत की ज्याला जगात औषध नाही आमच्यात त्या आजाराच्या ऍलर्जी मुळे आम्ही ईतर लोकांच्यापेक्षा वेगळे असतो.?कोणत्याही उपायांनी हा आजार कायमचा बरा होत नाही.?त्याच्यावरील उपाय म्हणजे स्वतःला मद्यापासून दूर ठेवणे हा असून ए ए चा तो दुसरा अर्थ आहे.?येथे कुठलीही फी,शुल्क अथवा वर्गणी आकारली जात नाही.?सदस्यत्व मिळवण्यासाठी मद्य थांबाविण्याची ईच्छा असायला हवी हीच एकमेव आवश्यकता आहे.?प्रत्येकजण दुसऱ्यांना सुधारण्यासाठी मदत करून स्वतः मद्यमुक्त रहातो.?आम्हांला उच्चशक्तीच्या संपर्कात रहाणे गरजेचे आहे त्यासाठी सातत्य हवे (3री पायरी), प्रार्थना आणि ध्यान करून आपण ती मदत घेतो.?ए ए चा मेंबर जो स्वतःला लागू करून घेतो तो कुठल्याही प्रकारे मद्य घेऊ शकत नाही.जर त्याने ते घेतले तर त्याचे सदस्यत्व रद्ध होते.?आम्ही फक्त ज्याला सुधारणा करायची आहे फक्त त्यांच्याबरोबर आमचे सुधारणेचे अनुभव शेअर करतो.?आम्हांला सापडलेला उपाय आम्हांला सर्वाना एकत्र बांधून ठेवतो, आणि कृती करायला लावतो.?हा कार्यक्रम जो मनापासून घेत नाही, ते लोक सुधारत नाहीत.?12 पायऱ्यांचा आमचा हा कार्यक्रम काम करतो आणि हा एकमेव उपाय आहे.?आम्ही ए ए चे सदस्य खूप आनंदात असतो. आमची ही जागतिक संघटना असून, आम्हांला एकत्रित ठेवण्यासाठी पहिली गोष्ट, पहिली ठेवायला पाहिजे, आणि ती गोष्ट मद्यापासून स्वतःला दूर ठेवणे ही होय.?आमच्यात श्रद्धा ही 24 तास असायला हवी, कारण ती हरवली तर आम्ही जिवंत राहणार नाही.?आम्ही जे बोलतो ती आमची वैयक्तिक मते असून त्याच्याशी सहमत होणे अथवा न होणे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कोणतीही जबरदस्ती नाही.तुम्हांला वाटल तर घ्या नाहीतर सोडून द्या.?बिगबुक मध्ये लिहिलेले सोडून येथे सांगितलेले तुम्ही सर्व सोडून दिले तरी चालेल.?प्रत्येकाने बिगबुक विकत घेतले पाहिजे, ते वाचून, पिंजून काढून त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण ए ए जी काही आहे ती फक्त आणि फक्त बिगबुक मध्ये लिहिलेली आहे आणि प्रत्येक सदस्याकडे बिगबुक असायलाच हवे असे बिल आपल्याला क्लिअर कट प्रस्तावनेत सांगतात. तसेंच हेही सांगतात की बिगबुक व्यतिरिक्त जे काही मिटिंग मध्ये सांगितले जाते त्याकडे तुम्ही संपूर्ण दुर्लक्ष करा. ?सध्याच्या प्रस्तावनेत एका महत्वाच्या वाक्याचा अनुवाद राहून गेलेला आहे, आणि ते वाक्य आहे आम्ही आमच्या स्वतःच्या योगदानाद्वारे स्वावलंबी आहोत. केदार भाऊंच्या अथक परिश्रमामुळे हे सर्व समजले त्यामुळे ते साहित्य कोणालाच कोणत्याही स्वरूपात देणार नाही याची खात्री देतो आणि पुढील भाग पाठवण्याची विनंती करतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ???? आपल्या कष्टांना वंदन ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणास राजेश पी ( नई रोशनी समूह. जोगेश्वरी मुंबई. ) चा सादर प्रणाम. मला समजलेले बिगबुक भाग 46 ची प्रतिक्रिया देत आहे. .. .. आपण सगळेजण ए ए च्या मीटिंग करतो त्याच्या सुरवातीला हे कसे घडते हे प्रकरण वाचले जाते. रोजचे प्रतिबिंब देखील वाचले जाते. आपल्यांकडे सभे मध्ये हे कसे घडते वाचले जाते ते बिगबुक मधल्या हे कसे घडते प्रकरणा शी जुळत नाही. आपण जी प्रस्तावना वाचतो त्यात देखील एक मोठी चूक आहे. प्रस्तावना ही आलेल्या नवागतांना किंवा ए ए चे शुभचिंतक येतात त्याना थोडक्यात ए. ए. काय आहे आणि काय करते हे समजण्यासाठी हे कसे घडते आणि प्रस्तावना वाचली जाते. ????1940 ला जी प्रस्तावना वाचली जायची ती देखील केदार भाऊंनी या ऑडियोत सविस्तरपणे सांगितली आहे. पण प्रतिक्रिया लांबलचक होईल म्हणून मी ती माझ्या प्रतिक्रियेत लिहीत नाही. आताची जी मराठी प्रस्तावना वाचली जाते त्यात एका वाक्याचे अनुवाद करणं राहूनच गेले आहे. वर्षानुवर्ष आपण ही प्रस्तावना वाचतो ,ऐकतो पण आपण काहीतरी मिस करतोय ,काहीतरी राहून गेलंय याचं साधं भान माझ्यासारख्या सभासदाला असू नये ही खेदाचि बाब आहे. सुधारित प्रस्तावना = अनामिक मद्यपी ही लोकांची एक भात्रुभाव संघटना आहे. जिच्या मध्ये सभासद त्यांचे अनुभव ,मनोधैर्य ,व आशादायक विचार यांची एकमेकात देवाणघेवाण करतात , ज्यामुळे ते त्यांच्या समान समस्येचे निराकरण करू शकतात. तसेच इतरांना मद्यपाशातून बरे होण्यासाठी मदत करू शकतात. .. .. .. . सदस्य होण्यासाठी मद्यपान थांबविण्याची ईच्छा असणे ही एकमेव अवश्यकता आहे. ए ए सद्सत्वासाठी कोणतीही देय रक्कम अथवा शुल्क नाही. (आता अनुवाद करायचे राहिलेले वाक्य )आम्ही आमच्या स्वताच्या योगदानाद्वारे स्वावलंबी आहोत. ए ए कोणताही पंथ ,संप्रदाय ,राजकीय धोरण संघटना अथवा संस्था यांच्याशी संबंधित नाही. , कोणत्याही वादविवादात सहभागी होऊ इच्छित नाही. कोणत्याही प्रयोजनास समर्थन देत नाही किंवा विरोधही करीत नाही. स्वता मद्यमुक्त राहणे आणि इतर मद्यासक्त व्यक्तींना मद्यमुक्ती प्राप्त होण्यासाठी मदत करणे हेच आमचे मूलभूत उद्देश आहे. ( हीच आपली प्रस्तावना आहे. ) ????आमच्या नई रोशनी समूहात देखील चुकीचे हे कसे घडते आणि चुकीची प्रस्तावना वाचली जाते.या करिता आमच्या समूहाचा सभासद म्हणून मी देखील जबाबदार आहे. पण आम्ही ती चूक तातडीनं सुधारू. आम्ही केदार भाऊंकडून बिगबुक मधील हे कसे घडते या प्रकरणाला संपूर्ण मिळतीजुळते हे कसे घडते आणि प्रस्तावना मागून घेऊ आणि आमची होतं असलेली चूक सुधारू. यानंतर हे कसे घडते हे सविस्तरपणे सांगितले आहे. बिल यांनी ओरिजनल हे कसे घडते हे प्रकरण त्या रात्री एका पेन्सिल ने लिहले होते. असो केदार भाऊ प्रतिक्रिया लांबलचक होईल म्हणून डिटेल मध्ये नाही लिहली. ???? केदार भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथेच थांबतो. तुमचे आभार. ??????

You may also like

163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video
163960e9b3f11d1670778523
video