Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-050 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पन्नास

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU-050 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पन्नास

BBIU-050 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पन्नास

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

??? BBIU-050 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पन्नास वेळ -  49.24  मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर  पन्नासाव्या भागापर्यंत पोचलूअबद्दल आपले अभिनंदन पान क्र 53 आणि 54 वाचन आणि विश्लेषण नैसर्गिक प्रवृत्ती + स्वेच्छा = विनाश नाटक आणि नट यांचे जीवन आणि मद्यासक्त यांचे उदाहरण आमची चुकीची विचार पद्धती लोक आमच्या मताप्रमाणे वागत नाहीत ते प्रतिलार करतात, संघर्ष होतो स्वार्थ, स्वयंकेंदीतता आणि आपमातलंबीपणा स्वार्थ हेच आमच्या संकटांचे मूळ होय आम्हीच पूर्वी आपण स्वार्थी निर्णय घेतलेले असतात आणि आता त्याचा बदला इतर लोक घेतात पुस्तक समजावून घेण्यासाठी इतर पुस्तके आणि ग्रेपवाईन किंवा अलकीस्पिक कोट चा वापर ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.

ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पोस्ट करावी

Kedar Seeker सनातन संस्कार चॅनेल ला पण सबस्क्राईब करावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -050 ची प्रतिक्रिया. ?आपण स्वेच्छेने परमेश्वराने दिलेल्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्यांचा कसा अतिरेक केलेला आहे आणि त्यामुळे आपले कसे नुकसान झाले आहे जे सर्वसाधारण व्यक्ती करत नाही हे बिल आपल्याला बिगबुक मध्ये समजावून सांगतात.?स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन यशस्वी होणे कठीण आहे आणि म्हणूनच आम्हांला स्वेच्छा ही बाजूलाच ठेवायला हवी.?आम्हांला दिलेल्या नैसर्गिक प्रवृत्यांचा त्याच कारणासाठी उपयोग करावयाचा आहे.?आमच्या स्वेच्छेचा हेतू कितीही चांगला असला तरी आमचा कशाशी तरी किंवा कोणाशीतरी आमचा संघर्ष निर्माण होतो आणि ते अपरिहार्य आहे, कारण आमचा हेतू चांगला असला तरी तो साध्य करण्यासाठी आमची कृती ही अनैतिक मार्गाची असते.?त्यामुळे लोक दुखावले जातात, त्यांची हानी होते आणि मग ते आपल्यावर प्रतिहल्ला करतात.?प्रत्येक मद्यपीला आपल्या म्हणण्याप्रमाणेच व्हावे असे वाटत असल्याने त्याला आपली इच्छा आणि जीवन परमेश्वरावर सोपावावी असे वाटत नाही, फक्त जेथे गरज आहे त्याच गोष्टी तो सोपाविण्यास तयार असतो. (कॅफेटेरिया स्टाईल) ?प्रत्येक मद्यप्याला असेच वाटत असते की त्यांचे जीवन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावे असेच वाटत असते.त्यासाठी त्यांनी नाटकाचे उदाहरणं दिले आहे.?तो स्वतःच नाटककार असतो,नाटकाची प्रकाशयोजना, नृत्ये, नट नट्यांच्या भूमिका, त्यांचे प्रवेश संवाद हे सर्व तोच ठरवत असतो, आणि ते तसेंच घडावे म्हणून तो सतत प्रयत्न करत असतो, आणि त्यातच तो मग्न असतो.?स्वतःला मोठेपणा, प्रतिष्ठा मिळावी, आपले जीवन सुरळीत व्हावे, त्याने तोही खूष होईल आणि लोकही खूष होतील ही आकांक्षा ठेवून तो आपल्या नैसर्गिक प्रवृत्यांमध्ये स्वेच्छा वापरत असतो.?मद्यासक्त हा गुणसंपन्न, दयाळू, सहनशील, उदार, स्वार्थत्यागीही असू शकतो याउलट तो हीन वृत्तीचा, अहंकारी, स्वार्थी, अप्रामाणिक या स्वभावदोशांनी युक्तच असतो.?मद्यासक्त आपली स्वेच्छा नैसर्गिक प्रवृत्यांमध्ये वापरून त्याची कलाकृती जेंव्हा उठावदार होत नाही तेंव्हा तो त्यासाठी लोकांनाच जबाबदार धरतो. आपले चांगले त्यांच्यामुळेच होत नाही असे म्हणून त्यांना तो दोष देतो. ?कौतुक, प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवण्यासाठी तो आणखीन जोमाने प्रयत्न करतो, आणि त्यासाठी काहीवेळा तो लोकांवर दबाव (कंट्रोल)आणतो किंवा दिलदार होतो.असे करूनही जेंव्हा त्याचे कौतुक होत नाही तेंव्हा त्याला आपले चुकत आहे हे पटते, पण मनातून त्याला हेच वाटत असते यात दुसऱ्यांचाच दोष आहे हे वाटत असते. तो रागावतो, संतापतो, स्वतःची कीव करू लागतो.तो हे विसरतो की आपण आपल्या नैसर्गिक प्रवृत्यात आपली स्वेच्छा मिसळलंल्याने हे सर्व होत आहे.?लोक हे सर्व बघत असतात, आणि जेंव्हा त्याचा त्यांना त्रास होतो तेंव्हा ते प्रतिकार करतात. काहीवेळा ते त्याचा फायदाही स्वतः घेतात. आणि मग त्याचा गोंधळ होतो आणि मग भांडण, मारामारी होते.?मद्यासक्त हा आत्मकेंद्रित, आणि स्वार्थी असतो. आणि त्यामुळे त्याला सर्वकाही मिळायला हवे असेच वाटते.?तो प्रचंड आत्मकेंद्रित असतो त्यामुळे कोणी काय करायला हवे याचाच विचार करत असतो. आणि जेंव्हा तसें होत नाही तेंव्हा तो आत्मग्लानी मध्ये जातो, त्यांचं रागात, संतापात तो आत्मकरूणेत मग्न दिसतो. ?मद्यासक्तांचे मूळ हे त्यांचा स्वार्थ, आत्माकेंद्रितता यांचा अतिरेक केल्याने त्यांच्यात अनेक भित्या निर्माण होतात, तो स्वतःला कोसायला लागतो.?काहीवेळा तो बरोबरही असू शकतो पण त्यावेळी त्याला ह्याची जाणीव झाली पाहिजे की पूर्वी आपण स्वार्थापायी त्यांना त्रास दिलेला होता आणि म्हणून आज ते तसें वागत आहेत केदार भाऊंनी खूप सुंदर समजावून सांगितले आहे, आणि आपले हे साहित्य कोणालाच देणार नाही याची खात्री देऊन पुढील भाग पाठवावा. आभार, आभार, आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? सुंदर सुंदर अतिसुंदर ✍️?✍️?✍️? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणांस सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह , जोगेश्वरी ,मुंबई. .. .मला समजलेले बिगबुक भाग 50 ची प्रतिक्रिया देत आहे. .. . आम्ही आमच्या नैसर्गिक प्रव्रुत्ति मध्ये स्वेच्छा मिसळल्याने आम्ही कधीही नॉर्मल माणसासारखे दिसलो नाही , वागलो नाही. माझे आणि माझ्या बायकोचे जोरदार भांडण झाले तर बायको दारू प्यायला जाणार नाहि मी मात्र लगेचच उठून दारू प्यायला जाणार आहे. (केदार भाऊंनी नॉर्मल माणूस आणि माझ्यात काय फरक आहे हे उदाहरण देऊन सांगितलं आहे. ) तिसऱ्या पायरिचि प्राथमिक गरज काय आहे ? .. .. पहिली आवश्यकता ही आहे स्वेच्छेवर नियंत्रित होणारे जीवन कधीही यशस्वी होतं नाहि. त्यामुळं स्वेच्छेचा वापर आम्ही आमच्या जीवनात बंद केला पाहिजे. ज्या कारणासाठी परमेश्वराने नैसर्गिक प्रवरुत्या दिल्या आहेत म्हणजे सामाजिक प्रव्रुत्ति समाजात आम्हांला एकत्र राहण्यासाठी दिली आहे. एकमेकांना आधार देण्यासाठी सुख दुःख वाटण्यासाठी दिलेली आहे. .. . सुरक्षा प्रवृत्ती स्वताचा जीव वाचवण्यासाठी , स्वताचे तसेच आमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही प्रव्रुत्ति दिलेली आहे. .. . लैंगिक प्रव्रुत्ति आम्हाला आमचे प्रजजन व्हावं हा समाज प्रुथ्वि तलावर टिकावा , आम्ही सेक्स केला नाही तर पुढची पिढी तयार होणार नाही. म्हणून ही प्रव्रुत्ति दिली आहे. याच कारणासाठी जर या प्रव्रुत्या वापरल्या गेल्या तर आमचं जीवन यशस्वी होणार अन्यथा यात आम्ही स्वेच्छा मिसळली तर आम्ही पुन्हां उध्वस्त होणार. आमच्या स्वेच्छेमागे आमचा हेतू कितीही चांगला असला तरी आमचा संघर्ष कोणाबरोबर तरी होणार आहे. ????प्रत्येकजण स्वतःच्या इच्छांवर जीवन जगण्याचा प्रयत्न करतं असतात. माझ्या मुलाला परीक्षेत पहिला आणण्यासाठी त्याला चांगली नोकरी लावण्यासाठी मी अनैतिक गोष्टींचा वापर करू शकतो. (मूळ हेतू चांगला पण स्वेच्छा मिक्स केल्याने अनैतिक गोष्टी आल्या. ) मी मुळातच क्याफेट एरिया स्टाईलने हा कार्यक्रम घेत असल्यामुळे मला वाटतं असतं परमेश्वराने दारू संदर्भात लक्ष द्यावे बाकी माझ्या कुठल्याही गोष्टीत नाक खुपसु नये. स्पेशलि माझ्या आर्थिक बाबतीत आणि लैंगिक बाबतीत अजिबात लुडबुड करू नये. माझ्या अवघड प्रसंगात केवळ मदत करावी. आता मद्यपीनच्या बाबतीत काय होते त्याला वाटतं असते बहुशः लोकांनी त्याच्या म्हणण्यानुसार वागावे पण प्रत्यक्षात मद्यपीचे उठावदार नसल्यामुळे तसे होताना दिसत नाही मग माझ्या सारख्या मद्यपीला वाटतं राहते लोकं आपल्याशी चांगली वागत नाहीत. माझी प्रतिष्ठेची भूक असल्यामुळे मी लोकांवर दबावतंत्र वापरतो. मी दिलदार होतो कारण लोकांनी माझं कौतुक करावं. बारच्या वेटरला मी 50 रुपये टिप देतो. त्याच्या मुलाच्या शाळेची फी मी भरतो. पण घरात भाजी आणायला पैसे देत नाहि. ????आमच्या आतला नट हा कमालिचा आत्मकेंद्रित असतो. त्याला सतत वाटतं असतं या जगात जे जे चांगले आहे. जे जे फायद्याचे आहे ते केवळ मलाच मिळाले पाहिजे. मग दुसरी लोकं मेली तरी चालतील ते गेले तेल लावत. माझ्या समस्येचे मूळ कशात आहे तर स्वार्थ आणि स्वयंमकेंद्रितता हे माझ्या समस्येचे मूळ आहे. स्वार्थीपणा म्हणजे जे काही आहे ते सर्व माझ्या करिता आहे. आपमतलबीपणा म्हणजे हे जग देखील माझ्या करिता चालले आहे. बिलच्या नजरेतून मध्ये प्रस्थावनेत बिल लिहतात बिगबुक जर तुम्ही वाचलेत तर ए ए. चे इतर साहित्य तुम्हांला चांगल्या रीतीने समजेल. ????केदार भाऊ तुम्ही पाठवत असलेले कोणतीही ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची हमी देतो आणि तुमचे आभार मानून इथेच थांबतो. धन्यवाद. ??????

You may also like

163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video
163ee5aa2cd97c1676565154
video