Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

IBM-022 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२२

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

IBM सुधारित बिगीनर्स मीटिंग

Now playing : IBM-022 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२२
IBM-022 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२२

IBM-022 सुधारित बिगीनर्स मीटिंग भाग क्र - ०२२

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

क्लिक करून फॉलो कराहा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी हा व्हिडीओ पाहू नये ही नम्र विनंती आहे. कृपया अनामीकता (Anonymity) पाळा ही अत्यंत नम्र विनंती आहे. ?

दारुड्यांनी चॅनेल Follow/सबस्क्राईब केले आणि नोटिफिकेशन ऑन केले तर आपल्याला पुढील व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहतील. ?

प्रत्येक वर्कशॉपचे ऑडिओ सिरियली एकामागे एक वारंवार ऐका ?

ऑडिओ आवडल्यास आपली प्रतिक्रिया कॉमेंटमध्येच लिहा. ?✍✅??

??? ? Back To ?? Basics Workshop ? Or ? ?? Improved Beginners Meeting ?

Part - 22 ( IBM-022 ) ?????

? बॅक टू ए ए बेसिक्स वर्कशॉप ? किंवा ? ए ए इंपृव्हड ( सुधारित ) बिगीनर्स मीटिंग ?

भाग - IBM-022 - बावीस ( बावीसावा ) वेळ - 60.49 मिनिटे प्र क्र 112 ते प्र क्र 117 नववी पायरी पूर्ण आणि नवव्या पायरीची आश्वासने ????????

ऑडिओ ऐकायची अजिबात घाई करू नका.

मधून अधून मागील ऑडिओ चा खजाना बाहेर काढून ते भाग रिपीट ऐकत जावे ?????

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. " त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे. ?????

Please Login to comment on this video

  • Subhashmm76@gmail.com

    Subhashmm76@gmail.com . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि बिगबूकप्रेमी मित्रांनो ..??? मी एक मद्यपी सुभाष एम .आकृती समूह , भद्रावती . IBM भाग 21 ( नववी पायरी) मला समजलेले काही मुद्दे . ▪️ माझ्या मनशांतीसाठी दुसयाचे नुकसान झाले तर चालेल का? घिसाडघाई करू नये दुसऱ्याचा बळी देता कामा नये दुसऱ्याचे नुकसान करून मला नुकसान भरपाई करायची नाही असे मी केले तर मुर्खपणाचे लक्षण होईल. माझे मद्यपान थांबविण्यासाठी मी दुसऱ्याचे बळी देऊ शकत नाही. मला माझे जीवन वाचविण्यासाठी दुसऱ्याचा संसार उध्वस्त करायचा नाही. ▪️अप्रत्यक्ष नुकसान भरपाईसाठी मार्गदर्शकाची गरज घ्यावी . दुस-या स्त्रीची सेवा करून अशी भरपाई करू शकतो. ▪️ नवव्या पायरीसाठी काही मार्गदर्शक तत्वे : परमेश्वराची प्रार्थना करायची आहे वाटेन त्या थराला जाण्यासाठी तयारी केली पाहिजे प्रसंगी तुरुंगातही जावे लागेल. प्रतिष्ठा , समाजातील प्रश्न गमवावी लागेल. नौकरी जाऊ शकते. त्यासाठी आपली तयारी पाहिजे. कोणत्याही दृष्टीने माघार घेता कामा नये. वाटेल त्या थराला जाण्यासाठी मी तिसऱ्या पायरीत निर्णय घेतला होता. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे मी काम करणार आहे. ▪️ मला ज्या व्यक्तींची नुकसान भरपाई करायची आहे त्या व्यक्तीची परवानगी घेतली पाहिजे. तु माझी नुकसान भरपाई स्विकारलास तयार आहेस काय ? परमेश्वराच्या सहाय्यासाठी प्रार्थना पण करण्यात आलेली , कठोर उपाय योजना केली तर काही हरकत नाही . ▪️ पाल एफ . - एका दुकानात दरोडा टाकलेला असतांना काही लाख डालर चोरलेले असतात. नवव्या पायरीमध्ये यादीत नाव आलेले असते. त्याचा मार्गदर्शक त्याला सांगतो की , तुला आता ही नुकसान भरपाई करायला पाहिजे. तो दरोडा एकटयाने घातलेला नसतो . त्याचा सहकारी असतो दोघांनी मिळून तो दरोडा घातलेला असतो. ते दरोडयाचे पैसे दोघांनी वाटून घेतलेले असतात . तू जेवढे पैसे चोरले होते ते सर्व पैसे त्याला नुकसान भरपाई म्हणून परतफेड करायचे. पाल एफ सर्व म्हणजे पाच लाख रुपये घेऊन गेलेला आहे. इतर लोक जिथं गुंतलेले आहे त्याचे नुकसान करण्याचे तुझा कोणताही अधिकार नाही. तु दुसऱ्याचा बळी देऊ शकत नाही दुसऱयाचं नुकसान करू शकत नाही. पूर्ण रक्कम होऊन जातो. सहकार्याचे तो नाव घेत नाही तर स्वतःची कबुली देतो. तो स्टोअरचा मालक पाल एफ ला प्रश्न करतो तो म्हणतो, तुला याची कल्पना आहे का की मी तुला आता पोलिस बोलावून अटक करू शकतो ? मला या सर्व गोष्टींची कल्पना आहे तरी सुद्धा मला तुमची नुकसान भरपाई करायची आहे. मला क्षमा करा मी तुमचं नुकसान केले होते. तो तयार असेल तरच नुकसान भरपाई केली पाहिजे. ▪️ मार्गदर्शक तत्वे : कदाचित अशी काही प्रकरणे असतात की त्यात कमालीचा मोकडेपणा दाखविणे आवश्यक असते . तिसऱ्या मानसाला इथे भाग घेता येणार नाही असा नाजूक विषय आहे. ▪️ घरच्या व अतिजवळच्या लोकांच्या बाबतीत काय ? मी ज्यांना दारुमुळे त्रास दिला माझे आई - वडील, पत्नी , मुले यांच्या बाबत बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला बरीच वर्ष त्याची नुकसान भरपाई करायची आहे . मी इतरांच्या जीवनात वादळ निर्माण केले असते. त्याचे जीवन उध्वस्त केले असते प्रेमाचा चक्काचूर होतो मधूर संबंध खराब होतात , घराची शांतता नष्ट होते. ▪️ बिल w . सांगतो फक्त दारू थांबूल चालणार नाही फक्त दारू थांबली बस झालं असा विचार करणारा विचारहिन मूर्ख , वेडा किंवा अविवेकी ठरतो. फक्त दारू थांबून आपोआप बदल होणार नाही. बिल सांगतो ते सर्व करावे लागेल. तरच माझ्या जीवनात बदल होणार आहे. तरच माझ्या आश्वासनाची पूर्तता होणार आहे. कृती मधून मला नुकसान भरपाई करावी लागेल. आयुष्यभर मला नुकसान भरपाई करायची आहे. माझं वागणं सुधारणे , माझ्या वागणूकीत बदल करणे ही माझी नुकसान भरपाई आहे. अजून कोणाला इजा न करणे. ▪️ यापुढे मी काय करायला हवे : - मी पुढाकार घेऊन त्याकडे गेलो पाहिजे. पुनर्रचनेचा फार मोठा कालखंड माझ्या पुढे उभा आहे. फक्त तोंडी माफी मागून चालणार नाही त्यांच्या चुका न दाखवता आपल्याला आपल्या बाजूचा रस्ता साफ करायचा आहे. त्यांच्यावर टिका करायची नाही त्यांचे दोष सांगायचे नाही. परमेश्वराला विनंती केली पाहिजे की सहशिलतेचा मार्ग घरच्यांच्या बाबतीत दाखवावा. ▪️ ज्यांचे नुकसान भरपाई मी करणार नाही त्यांचे काय ? टी . टी . बाक्स मध्ये जास्तीचे पैसे टाकावे. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे नुकसान भरपाई करता येते . टिटी बाक्स मध्ये पैसे टाकल्यावर सांगू नये. ▪️ नवव्या पायरीची आश्वासने : आपण विकासाच्या या अवस्थे बद्दल परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर विकासाच्या अर्धा पल्ला गाठण्यावर सुद्धा या विकासाची गती पाहून आपण आश्चर्य चकीत होऊ. नवे सुख आपल्याला मिळणार नव्या सुखाची जाणीव आपल्याला होणार आहे भूतकाळा बददल आम्ही खेद करणार नाही किंवा त्यावर पडदा टाकणार नाही. भूतकाळा बदल काही लपवून ठेवणार नाही. भूतकाळाची आम्हाला लाज वाटणार नाही. प्रसन्नता या शब्दाची आम्हाला किंमत कळेल आपल्याला शांतताही लाभेल. आपण कितीही खालच्या पातळीवर गेलो तरी आपला अनुभव दुसऱ्याला कसा उपयोगी येईल याचे ज्ञान होईल. निरुपयोगीपणा व स्वतः बद्दलची किव या गोष्टी नाहीशा होतील. आपल्या बांधवांबद्दल आस्था निर्माण होईल. स्वार्थ निघुन जाईल , दृष्टीकोण बदलून जाईल. लोकांची व आर्थिक असुरक्षिततेची भिती नष्ट होईल. माझ्याकडे कमी पैसे आहे म्हणून जगण्याची भिती वाटणार नाही. पूर्वी ज्या परिस्थितीत गोंधळून जात होतो ते होणार नाही. आता मला निर्णय घेता येईल. आपण जे स्वतःसाठी करत नव्हतो ते परमेश्वर आपल्यासाठी करत आहे. ▪️ भूतकाळातील साफसफाई : सर्वस्वी , श्रद्धेने , प्रामाणिकपणे हा कार्यक्रम घेतला तर नक्की माझा फायदा होणार आहे. ते मिळत नसेल तर मी कुठे तरी चुकत आहो हे बघावे लागेल. ? *केदारभाऊ* *आपल्या अथक परिश्रमातून तयार झालेले बिगबूक साहित्य , प्रश्न स्वरूपातील हायलाईट केलेले बिगबूक पुस्तक , ऑडिओ क्लीप परस्पर कोणालाही कसेही देणार नाही . * ?आपले खूप खूप आभार ....? आभार .... ? आभार .....?

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      सुभाष भाऊ ? अतिसुंदर प्रतिक्रिया ?✍️✅?? अशीच प्रत्येक भागाची प्रतिक्रिया त्या त्या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये पोस्ट करत जा ही विनंती आहे. ??✍️??

You may also like

1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video
1620e9f2ddbf261645125421
video