Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-023 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२३

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU मला समजलेले बिगबुक

Now playing : BBIU-023 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२३
BBIU-023 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२३

BBIU-023 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२३

Published: 2 years ago

Category:

  • Motivational

About:

फॉलो करा BBIU-023 मला समजलेले बिगबुक भाग क्र - ०२३

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 2 years ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव(पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -23 ऐकून मला जे समजले ते खालीलप्रमाणे..... बिलची कहाणी उर्वरित भाग.... ?बिल आपल्याला त्यांनी तळ गाठल्यावर (रॉक बॉटम) त्यांची हतबलता, शरणागती आणि त्यातून पहिली पायरी घेण्यासाठी झालेली मानसिकता काय होती ह्याबद्धल सांगतात. ते स्वतः दुःखात, निराशेत आणि आत्माकरूणेत गेले होते, कारण आशेचा कोणताच भाग त्यांना दिसत न्हवता.त्यांना त्यांचा प्रतिस्पर्धी (मद्य)भेटला होता, आणि त्याने त्यांच्यावर मात केली होती. आता तोच त्यांचा कर्ता,करविता झाला होता आणि ते त्याचे गुलाम झाले होते. ?बिल आपल्याला त्यांच्या 3 ऱ्या आणि शेवटच्या स्लिप बद्धल सांगतात.ते म्हणतात की हॉस्पिटल मधून बाहेर पडताना ते थर थर कापत होते, ते संपूर्ण पिचून गेले होते, आणि भीतीने त्यांना थोडे सावध केले होते. परंतु मद्य समोर आल्यावर ते सर्व विसरून ते मद्याच्या अधीन झाले होते. ?1934 च्या नोव्हेंबर महिन्यातील आर्मी सिझ डे च्या दिवशी ते बेहोष होते, आणि त्यामुळे सर्वांची खात्री झाली होती की आता बिलना एका बंदिस्त खोलीत तरी ठेवावे लागेल नाहीतर बेहोषित ते कुठेतरी कोलमडून पडून त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत होईल.ते म्हणतात की पहाटेपूर्वीचा काळोख जसा गर्द दाट असतो तशीच चांगले दिवस येण्याआधीची ही अखेरची दूरचाराची सुरवात आहे. ते म्हणतात की आता लवकरच मी जीवनाच्या अवकाशापलीकडे उडी मारणार होतो (उच्यशक्तीच्या विश्वात जाणार होतो), आणि त्यामुळे त्यांना आता सुख, शांती आणि उपयुक्त जीवनपद्धतीचा आस्वाद घ्यायला (अनुभवायला)मिळणार होता. असे हे जीवन कल्पनातीत आश्चर्यकारक ठरणार आहे. ?ते त्यांच्या स्वयंपाकघरात मद्य घेत बसले होते.काहींशा समाधानाने ते म्हणतात की आजची रात्र आणि उद्याची पहाट होईपर्यंत पुरेल एवढे मद्य त्यांच्याकडे होते. पत्नी कामावर गेलेली असल्याने ते विचार करतात की जिनची बाटली मी उशाशीच ठेवतो म्हणजे पहाटे जाग आल्यावर, थर थर कापत असताना आपल्याला ती शोधायला लागणार नाही.त्याचवेळी टेलिफोनची रिंग वाजते आणि फोन करणारी व्यक्ती त्यांचा शाळकरी मित्र ABT असतो, आणि तो आनंदाने त्यांना विचारतो की मी आलो तर चालेल ना?बिल त्याला आपण रात्रीचे जेवण एकत्र घेऊ या असे सांगतात कारण त्यामागे बिल ह्यांचा हेतू बायकोचा विरोध न होता त्यांना उघडपणे एकत्र मद्य प्यायला मिळेल हा होता. ?तो जेंव्हा बिलच्या घरी येतो तेंव्हा तो प्यायलेला न्हवता. अनेक वर्षानंतर तो न्यूयॉर्कला आलेला होता. त्याला पाहून बिलना आश्चर्यच वाटले, कारण अतिमद्यपान केल्याने त्याला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केल्याचे त्यांनी ऐकले होते.आणि आता त्यांच्यासमोर तकतकीत कांतीचा, चकाकते डोळे असलेला असा ABT उभा असतो.त्याच्यातील हा फरक कसा झाला हेच त्यांना समजेना. बिलने त्याला मद्याचा प्याला दिला जो की त्याने नाकारला. आणि मग बिलची जिज्ञासा हे जाणून घेण्यासाठी वाढली की हे नक्की आहे तरी काय? आणि म्हणून त्यांनी त्याला हे आहे तरी काय असा प्रश्न केला. त्याने बिलकडे निरखून पाहत सांगितले की मी धर्माची म्हणजे त्याने ओक्सफोर्ड ग्रुपची दिक्षा घेतली आहे. ?बिलना हे समजल्यावर ते म्हणतात की म्हणजे याच्यावर धर्माचा पगडा बसला आहे. त्याचे डोळेही आकाशाचा (ईश्वराचा)वेध घेताना दिसत आहेत.बिलना धर्माची तत्वे मान्य न्हवती पण त्याच्यात झालेला बदल मान्य होत होता. ?ABT हा त्यांना आपल्यात बदल कसा झाला हे सांगायलाच आला होता. त्याच्यात हा बदल एका साध्यासुध्या धार्मिक कल्पना आणि त्यावरील कृतीच्या कार्यक्रमामुळे 2 महिन्यापुर्वीच झाला होता.तो म्हणतो की मी जो दिसत आहे तो त्या कार्यक्रमाचाच परिणाम आहे, अर्थात ते समजून घेण्याची त्याची एकमेव इच्छा असायला हवी. ?बिलना त्याला पाहून आश्चर्याचा धक्का बसला, पण आस्थाही वाटली कारण ते स्वतः निराषेच्या अधीन झाले होते. केदार भाऊंचे मनःपूर्वक आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ?????

  • Kedar Seeker सनातन संस्कार

    Kedar Seeker सनातन संस्कार . 2 years ago

    मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार* आत्मनिर्भर भारत की जय !!! ???????????

You may also like

16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video
16217e0ca441e61645732042
video