Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-048 मसबिबु-०४८ मला समजलेले बिगबुक भाग ०४८

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU मला समजलेले बिगबुक

Now playing : BBIU-048 मसबिबु-०४८ मला समजलेले बिगबुक भाग ०४८
BBIU-048 मसबिबु-०४८ मला समजलेले बिगबुक भाग ०४८

BBIU-048 मसबिबु-०४८ मला समजलेले बिगबुक भाग ०४८

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. इतरांनी पाहू नये. ? BBIU-048 मसबाबा-०४८ मला समजलेले बिगबुक भाग ०४८ ??? BBIU-048 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - अठ्ठेचाळीस वेळ -  52.08 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पुस्तकातील  "हे कसे घडते" वाचन क्रमशः कॅफेटेरिया स्टाईलचा उपयोग नाही एकच शक्ती One मधील O कॅपिटल इथे ही हातराखणी नको बारा पायऱ्या रूपरेषा घाबरू नका, तुम्हालाही जमेल आध्यात्मिक प्रगती साठी प्रयत्न 3 निश्चित कल्पना इच्छा आणि जीवन 12 आणि 12 नैसर्गिक प्रवृत्ती सामाजिक प्रवृत्ती मैत्री प्रतिष्ठा ???

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो मी शंकर मेसेज ऑफ होप समूह गोरेगाव(पूर्व),मुंबई. म स बी बु भाग -048, प्रकरण -5, ची प्रतिक्रिया. ?काही पायऱ्यांशी आम्ही बिचकलो, आंम्हाला वाटले अधिक सोपा, कमी त्रासाचा मार्ग आपण शोधून काढू कारण आम्हाला प्रत्येक पायरीमध्ये वाट्टेल त्या थराला जाणे अशक्य वाटत होते, म्हणून जे आम्हांला जमेल, आवडेल तेव्हडेच आम्ही घेतो बाकीचे आम्ही सोडून देतो(कॅफेटेरिया पद्धतीने)कारण तशीच आमची मानसिकता असते. पण आम्हांला ते जमले नाही असे पुस्तकाचे लेखक सांगतात.?अशा प्रकारे कार्यक्रम घेतल्यास मद्यमुक्तता मिळत नाही असे मुळीच नाही, पण प्रत्येक पायरीची जी आश्वासने आहेत ती मिळणे अशक्य आहे.?पुस्तकात सांगितल्याप्रमाणे कुठचीही हातराखणी न ठेवता, काटछाट न करता कार्यक्रम घ्यावा अशी पुस्तकातील लेखक आपल्याला विनंती करतात.?ते म्हणतात की तुम्ही सुरवातीपासूनच निर्भय आणि परिपूर्ण रहा. तुम्ही घाबरू नका, कार्यक्रम अवघड असला तरी तो अशक्य काही नाही. आम्हांला तो जमलेला आहे, तसा तुम्हालाही तो जमेल.?जे लोक आपले जुने दृष्टिकोन, कल्पना (स्वतःबद्धलच्या, परमेश्वराबद्धलच्या, जगाकडे बघण्याच्या)जे चुकीचे होते ते बदलून नव्या कल्पनांचा स्वीकार करत नाहीत त्यांच्यात सुधारणा शून्य असेल असे बिल डब्लू आपल्याला स्पष्ट सांगतात. ?मद्याची तीन प्रमुख विशेषणे प्रबळ, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारी ही आपण मद्यपाश आजारात बघितलेलीच आहेत, ?आणि बाह्य मदतीशिवाय त्याच्या पाशातून मुक्त होणे अशक्य आहे, आणि ती मदत एकच आहे ती म्हणजे परमेश्वर आणि त्याचा तुम्हाला साक्षात्कार होवो अशी प्रार्थना पुस्तकांचे लेखक आपल्यासाठी करतात.?आता आम्हाला निवड करावयाची आहे की पित पित मरायचे अथवा सुधारणेचा कार्यक्रम घेणे.म्हणजेच परमेश्वर आहे तरी अथवा नाहीच आहे आणि तो सर्वस्व आहे.?आता ते आपल्याला कोणत्याही प्रकारची हातराखणी न ठेवता आमचे संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी आपल्या उमगलेल्या परमेश्वराला प्रार्थना करण्यास सांगून 3 री पायरी घेण्यासाठी सांगतात.?त्यानंतर सुधारणेसाठी असलेल्या 12 पायऱ्यांचा कार्यक्रम सांगितलेला आहे.त्याचे संपूर्ण वर्णन पुढील भागात आपण बघणारंच आहोत. ?आमच्यापैकी अनेक लोकांनी हे उदगार काढले --- बाप रे केवढी मोठी ही अपेक्षा, मला काही हे जमणार नाही, पण नाउमेद होऊ नका ?आमच्यापैकी कोणालाच जीवनाच्या सर्व व्यवहारात तो 100% अमलात आणता आलेला नाही, कारण आपण काही साधूपुरुष नाही.?आपण आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो, आध्यात्मिक पूर्णतेचा नाही. महत्वाचे हे आहे की आध्यात्मिक पद्धतीने विकसित होण्याची आमची मानसिक तयारी आहे, कारण आम्ही जी तत्वे दिली आहेत ती प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शक आहेत ?आता आपण 3 ऱ्या पायरीवर उभे आहोत,आता आपण आपल्याला समजलेल्या परमेश्वरावर आपली इच्छा आणि जीवन सोपवण्यास ठरविले आहे.?आमचे जे विचार आहेत ते म्हणजे आमची इच्छा आणि त्यावर केलेली कृती म्हणजे जीवन आहे. आणि आता तेच आम्ही परमेश्वरावर सोपवण्यास तयार झालेलो आहोत. ?ए ए चा कार्यक्रम तेथे उपचार करतो जेथे आमचे विचार उत्पन्न होतात. आणि ते कसे करायचे यासाठी येथून स्वेच्छा हा शब्द बिगबुक मध्ये वारंवार येणार आहे. आणि ही स्वेच्छा म्हणजे काय यासाठी आपण 12X12 आणि ज्यो आणि चार्ली ह्या उपक्रमांचा उपयोग करणार आहोत. ?आपण स्वेच्छेचा कसा गैरवापर केलेला आहे ते समजून घेणार आहोत. ?परमेश्वराने प्रत्येक प्राणीमात्राला 3 नैसर्गिक प्रवृत्या देऊनच जन्माला घातलेले असते आणि त्या आपल्याला जगण्यासाठी अत्यावश्यकच आहेत.?1. सामाजिक प्रवृत्ती -- बिल म्हणतात की प्रत्येकाला असे वाटते की आपण लोकांना आवडावे, स्वीकारावे, मानसन्मान द्यावा, कौतुक करावे असेच वाटत असते.?तसेंच प्रत्येकाला वाटते की समूहात रहावे, समाजात एकत्र रहावे. तसें झाले नसते तर जगात अराजकता माजली असती, आणि आपण माणूस म्हणून जगूच शकलो नसतो.?तसेंच सामाजिक प्रवृत्यांमध्ये वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या आहेत त्यातील मैत्रीची संज्ञा म्हणजे सर्व लोकांना मी आवडावे, स्वीकारावे., एकमेकांना समजून घ्यावे, पण आपल्यातले बरेच जण मानसिकरित्या आजारी असल्याने त्यापासून बाहेर फेकले गेलेले असतात.?आमची फक्त एकाच बाजूने अपेक्षा असते की मला सर्वांनी स्वीकारावे, मला समजून घ्यावे पण मी मात्र दुसऱ्यांना स्वीकारण्यास, समजून घेण्यासाठी तयार नसतो, आणि म्हणूनच आम्ही बाहेर फेकले गेलेलो असतो.2. दुसरी संज्ञा म्हणजे प्रतिष्ठा ---आणि ती म्हणजे लोकांनी मला ओळखावे, माझे म्हणणे ऐकावे,मला नेता मानावे, मी म्हणेन तेच खरे असून लोकांनी तसें वागावे. आम्हांला कायमच नेता व्हायला आवडते, दुसऱ्याच्या सूचना ऐकायला नाही.केदार भाऊंचे आभार. हे साहित्य कोणालाच देणार नाही याची ग्वाही देऊन भाग -049 ची अपेक्षा करतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आभार आभार आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणांस सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह , मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 48ची प्रतिक्रिया देत आहे. .. .. .. . यातील काही पायऱ्यांपाशी आम्ही बीचकलो. आम्हांला वाटले की यापेक्षा कमी त्रासाचा ,सुलभ ,मार्ग आम्ही शोधून काढू. ( आम्हांला कॅफेटेरिया स्टाईलने कार्यक्रम घेण्याची सवय असल्यामुळे आम्हांला कमी त्रासाचा मार्ग आम्हांला प्रयत्न करून देखील सापडला नाही. प्रत्येक पायरीसाठी माझी वाटेल त्या थराला जाण्याची तयारी हवी. जुन्या कल्पना आम्हांला सोडाव्या लागतील.इथे आल्यावर आमच्यासाठी दोनच पर्याय शिल्लक होते तो म्हणजे एकतर पीत पीत मरणे किंवा परमेश्वराचा आश्रय घेणे. ????यानंतर 12 सूचना दिल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर अनेक लोकांनी उद्गार काढले केवढी ही अपेक्षा. मला त्या सर्वच पार पाडता येणार नाही. खरेतर या आध्यात्मिक तत्वांचे पालन परिपूर्णतेने करण्यात कोणालाच यश आलेले नाही. कारण आम्ही काही साधू पुरुष नाही. त्यामुळे कार्यक्रम आध्यात्मिक प्रगतीचा दावा करतो आध्यात्मिक पूर्णतेचा नव्हे. ए ए चा कार्यक्रम तिथे उपचार करतो जिथे माझे विचार उत्पन्न होतात. ????इथून पुढे स्वेच्छा हा शब्द येणार आहे हा शब्द नीट समजून घेण्यासाठी मला बारा बाय बारा मधील काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. त्याच बरोबर नैसर्गिक प्रवृत्ती देखील समजून घ्यावी लागेल. आणि याकरिता ज्यो आणि चर्लिचि मदत देखील घ्यावी लागेल. तीन सहज प्रव्रुत्ति घेऊनच जन्माला येतो. त्यातील पहिली प्रव्रुत्ति आहे सामाजिक प्रव्रुत्ति - बिल म्हणतात प्रत्येक मनुष्य आपण सर्वांना आवडावे ,लोकांनी आपल्याला स्वीकारावे ,लोकांनी आपल्याला मानसन्मान द्यावा ही ईच्छा घेऊनच प्रत्येक माणूस जन्माला येतो. प्रत्येक माणसाला आपलं कौतुक केलेलं आवडत असत. प्रत्येक नॉर्मल माणसाला समाजात लोकांत आपल्या माणसात राहायला आवडतं. जर आपण या ईच्छा घेऊन जन्माला आलो नसतो तर जगात अराजकता माजली असती. ही प्रव्रुत्ति देवाने आपल्याला दिली नसती तर माणसाने माणसाला मारले असते.या सामाजिक प्रव्रुत्ति मध्ये पहिली संद्न्या आहे मैत्री आणि दुसरी प्रतिष्ठा मला समाजाने ओळखावे ,मला त्यांचा नेता मानावे मी सांगितलेलं लोकांनी ऐकलं पाहिजे. मग ते परिवारातील असतील कुटुंबातील असतील किंवा समाजातील असतील. माझ्या सारख्या दारुड्याला देखील वाटतं असतं माझं देखील कौतुक झालं पाहिजे पण दारुड्या मनाला वाटेल तसे वागत असतो , त्याने ताळतंत्र सोडलेला असतो. तरी कौतुकाची हाव सुटलेली नसते. (एकतर मी लीडर तरी होतो किंवा फॉलोवर तरी होतो ) ????केदार भाऊ आपले शतशः आभार आपण आमच्याकरिता मेहनत घेत आहात. आपण पाठविलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची खात्री देतो आणि इथे थांबतो. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      राजेश भाऊ ? अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ???????? आभार आभार आभार !!! ??✍️??

You may also like

163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video
163b96499b8c171673094297
video