Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-045 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचेचाळीस

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU मला समजलेले बिगबुक

Now playing : BBIU-045 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचेचाळीस
BBIU-045 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचेचाळीस

BBIU-045 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचेचाळीस

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त मद्यपी व्यक्तींसाठी आहे. ? माझ्या दुसऱ्या चॅनेल "Kedar Seeker सनातन संस्कार' चे पण नोटिफिकेशन ON करावे ही विनंती आहे. ? ??? BBIU-045 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पंचेचाळीस वेळ -  48.20 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर आम्ही आज्ञेयवादी (दुसरी पायरी) वाचन क्रमशः पान क्र 47 ते 50 आम्ही आज्ञेयवादी दुसऱ्या पायरीचा प्रवास क्रमशः आमच्याकडे आधीपासूनच श्रद्धा होतीच श्रद्धा आमच्या अंतरंगातच आश्वासने परमेश्वर आमच्यातच आहे मित्राचे उदाहरण आमच्या जीवनात सावकाशीने दुसरी पायरी आणि आम्ही आज्ञेयवादी समाप्त ??? आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये पोस्ट करावी. कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव (पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -045 ची प्रतिक्रिया. ?आम्ही जरी अज्ञयेवादी अथवा नास्तिक असलो तरी आमचा तर्कावर, पुराव्यांवर सायन्सवर विश्वास होता, म्हणजेच आमच्या मनात त्याबाबत कुठेतरी श्रद्धा ही होती.?आमची हीच श्रद्धा आहे हे आम्हांला माहित न्हवते. आमची लोक, भावना, वस्तुस्थिती, पैसा,आणि स्वतः ही सर्व पुजास्थाने होती, कारण आमची त्यांच्यावर श्रद्धा होती.?तशीच आमची सूर्य, चंद्र, सागर, फळे, फुले, इत्यादी नैसर्गिक गोष्टींवर श्रद्धा होतीच.?या सर्व तर्काच्या बाहेरच्या कल्पना होत्या तरीसुद्धा आमची त्यांच्यावर श्रद्धा होती ?या भावनानीच आमच्या जीवनाचे स्वरूप ठरविले आहे, त्यामुळेच आमच्यात श्रद्धा, प्रेम, पूजा याची पात्रताव नाही असे म्हणणे अशक्य आहे ?आम्हाला हीच श्रद्धा वापरायची आहे. ?श्रद्धेशिवाय आपण जीवनाची कल्पना करू शकत नाही, त्याप्रमाणेच परमेश्वराबाबत आम्ही अज्ञानी असलो म्हणजे तो अस्तित्वातच नाही असे होत नाही.?सरळ रेषा हे दोन बिंदूमधील कमीत कमी अंतर होय हे जसे आपण सिद्ध करू शकतो तशी श्रद्धा आम्ही सिद्ध करू शकत नाही, म्हणजे श्रद्धा नाही असा अर्थ होत नाही.?आम्ही फक्त तर्कावर अवलंबून राहू शकत नाही, आणि शास्त्रज्ञाचेही हेच मत आहे.?आम्ही फक्त तर्कावर अवलंबून राहिलो असतो तर माणूस उड्डाणं करू शकणार नाही असे म्हणणाऱ्या माणसाप्रमाणे आमची गत होणार आहे.?आमच्याकडे श्रद्धा ही होती पण आम्ही स्वतःच,स्वतःला फसवत होतो.?आम्हांला ए ए त काही लोक असे दिसत होते की ज्यांनी श्रद्धा ठेवून, आध्यात्मिक स्वातंत्र्याने त्यांच्या समस्यांच्या कक्षेपलीकडे ते सुखाने जीवन जगत होते.?त्यांच्या समस्या परमेश्वराच्या साहाय्याने सुटल्या होत्या या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवला न्हवता.?आम्हाला हे सर्व दिसत होते, अंतर्मनातून पटतही होते, आमच्याकडे श्रद्धा होती तरीसुद्धा आमचे तर्कच खरे आहेत असे स्वतःला सांगून फसवत होतो.?प्रत्येकाच्या मनात परमेश्वराबाबत मूलभूत कल्पना असते,आपली ती झाकली होती.?ही परमेश्वराची कल्पना आम्ही दुसऱ्या गोष्टीची पूजा केल्याने जसे की दारूची,संकटाची ऐश्वर्याची केल्याने झाकली गेली होती, पण ती अस्तित्वात होतीच.?कोणत्यातरी स्वरूपात परमेश्वरावरील श्रद्धा हा आमच्या स्वभावाचाच एक भाग आहे.?परमेश्वर आमच्या मनात पहिल्यापासून होता,आणि तो आमच्या अंतरंगातच आहे, त्यामुळे त्याला बाहेर कुठे शोधण्याची गरज नाही.?जेंव्हा आपण श्रद्धा ठेवून निर्धाराने आपल्या ईच्छा जागृत करतो तेंव्हा आपल्या अंतरंगातील परमेश्वराचा विजय होतो.?त्यामुळे आपण परमेश्वराबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला अपयश येणार नाही. येथेच आपली दुसरी पायरी पूर्ण होऊन आपण 3 री पायरी घ्यायला सुरुवात करतो. आता आपल्याला श्रद्धेची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. ?बिल आता आपल्याला एका धर्मगुरूच्या मुलाची गोष्ट सांगतात.?हा मुलगा काही कारणाने बंडखोर झाला होता, आणि त्याचे परमेश्वराबाबत मत परिवर्तन कसे झाले ही कहाणी आहे.?त्याच्या जीवनात परमेश्वराने झटकन प्रवेश केला, तसा आपल्या जीवनातही घडेल असे नाही.?तो हळूहळू आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे.?त्याच्या साहाय्याने आमची समस्या सुटणार असून आम्हांला आमचा हरवलेला विवेक तो परत मिळवून देणार आहे. केदार भाऊंनी हे सर्व खूप छान पद्धतीने समजावून सांगितले. आपले साहित्य कोणालाच देणार नाही ही खात्री देतो आणि पुढील भाग मिळावा ही अपेक्षा करतो. आभार, आभार, आभार. ??????

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणांस सादर प्रणाम , मी राजेश पी. नई रोशनी समूह. जोगेश्वरी. मुंबई. मला समजलेले बिगबुक भाग 45 ची प्रतिक्रिया देतं आहे. .. . तर्कावर का होईना आम्ही श्रध्दा ठेवली नव्हती काय ? माझं लॉजिक चांगलं आहे या गोष्टी वर माझा कुठे तरी विश्वास नव्हता काय ?मी विचार करू शकतो व आता चांगला विचार करू शकतो. या ना त्या कारणाने श्रध्दा आमच्या मुळाशी होती. आम्ही कोणाची तरी पूजा करीत होतो फक्त चुकिच्या गोष्टींची पूजा करतं होतो. श्रध्दा कशावर तर लोकं , भावना , वस्तुस्थिती ,पैसा ,जो गुत्तेवाला आम्हांला दारू उधार देतं होता , कधी कधी दारू प्यायला पैसे नसायचे त्यावेळी काही मित्र पैसे द्यायचे अशा मित्रांवर आमची श्रध्दा होती. माझी दारूवर देखील श्रध्दा होती. सूर्याचे उगवणे , सूर्यास्त या आमच्या तर्का बाहेरच्या गोष्टी होत्या तरी आमची त्यावर श्रध्दा होती. या सगळ्या बाबींनि आमचं जीवन गुंफलेले आहे. ????श्रध्देशिवाय जीवनाची कल्पना करून पहा या जीवनावर अर्थातचं आमचा विश्वास आहे. पण तर्क म्हणजे सर्वस्व नव्हे , जे सिध्द करता येऊ शकतं अशा गोष्टीवर आम्ही अवलंबून रहावु शकतं नाहि. जे डोळ्यांनी दिसतं ते अंतिम सत्य नसतं. मला परमेश्वराला शोधायला बाहेर जाण्याची गरज आहे. प्रत्येक स्त्री ,पुरुषांच्या बालकांच्या मनोमनि परमेश्वराची मूलभूत कल्पना असते. माझ्या मनात ,माझ्या आत परमेश्वराची संकल्पना होती. फक्त ती झाकोळलेली होती. शेवटी आमच्या अंतरंगात परमेश्वर आहे हे महान सत्य आम्हांला आढळून आले. आध्यात्मिक दृष्टीकोनामुळे आम्हांला कशी मदत होईल = प्रत्येकाच्या आत एक आवाज असतो आणि तो आवाज म्हणजे परमेश्वर आहे. दारू पिण्याच्या काळात देखील हा आतला आवाज सांगायचा अरे राजेश नको दारू पिऊ दारू मुळे तुझं वाटोळे झालं आहे. पण माझा मद्यपाश् सांगायचा आता पुरती थोडी प्यायला काहीच हरकत नाही. यातला पहिला आवाज हा देवाचा असायचा. बिल साहेब सांगतात या राजमार्गावर तुम्ही चालत रहा. तुम्हांला अपयश येणार नाही. श्रध्दे विषयी जाणीव झाल्याशिवाय राहणार नाहि. मनाची तयारी बरोबर थोडी क्रुति = त्याची फळे = मग विश्वास येतो. मग अधिक क्रुति = मग भरपूर फळे. मग विश्वासाचे रूपांतर श्रध्देत व्ह्यायला लागतं. ????एका ओरिजनल क्रिश्शन धर्म गुरूचा मुलगा चर्चच्या शाळेत जायचा. जिथं बायबल शिकवलं जातं असे. तिथे धार्मिक शिक्षणाचा अतिरेक होतोय हे बघितल्यावर तो बंडखोर् झाला. त्याला नैराश्य आलं. त्याच्या नजीकच्या कुटुंबीयांवर प्राणघातक आपत्ती आली. तो अधिक कडवट झाला. देवा बद्दल त्याला अधिक तिरस्कार वाटू लागला. त्याची दारू वाढत गेली. हॉस्पिटल मध्ये वेदना सहन करतं असताना त्याला एक सभासद भेटायला आला. पेशंट व्यक्ती म्हणाली जर देव असता त्याने माझ्या साठी काहीच कसे केले नाहि. संतापाने त्याचा गळा भरून आला. तो सभासद निघून गेल्यावर तो विचार करू लागला सारेच धार्मिक लोकं चुकीचे कसे असू शकतात. त्याच वेळी वज्रघात व्हावा तसा अचानक त्याच्या डोक्यात विचार आला परमेश्वर नाही असे म्हणणारा तू कोण ? तो बेड वरून धडपडत उठला. त्यांनी गुडघे टेकले. त्याच्या मनात निष्ठावान भावना चमकून गेल्या. परमेश्वराच्या सानिध्यात मी उभा आहे ही भावना त्याच्या मनात चमकून गेली. वर्षानुवर्ष त्याने उभारलेले त्याच्या आणि परमेश्वराच्या मधले अडथळे होते ते सगळे कोसळून पडले. त्याचा पायाभरणीचा दगड योग्य ठिकाणी बसवला गेला. म्हणजे दुसरी पायरी त्याची एवढी पक्की झाली की नंतर आलेल्या त्याच्या जीवनातल्या संकटामुळे त्याची श्रध्दा ढळली नाहि. मद्यासक्तीचा त्याचा प्रश्न कायमचा सुटला होता. तो मरेपर्यंत दारू प्यायला नाही. आता आम्हांला देखील परमेश्वराने योग्य मार्गावर आणले आहे. दुसरी पायरी प्रत्येक सभासदांच्या आयुष्यात तुकड्या तुकड्याने येणार आहे. बिल यांनी सांगितले होते परमेश्वर जसा माझ्या आयुष्यात झटकन आला. पण तुमच्या जीवनात परमेश्वर सावकाशीने प्रवेश करणार आहे. आम्ही जेव्हां देवाच्या दिशेने दोन पावले टाकली तेव्हा परमेश्वराने आमच्या दिशेने दहा पावले टाकली. (प्रकरण समाप्त ) ????केदार भाऊ खूप खूप आभार. तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोनालाहि देणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो. धन्यवाद. ??????

You may also like

1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video
1638cca59cefd71670171225
video