Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-035 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - 035

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU मला समजलेले बिगबुक

Now playing : BBIU-035 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - 035
BBIU-035 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - 035

BBIU-035 मला समजलेले बिगबुक, भाग क्र - 035

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ?

मित्रांनो कृपया चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक भागाची प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा ? माझ्या दुसऱ्या चॅनेलला सुद्धा फॉलो करा. *Kedar Seeker सनातन संस्कार*

आत्मनिर्भर भारत की जय !!! ??????????? ??? BBIU-035 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - पस्तीसावा वेळ - 49.00 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर पान क्र 28 ते 30 मद्यपीडेविषयी आणखी काही वाचन क्रमशः 25 वर्षांनी पिणाऱ्याचे उदाहरण द्वारा आजाराची सर्व लक्षणे आणि विशेषणे No reservations - पहिली पायरी आयडेंटिफिकेशन रिझर्व्हेशन्स काढून टाकणे भ्रम नष्ट केला पाहिजे पहिली पायरी नेमकी कशी घ्यायची स्पष्ट मार्गदर्शन कायमचा आणि वाढत जाणारा आजार आम्हाला मर्यादित पिणे जमणार नाही तरुण सदस्य ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.

प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.

मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे. ????? कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत. ?????

माझा दुसरा चॅनेल - https://youtube.com/channel/UCT42Jd3nwDWdRWuzJRSPPrQ ?

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मीं शंकर मेसेज ऑफ होप ग्रुप (गोरेगाव), मुंबई. म. स. बी. बु. भाग -035, प्रकरण -3 ?हि एका 30 वयातील मद्यप्याची कहाणी आहे.या कहाणीतून आपल्याला खालील गोष्टी समजून येतात. ?मद्यपाश आजाराबद्धल, त्याचा फसवा भाग, सतत वाढत जाणारा, कधीही बरा न होणारा असा आहे. ?कहाणीतील व्यक्ती हि 30 च्या वयात बरेच मद्यपान करत असे, आणि दुसऱ्या दिवशी त्याला पश्चात्ताप होत असे. हे लपविण्यासाठी परत त्याला मद्यपान करायला लागत असे.?तो महत्वाकांक्षी होता.चांगला व्यापार करायचा, आणि श्रीमंत व्हायचे हि त्याची महत्वाकांक्षा होती.?त्याला हे कळून आले की आपण जर असेच पित राहिलो तर आपल्याला हे साध्य करता येणार नाही.?त्याला हेही पटले होते की एकदा का तो मद्य पिऊ लागला, की त्याला त्यावर नियंत्रण ठेवता येत नसे. ( पहिला घोट शरीरात गेल्यावर ऍलर्जी ट्रिगर होत असे आणि मग त्याला ती थांबवता येत नसे हीच त्याची मद्यापुढील हतबलता).?त्याने मग त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर, मनाचा निर्धार केला की व्यापारात यश मिळवून, भरपूर पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा मिळवून निवृत्त होईपर्यंत कधीही मद्याच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. हेच त्याचे रिझरवेशन होते.?बिल सांगतात की आपण मनात कोणतेही रिझरवेशन ठेवून आपली पहिली 100% घेऊच शकत नाही.?या व्यक्तीने पुढील 25 वर्षे स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर, मनाचा निर्धार करून मद्याच्या थेंबालाही स्पर्श केला नाही, आणि त्याने व्यापारात पैसा ,प्रसिद्धी,प्रतिष्टा मिळवली,आणि तो निवृत्त झाला.?त्यानंतर त्याची जी सुप्त आकांक्षा होती (आजाराचा फसवा भाग) की कधीतरी, केंव्हातरी आपण मर्यादित मद्यपान करू शकू या विचारांना तो बळी पडला.?त्याने मनाच्या निर्धाराने 25 वर्षे मद्यावर नियंत्रण ठेवले होते(मद्य न घेतल्याने ऍलर्जी काबूत ठेवली होती), आणि त्याची जी व्यापारातील आकांक्षा होती, ते तो साध्य करू शकला होता, पण त्याच्या शरीरातील ऍलर्जी अजून तशीच जिवंत होती.हाच आजाराचा फसवा भाग आहे.?तो आजाराच्या या फसव्या भागाला बळी पडला आणि निवृत्तीनंतर जेंव्हा त्याच्या मनात मर्यादित मद्यपान करण्याचा विचार आला, लगेंच त्याच्या हातात मद्याची बाटली आली, आणि 2 महिन्याच्या आताच त्याला हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागल्या.?त्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्याच्या हॉस्पिटल वाऱ्या काही चुकल्या नाहीत.?त्यानंतर त्याने त्याच्या सर्व शक्ती एकवटून मद्यपान कायमचे थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते शक्य झाले नाही कारण मद्यपाश हा वाढत जाणार आजार आहे. (आपण मद्यापासून दूर असलो तरी तो आपल्या मनात आणि शरीरात वाढतच असतो, फक्त आपण एक दिवसाच्या हिशोबाने त्यावर नियंत्रण ठेवत असतो). त्यामुळेच 25 वर्षानंतर त्याला त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.?मद्यावर नियंत्रण ठेवण्याचे त्याचे सर्व प्रयत्न फसले, आणि निवृत्तीनंतर सुदृढ असलेला तो 4 वर्षाच्या आतच मरण पावला. (अकाली मृत्यू -आजाराच्या परिणामाचा भाग).?वरील कहाणीतून एक सत्य आपल्या दिसून येते की एकदाचा मद्यपी तो कायमचा मद्यपी.?मद्यवर्जतेंनंतर काही काळानंतर जर आपण पुन्हा मद्य घेऊ लागलो तर आमची अवस्था पूर्वीईतकीच शोचनीय होते.?आपण जर मद्यपान थांबवण्याचा निर्णय घेणार असलो तर त्यात कोणतीही हातराखणी असता कामा नये, किंवा मद्याच्या मोहपासून आपली मुक्तता होईल अशी सुप्त आकांक्षाही आपल्या मनात असता कामा नये.?हे जर आपण केले तर आपली पहिली पायरी 100% झालेली आहे.?आजकाल 30 च्या आतील येणाऱ्या सदस्यांसाठी त्यांनी आपण इच्छाशक्तीवर त्यावर नियंत्रण ठेऊ शकू असे कोणतेही विचार मनात ठेऊ नयेत, कारण जर त्यांना खरोखरच मद्य थांबवण्याची ईच्छा असेल तर असे विचार मनात ठेवून ते कधीच यशस्वी होणार नाहीत असे आम्हाला आमच्या अनुभवावरून वाटते. ते जरी कमी काळ मद्य प्यायले असतील, किंवा भरपूर प्रमाणात त्यांनी मद्य घेतले नसेल तरी त्यांची हतबलता आमच्या एवढीच प्रबळ असते. इंग्रजी 4 थ्या आवृत्तीत खाली यासंदर्भात एक तळटीप दिलेली आहे.?आजाराचे गांभीर्य, तीव्रता प्राप्त करण्यासाठी मद्यपानांचा कालावधी, त्याचे प्रमाण यावर अवलंबून नसते.आपल्याला आजार झालेला आहे का ते पहावयाचे आहे ?स्त्रियांच्या बाबत तर हे विशेष लागू होते. त्या थोड्याच वर्षात खऱ्याखुऱ्या मद्यासक्त होतात. ?आपल्याला मद्यपी म्हटले की अपमानास्पद वाटते, पण वस्तुस्थिती हि आहे की आपल्याला मद्यपान थांबवता येत नाही हे पाहून अचंबा वाटतो. आणि हीच जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या पायरीतील डोक्यातल्या रिझरवेशन बद्धल, आणि ती 100% का आणि कशी घ्यायची याचे हे एक उत्तम उदाहारण आहे. केदार भाऊंचे मनापासून धन्यवाद. पुढील भाग -036 पाठवावा हि विनंती. ?????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      आभार आभार आभार !!! ????

You may also like

16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video
16302927bdff391661112955
video