Heads Up! We're currently undergoing maintenance to improve your streaming experience. During this time, you may encounter some disruptions. Thanks for your patience and understanding.

BBIU-047 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सत्तेचाळीस

Unknown Alkie

Unknown Alkie

  • 89 followers

  • Category: Motivational
  • |    

    AUTOPILOT

BBIU मला समजलेले बिगबुक

Now playing : BBIU-047 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सत्तेचाळीस
BBIU-047 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सत्तेचाळीस

BBIU-047 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सत्तेचाळीस

Published: 1 year ago

Category:

  • Motivational

About:

हा व्हिडीओ फक्त दारुड्यांसाठी आहे. ? BBIU-047 "मसबिबु - मला समजलेले बिगबुक" भाग - सत्तेचाळीस वेळ -  49.11 मिनिटे ???

सेट असाईड प्रेयर बिल साहेबांनी त्या रात्री लिहिलेले ओरिजिनल "हे कसे घडते" त्यातील फरक आज्ञा तुम्ही, तुम्हाला असे शब्द काहीही मागे ठेवू नये गुडघे टेकून प्रार्थना पायऱ्यांच्या शब्दांमधील फरक पुस्तकातील हे कसे घडते वाचन सुरू कार्यक्रम जसा च्या तसा घेणे वाटेल त्या थराला जाणे म्हणजे काय ? ???

कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये. प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा. मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकावेत आपली ह्या भागाची प्रतिक्रिया ह्याच ऑडिओच्या कॉमेंटमध्ये पोस्ट करावी. ?????

Please Login to comment on this video

  • Anju Phadke

    Anju Phadke . 1 year ago

    नमस्कार केदार भाऊ आणि मित्रांनो, मी शंकर मेसेज ऑफ होप समूह, गोरेगाव (पूर्व), मुंबई. म स बी बु भाग -047 ची प्रतिक्रिया. ?या भागात आपण बिल यांनी "हे कसे घडते"हे प्रकरण एका रात्रीत कसे लिहिले ते समजून घेणार आहोत. ?त्या काळातील ए ए च्या 40 लोकांनी कार्यक्रम पुस्तक रूपात लिहिण्याचे ठरवले.?त्यासाठी बिलची कहाणी लिहून झाली होती, तसेंच डॉक्टरांचे आजाराबद्धलचे वैद्यकीय मत हे ही प्रकरण लिहून झाले होते.अशाप्रकारे पुस्तकाची जुळवाजुळवं करण्यास सुरुवात झाली होती.?बिल यांना हे कसे घडते हे प्रकरण लिहावयाचे होते,पण ते कसे लिहावे हे त्यांना सुचत न्हवते. काय लिहावयाचे आहे याचा ठोकताळा त्यांच्या डोक्यात तयार होता, ऑक्सफोर्ड ग्रुपचा कार्यक्रम त्यांच्याकडे होता,पण तो सर्वसामान्य मद्यपी व्यक्तीला सहज समजेल आणि तो त्याला मान्य होईल असा कार्यक्रम बिलना लिहावयाचा होता. पण तो कशा पद्धतीने लिहावयाचा ते त्यांना सुचत न्हवते.?तेंव्हा त्यांनी आर्ततेने कदाचित गुढघे टेकून देवाची प्रार्थना केली आणि ध्यान केले. (देवाला आळवून त्याची मदत मागितली) ?नंतर त्यांनी जेंव्हा हे प्रकरण लिहावंयास घेतले,तेंव्हा त्यांना आतून असे वाटू लागले की परमेश्वर त्यांच्याकडून पेन्सिलने हे कागदावर पटापट लिहून घेत आहे.?12 पायऱ्या,12 रूढी ह्याबद्धल काहीच ठरले न्हवते, आणि जे त्यांना जमत न्हवते ते आज सहज लिहिले जात होते ?जे बिलनी अवघ्या 30/35 मिनिटात लिहून काढले होते, ज्याने जगातील करोडो मद्यपिना सुधारण्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यात आजतागायत बदल झालेला नाही.?आज 80 वर्षाहून अधिक काळ झाला तरीही तो सर्वाना मान्य आहे, आणि म्हणून ए ए त असे म्हणतात की हे परमेश्वराने बिल कडून लिहून घेतले आहे. ?मूळ हे कसे घडते आणि फेलोशिप मध्ये वाचले जाणारे हे कसे घडते यात फरक आहे.?बिलने लिहिलेल्या प्रकरणात त्यांनी वापरलेली भाषा ही अत्यंत कडक होती म्हणून सर्वाना ती पटावी म्हणून त्यात फेलोशिप ने बदल केला.?केदार भाऊंनी दोन्ही मधील फरक सुरेख पणे समजावून सांगितला. ?पुस्तकात असलेले हे कसे घडते आणि फेलोशिप मध्ये वाचले जाणारे ह्यातील फरक ही समजला. ?आपल्या शेरिंग मध्ये आम्ही पूर्वी कसे होतो, आम्ही कसे सुधारलो, आणि आता आम्ही कसे आहोत हे असायला हवे. याचा अर्थ आमची मानसिक अवस्था कशी आम्हांला मद्य पिण्यास भाग पाडत असे त्याची कारणे सांगणे होय,आमची ड्रंकॉलॉजि न्हवे, त्यातून आम्ही सुधारण्यासाठी कार्यक्रमाचा कसा उपयोग झाला आणि तो आम्ही कसा कृतीत आणला हे असायला हवे.तसेंच आजची आमची स्थिती कशी आहे, ती आम्ही कशी हाताळतो (मानसिक, शारीरिक स्थिती, भौतिक स्थिती न्हवे)हे असायला हवे. ?आम्हांला जे मिळाले ते तुम्हालाही मिळेल,पण त्यासाठी तुमची वाट्टेल त्या थराला जाण्याची आपली मनाची तयारी असायला हवी.?आपली प्रत्येक पायरी घेण्यासाठी काहीही करायला तयार असणे होय.? 4 थ्या पायरीत सर्व गुणदोशांची यादी करणे.?5 व्या पायरीत आपले सर्व स्वभाव दोष (काहीही न लपवता)दुसऱ्या व्यक्ती समोर सांगण्यास तयार होणे होय. ?8 आणि 9 व्या पायरीत नुकसान भरपाई करण्यास काहीही करायला तयार असणे होय (कोणतीही लाज न बाळगता तयार होणे होय).?अशा प्रकारे जर आम्ही सर्व पायऱ्या घेतल्या तर जी आश्वासने प्रत्येक पायरीची आहेत ती ही मिळतील असा होय. केदार भाऊंनी सर्व खूप सुरेखरित्या समजावून सांगितले आहे, त्यांचे मनःपूर्वक आभार. आपले साहित्य कोणालाच न देण्याची ग्वाही देतो आणि पुढील भाग पाठवावा अशी विनंती करतो. आभार, आभार, आभार. ??????

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आपल्यासारखे अत्यंत जिज्ञासू आणि बुद्धिमान सदस्य इतके कष्ट करताना पाहून खूप खूप आनंद होतो. मी वस्तुतः स्वतःसाठी केलेल्या कष्टांचा आपल्याला होणारा लाभ हा माझ्यासाठी बोनस आहे. ??? आपले खूप खूप आभार !!! ??✍️??

    • Kedar Seeker सनातन संस्कार

      Kedar Seeker सनातन संस्कार . 1 year ago

      शंकर भाऊ ? आपल्यासारखे अत्यंत जिज्ञासू आणि बुद्धिमान सदस्य इतके कष्ट करताना पाहून खूप खूप आनंद होतो. मी वस्तुतः स्वतःसाठी केलेल्या कष्टांचा आपल्याला होणारा लाभ हा माझ्यासाठी बोनस आहे. ??? आपले खूप खूप आभार !!! ??✍️??

  • Rajesh Pawar

    Rajesh Pawar . 1 year ago

    आदरणीय केदार भाऊ आपणांस सादर प्रणाम , मी राजेश पी. (ए ए नई रोशनी समूह , जोगेश्वरी मुंबई ) मला समजलेले बिगबुक भाग 47 ची प्रतिक्रिया देत आहे. .. . त्यावेळी जे काही 40सभासद होते त्यांनी ठरवले आपण आता सगळ्यांनी मिळून बिगबुक लिहायचे आहे. बिलची कहाणी लिहून झालेली होती. डॉक्टर ओपिनियन जमा केलेले होते. एका रात्री बिल जेउन झाल्यावर शांतपणे बसले होते. त्यांनी नोट पॅड आणि पेन्सिल हाता मध्ये घेतली. बराच वेळ ते विचार करतं राहिले. हे कसे घडते प्रकरण लिहायचे होते पण काहीच सुचत नव्हते. त्याना कळतं नव्हतं लोंकाना नेमकं काय सांगायचं आहे. बिल यांनी विचार केला आपण प्रार्थना व ध्यान करूया त्याचा काही उपयोग होतोय का ते बघू. त्यांनी प्रार्थना केली हे प्रकरण लिहायला देवा आता तूच मदत कर. प्रार्थना व ध्यान केल्यानंतर त्यांनी पेन्सिल हातात घेतली.बिल यांना भास होऊ लागला माझ्याकडून जे काही कागदावर लिहले जातेय ते पटापट ईश्वर माझ्याकडून लिहून घेतोय. अनेक दिवस त्याना ह्या प्रकरणा बाबत काही सुचत नव्हते ते प्रकरण त्यांनी तीस ते पस्तीस मिनिटांत लिहले. या प्रकरणाने जगातल्या अनेक मद्यप्यांना मदत केली. हे प्रकरण लिहल्यानंतर फेलोशिपने या प्रकरणात बदल केले कारण बिल यांची भाषा जाम कडक होती. आता जे बिगबुक मध्ये हे कसे घडते हे प्रकरण आहे ते सुधारित केलेले आहे. पण मूळ प्रकरण जे बिल यांनी लिहले ते देखील केदार भाऊंनी अनुवाद करून सांगितले आहे. ????आपल्यां फेलोशिप मध्ये जे हे कसे घडते वाचले जाते ते पुस्तकांतल्या प्रकरणाला अनुसरून नाही हे मागच्या भागात केदार भाऊंनी सविस्तरपणे सांगितलं आहे. ए ए. च्या सभेत माझ्या शेअरिंग मध्ये मी पूर्वी कसा होतो ,काय घडले आणि आता मी कसा आहे. .. . मी पूर्वी कसा होतो म्हणजे मी दारू पिऊन काय गाढवपणा केला ,रोज किती प्यायचो कुठल्या ब्रांडची घ्यायचो हे सगळं नव्हे तर माझ्या मध्ये विलक्षण मानसिक ओढ , विलक्षण शारीरिक संवेदना किती मोठ्या प्रमाणात होती. त्या वेळची माझी मानसिकता काय होती हे सांगितलं पाहिजे. ए ए मध्ये आल्यावर काय घडले काय घडत गेले आणि या आध्यात्मिक मार्गात बारा पायऱ्यांचे आचरण करतं असल्यामुळे माझी आजची परिस्थिती (भौतिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक परिस्थिती कशी आहे हे शेअर झाले पाहिजे. ????जे आमच्यापाशि आहे ते मिळविण्यासाठी तुमची कुठल्याही थराला जाण्याची तयारी आहे काय.आता कुठल्याही थराला म्हणजे मला प्रिय असलेल्या दारूला नाही म्हणणे. माझी हतबलता मान्य करणे ,माझी खरीखुरी अस्ताव्यस्तता मान्य करणे. दुसऱ्या पायरीत ज्या देवावर माझी खुन्नस होती त्या देवावर विश्वास ठेवण्याची तयारी करणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. तिसऱ्या पायरीत माझी स्वतःची ईच्छा स्वेच्छा माझ्या नैसर्गिक प्रव्रुत्ति मधून तयार झालेल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून माझी ईच्छा व जीवन परमेश्वराला सोपुन देणे. म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. चवथ्या पायरित माझ्या प्रत्येक कृष्णक्रुत्यान्चि कागदावर नोंद करणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. पाचव्या पायरित एका माणसासमोर मार्गदर्शकांकडे काहीही न दडवता कृष्णक्रुत्य सांगणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. सहाव्या पायरित. मला जे आवडणारे स्वभावदोष आहेत म्हणजे सेक्स वर माझे प्रेम असेल पैशावर माझे प्रेम असेल हे सगळे स्वभावदोष सोडायला तयार होणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. सातव्या पायरित हे सगळे स्वभावदोष काहीही मागे न ठेवता जे मला आवडतात ते सुध्दा काढून घ्यायला देवाच्या मदतीने तयार होणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. आठव्या पायरीत मी ज्याना त्रास दिला आहे ज्यांचे नुकसान केले आहे त्यांची नुकसान भरपाईची यादी तयार करणे आणि ती यादी तयार करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणे. नवव्या पायरीत एखाद्या चुकीमुळे तुरुंगात जाण्याची तयारी असणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. दहाव्या पायरीत दिवसभर स्वतःचा आढावा घेत राहणे. माझी त्या दिवसात झालेली चूक कितीही मोठी असली. त्याची तात्काळ कबुली देणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे. अकराव्या पायरीत मला न आवडणाऱ्या परमेश्वराची प्रार्थना करणे ध्यान करणे जे मला जमतं नाही हे सर्व करायला तयार होणे म्हणजे वाटेल त्या थराला जाणे होय. असे पुस्तकाचे लेखक सांगतात. तरच तुम्ही आमच्या मार्गावर येऊ शकता आणि जी आश्वासने आमच्या जीवनात सफल झाली ती तुमच्या जीवनात देखील सफल होऊ शकतात. ????केदार भाऊ तुमचे शतशः आभार. तुम्ही पाठवत असलेले ऑडियो क्लिप मी कोणालाही देणार नाही याची हमी मी तुम्हांला देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. .. .??????

You may also like

163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video
163a836a2e9f361671968418
video